🔰 ठाण्यात ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने प्राॅपर्टी मेळाव्याचे आयोजन
ठाण्यात ‘क्रेडाई एमसीएचआय’च्या वतीने ३ ते ६ फेब्रुवारीपर्यंत ‘प्राॅपर्टी २०२३ ठाणे’ या मेळाव्याचे आयोजन करण्यात येणार आहे.
🔰 अबब.. आता एसटीच्या निवृत्त कर्मचाऱ्यांचे ३० जानेवारीपासून आंदोलन, थकित रक्कम मिळावी आणि इतर मागण्या
निवृत्त कर्मचाऱ्यांनी २०१९ पासूनची येणे असलेली रक्कम मिळावी आणि इतर मागण्यांसाठी ३० जानेवारीपासून पूर्व विदर्भात आंदोलनाची घोषणा केली आहे.
🔰 “शरद पवारांच्या प्रकृतीवर नक्कीच परिणाम…”, भाजपा खासदाराचं विधान; म्हणाले, “एवढी कट-कारस्थानं..!”
“जर एवढी कट-कारस्थानं होत असतील, तर ते शकुनीपेक्षा काही कमी आहेत असं म्हणता येणार नाही. मग जयंत पाटलांना असं म्हणायचं आहे का की शरद पवार…!”
🔰 “दिघे साहेबांची समाधी एकनाथ शिंदेंनी बांधली म्हणून तिथे तुमची..”, शिंदे गटाची उद्धव ठाकरेंवर खोचक टीका!
शिंदे गटाचे प्रवक्ते नरेश म्हस्के यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली. काय म्हणाले ते जाणून घ्या.
🔰 फळ विक्रेत्यावर भाजपा-संघ कार्यकर्त्यांच्या हेरगिरीची जबाबदारी; PFIच्या कटाची धक्कादायक माहिती आली समोर
एनआयएने पीएफआयशी संबंधित असल्याचा आरोपाखाली केरळमधील कोल्लम जिल्ह्यातून त्याला अटक केली होती.
🔰 राजस्थाननंतर छत्तीसगडच्या मुख्यमंत्र्यांची अशी ही मतपेरणी
२०१८च्या विधानसभा निवडणुकीच्या जाहीरनाम्यात सत्तेत आल्यावर तरुणांना बेरोजगार भत्ता देण्याचे आश्वासन काँग्रेसने दिले होते. निवडणूक वर्षात किंवा सत्तेच्या अखेरच्या काळात काँग्रेसकडून निवडणूक आश्वासनाची पूर्तता केली जात आहे.
🔰 “आम्ही गद्दारांनाच हिरे समजून…” अद्वय हिरेंच्या पक्षप्रवेशाच्या वेळी उद्धव ठाकरेंची शिंदे गटावर टीका
अद्वय हिरे यांनी भाजपाला सोडचिठ्ठी देऊन शिवबंधन हातावर बांधलं, त्यावेळी उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर टीका केली
🔰 “कितीही खोके, सत्ता दिली तरी उद्धव ठाकरेंना…”, शिवसेनेत प्रवेश करताच अद्वय हिरेंची भाजपावर टीका
🔰 “सरकारी कार्यक्रमात भाजपाचे नेते कसे सहभागी होतात?” ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रमावरून काँग्रेसची टीका; म्हणाले, “शाळकरी मुलांमध्ये…”
पंतप्रधान नरेंद मोदी यांनी देशातील शाळकरी मुलांसाठी ‘परीक्षा पे चर्चा’ कार्यक्रम घेत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावरून काँग्रेसने टीका केली आहे.
🔰 “सत्तेत आल्यावर वीजबिल माफीचा विसर”, नाना पटोलेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर टीका
आता ते अर्थमंत्री असताना त्यांना सर्व गोष्टी स्मरत नाही. सरकार स्थापन होऊन सहा महिने झाले, पण त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केले नाही, असेही नाना पटोले म्हणाले.
🔰 ‘भारत जोडो यात्रे’ला तात्पुरती स्थगिती, राहुल गांधींच्या सुरक्षा व्यवस्थेत त्रुटी असल्याचा आरोप; ११ किमी चालणार होते, पण…
खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेसची ‘भारत दोडो यात्रा’ सध्या अंतिम टप्प्यात आहे.
🔰 आगामी लोकसभा निवडणुकीबाबत एकनाथ शिंदे यांचे मोठे भाकित; म्हणाले, “महाविकास आघाडीने ४ किंवा ६ जागा…”
आगामी लोकसभा निवडणुकीला साधारण दीड वर्षे बाकी आहेत. ही निवडणूक जवळ आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे.
🔰 महाराष्ट्राच्या शिरपेचात मानाचा तुरा! वेगवेगळ्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ४ तरुणांचा लंडनमध्ये सत्कार
महाराष्ट्रातील प्रवीण निकम यांच्यासह चैतन्य मारपकवार, राजू केंद्रे, विवेक गुरव यांचा सन्मान लंडन येथे करण्यात आला आहे.
🔰 एमईएसचे उपाध्यक्ष, अणूशास्त्रज्ञ डॉ. यशवंत वाघमारे यांचे निधन
डॉ. यशवंत वाघमारे यांनी मराठी विज्ञान परिषदेचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. ‘आयुका’ आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या फिजिक्स विभागाशी ते निगडित होते.
🔰 पुणे: अभिनेत्री प्राजक्ता माळी, प्रियेशा देशमुख, रणजित काशिद, अमोल वाघमारे युवा पुरस्काराचे मानकरी
विद्यापीठाचे प्र- कुलगुरू डॉ. संजीव सोनवणे यांनी पुरस्कारांची माहिती प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली.
🔰 नागपूर : १२ वर्षीय मुलगा गळफास घेतलेल्या स्थितीत, क्वार्टर परिसरात खळबळ
या संशयास्पद मृत्यू प्रकरणात खेळता खेळता मुलाला गळफास लागल्याचा अंदाज व्यक्त होत असला, तरी तपासानंतरच मुलाच्या मृत्यूचे खरे कारण स्पष्ट होणार आहे.