4 भारतीयांसह 16 जणांचा मृत्यू दुबईतून एक धक्कादायक बातमी समोर आली येथील एका निवासी इमारतीला आग लागल्याची घटना घडली आहे. या अपघातात 16 जणांचा मृत्यू झाला असून 9 जण गंभीर जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे.
या अपघातात केरळमधील एका जोडप्यासह चार भारतीयांचा मृत्यू झाला. प्राथमिक माहितीनुसार, ही आग दुबईतील सर्वात जुन्या भागांपैकी एक असलेल्या अल-रस येथे असलेल्या इमारतीच्या चौथ्या मजल्यावर लागली आणि नंतर ती इतर भागात पसरली.
मृत भारतीयांची नावे पुढीलप्रमाणे आहेत.भारतीय वाणिज्य दूतावासातील वरिष्ठ अधिकारी बिजेंद्र सिंह यांनी ही माहिती दिली आहे. रिजेश कलंगदान (३८), त्यांची पत्नी जेशी कंदमंगलथ (३२), गुडू सलियाकुंडू (४९) आणि इमामकासिम अब्दुल खादर (४३) अशी मृतांची नावे आहेत.
एक एक करून 16 मृतदेह इमारतीतून बाहेर काढण्यात आले. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या 9 जणांना रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.. अखेर काय झाले? जाणून घ्या
दुबई पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री 12.35 च्या सुमारास इमारतीला आग लागली. जी 2:42 वाजता नियंत्रणात आली. या घटनेचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका अपार्टमेंटच्या खिडकीतून काळा धूर आणि ज्वाला बाहेर पडताना दिसत आहेत.
दरम्यान, प्रशासनाने तातडीने पावले उचलत बचावकार्य सुरू केले. केरळमधील जोडप्याचा मृत्यू रिजेश कलंगदान (३८) आणि त्यांची पत्नी जेशी कंदमंगलथ (३२) हे केरळमधील शेजाऱ्यांसाठी जेवण बनवत होते.
कलंगदान हे ट्रॅव्हल अँड टुरिझम कंपनीत बिझनेस डेव्हलपमेंट मॅनेजर होते, तर कंदमांगथ हे शाळेत शिक्षक होते. मात्र या अपघातात दोघांनाही जीव गमवावा लागला आहे.