देवाघरी जातांनाही हात रिकामा नको. ‼️

यमस्य करूणा नास्ती:!
भूकेलेल्याला त्याच्या ताटावरून, तहानलेल्याला पाण्याचा ग्लास सोडून, शृंगारक्रीडा करणा-याला शयन मंदिरातून, शल्यकर्म चालू असता बेडवरून उचलले जाते. मृत्यूघटिका टळल्याचे आख्ख्या जगात एक उदाहरण नाही.

मग आपल्याला नेतात कुठे? हा विचार करणारे फार थोडे.
लंडन, अमेरिकेला जाताना पौंड्स, डाॅलर्स इ.तिथल्या करन्सीची व्यवस्था केली जाते. पण मृत्यूनंतर आपण जेथे जाणार आहोत तेथील अज्ञात परलोकात “पुण्य करन्सी” महत्वाची असते ती जिवंतपणीच जमा करायची असते!


ही जाणीव वृद्धापकाळ आला तरी होत नाही.आपण अमरपट्टा घेऊन आल्याची गैरसमजूत असते.99 व्या वर्षी 99 वर्षाच्या कराराने जमीन खरेदी करतो आणि सही करतो तोच मृत्यू गाठतो.

दागदागिने आणि कॅश लाॅकर मध्येच रहाते, गुरे गोठ्यात रहातात.बरोबर काहीच नेता येत नाही! तरी जीव नश्वराच्याच मागे लागतो!
अजगर बेडकाला गिळत असतो आणि बेडुक माशा पकडण्यात रंगून जातो. असेच आपले आहे.

आपण प्रपंचीत मोहपाशात अडकून बसलेलो आहोत!
सहस्त्र चंद्रदर्शन झालेले राजकारणी पुढील गतीची तयारी न करता नवीन पक्ष काढून राजकारण खेळतात! कलावंत करोडो रुपये कमवूनही दहा मिनिटेही परमेश्वराला न देता पैशासाठी परदेश दौरे करतात.

भक्ती बर्वे, पद्मा चव्हाण, मॅरिलीन मनरो, जयश्री गडकर, गणेश भालेराव यांची काय जाण्याची वये होती का? पण यमाग्रजाने वाॅरंटच काढले होते. आपल्या बरोबर फक्त शुभाशुभ कर्मेच येतात! या व्यस्त कलावंताना कुठे वेळ होता पुण्य संचयासाठी?


म्हणून श्रीगुरूचरित्र ग्रंथात महाराज सांगतात की वय तरूण असतानाच पुण्यसंचय करून ठेवा कारण जीविताचा भरवसा नाही!


ते मातुःश्रींना म्हणाले! “आई तू मला सांगतेस की अग्राह्यसंन्यास बालपणी घेऊ नको!वानप्रस्थाना नंतर संन्यास घ्यावा! पण आई मला तेवढे आयुष्य आहे याची खात्री तुला आहे का?


“मातुःश्री निरुत्तर झाल्या.
प्रपंचा बरोबरच आध्यात्मही जवळ केले म्हणजे तरच ज्ञान व सुरक्षितता लाभते! नाही भरवसा या घडीचा रे अभिमान धरीसी कोणाचा?


यासाठी भंगवताला प्रेम, भक्ती द्या. मग तो तुमच्या आवडीचा देव,संत कोणीही चालेल पण संत, गुरु, देव एकच पाहिजे! अनेक नकोत! तुमची श्रद्धा, भाव फक्त आणि फक्त त्या एकवरच पाहिजे!

हरि नामाच्या बँकेमध्ये आपल्या आवडत्या देवाच्या नामाचे धन करा जमा…! तेच हरीनाम जमा शेवटी येईल तुमच्या कामा !🚩

tc
x