====================
....." दुर्लक्षित ".....
====================
आईच्या नावाचा गाजावाजा,
झाला नेहमीच जगात…
दुर्लक्षित मात्र राहिले नेहमीच,
बाबा मुलांच्या मनात…
सदाच केली सगळ्यांनी,
आईच्या मायेची स्तुती…
बाबां बद्दल वाटतच राहिली ,
सदैव मनात भिती…
दिसतात नेहमी सर्वांना ,
आईचे काबाडकष्ट….
बाबांची मेहनत नाही दिसली,
कोणाला कधीचं स्पष्ट…
लेकरांच्या चिंतेने आईचा,
पदर ओला झाला…
बाबांनी कसातरीच आपला ,
मुका हुंदका आवरला…
जातच नाही दिवस मुलांचा ,
पाहिल्याशिवाय आईचा चेहरा…
बाबांचा मात्र वाटतो मुलांना ,
नेहमी उगाचंच दरारा…
बाबा असताना नाही होत,
त्यांच्या मायेची जाणीव…
बाबा जगात नसताना मात्र,
भासते त्यांची तीव्र उणीव…
आई-बाबांचा आशिर्वाद ,
हिचं असे खरी संपत्ती…
त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान,
हिचं शाश्वत प्रगती…
=====================
©️®️
✍️…🧚🏻♀️एंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अहमदनगर