🔰 “शिंदे गटातील ३५ आमदारांच्या Y+ सुरक्षेसाठी…”, खर्च सांगत अजित पवारांनी सरकारला खडसावलं; म्हणाले…
“भास्कर जाधव यांच्या घराबाहेर पेट्रोलचे बॉम्ब सापडले…”, असेही अजित पवारांनी म्हटलं.
🔰 “मुख्यमंत्री महोदय, तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांना…”, अजित पवारांचं एकनाथ शिंदेंच्या टीकेला प्रत्युत्तर; म्हणाले, “त्यात मन रमवू नका!”
अजित पवार म्हणतात, “तुम्ही तुमच्या मुलाच्या वयाच्या लोकांनाच जास्त टार्गेट करत आहात. जाऊ द्या ना, मुलं आहेत म्हणून सोडून द्या ना. दुसऱ्या कार्यकर्त्यांना प्रवक्ते म्हणून…!”
🔰 “गोगावले, तुम्ही जेवढं मला डिस्टर्ब कराल तेवढं मंत्रीपद…”, अजित पवारांचा भरत गोगावलेंना टोला! म्हणाले, “कितीदा सांगितलंय…”
अजित पवार म्हणतात, “तुम्हाला माहीत नाही माझे आणि एकनाथ शिंदेंचे काय संबंध आहेत. काय तुम्हाला कळत नाही.”
🔰 उल्हासनगरातील सनद प्रकरण मुख्यमंत्र्यांच्या दारी; शासकीय भूखंडावरील सनद प्रकरणी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी
शासकीय भुखंडांवर बोगस कागदपत्रे सादर करून सनद मिळवल्याचा प्रकार उल्हासनगरात समोर आल्यानंतर आता हे प्रकरण स्थानिक आमदारांच्या माध्यमातून थेट मुख्यमंत्र्यांपर्यंत नेण्यात आले आहे.
🔰 ठाणे : कळव्यात १५ किलो गांजा जप्त; चार जणांना अटक
पोलिसांनी आरोपींकडून एक मोटार, मोबाईल फोन आणि गांजा असा एकूण १७ लाख ९८ हजार ७६० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
🔰 ठाणे: पोलिओ लशीची तिसरी मात्रा जानेवारी पासून
नियमित पोलिओ लसीकरण अंतर्गत बालकास जन्मानंतर सहा आठवडे पूर्ण झाल्यावर पहिली मात्रा तसेच १४ आठवडे पूर्ण झाल्यावर दुसरी मात्रा अशा एकूण दोन मात्रा देण्यात येतात.
🔰 ‘पर्यटकांनी नूतन वर्षाचं स्वागत कायद्याच्या चौकटीत राहून करावं’; लोणावळा पोलिसांचा इशारा
नववर्ष साजरं करण्यासाठी अवघ्या राज्यभरातून तसेच पुणे, मुंबईतून हजारो पर्यटक लोणावळ्यात दाखल होत आहेत. नागरिकांची वाढती गर्दी पाहता कोणताही गैरप्रकार घडू नये यासाठी लोणावळ्यात विविध चार ठिकाणी पोलिसांची नाकाबंदी असणार आहे.
🔰 शिंदे सरकारचा जयंत पाटील यांना आणखी एक धक्का; सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेतील…
बॅंकेच्या इमारत बांधकाम, मुख्य कार्यालय व शाखा कार्यालयासाठी फर्निचर खरेदी, एटीएम यंत्र, नोटा मोजण्याचे यंत्र आदी बाबीवर ३० ते ४० कोटींचा खर्च अनावश्यक खर्च केल्याचा आक्षेप घेण्यात आला होता.
🔰 “जयंत पाटील बरोबर बोलले राष्ट्रवादीची शिवसेना म्हणूनच आम्ही…” एकनाथ शिंदे नेमकं काय म्हणाले?
जयंत पाटील यांच्या वाक्याचा संदर्भ घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उद्धव ठाकरेंवर टीका
🔰 पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील झोपडपट्टी पुनर्विकास प्रकल्पांना गती देण्यासाठी नवी नियमावली
७० टक्के ऐवजी ५१ टक्के झोपडीधारकांची संमती आवश्यक
🔰 पंतप्रधान मोदींकडून ‘वंदे भारत एक्स्प्रेस’ला हिरवा झेंडा; मात्र, ममता बॅनर्जींचा व्यासपीठावर जाण्यास नकार, नेमकं काय घडलं?
आज पंतप्रधान मोदी यांनी पश्चिम बंगालमधील हावडा स्टेशनवर वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला.
🔰 ४२ दिवसांत शोधली २१ हरवलेली मुलं; महिला कॉन्स्टेबलची कौतुकास्पद कामगिरी
महिला कॉन्स्टेबल सीमा ढाका यांनी ४२ दिवसांत २१ हरवलेल्या मुलांना शोधून त्यांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन केले आहे.
🔰 आईच्या अंत्यसंस्कारानंतर तासाभरातच पंतप्रधान मोदींची कामाला सुरुवात
हावडा आणि न्यू जलपाईगुडीला जोडणाऱ्या वंदे भारत एक्स्प्रेसला पंतप्रधान मोदींनी आज हिरवा झेंडा दाखवला.
🔰 मुंबई महानगरपालिकेच्या जलतरण तलावांसाठी लवकरच सदस्यत्व नोंदणी सुरू;
नागरिकांना जलतरण तलावांसाठी त्रैमासिक व मासिक सदस्यत्वही घेता येणार आहे. तसेच दैनिक सुल्क भरून एका व्यक्तीला पोहण्यासाठी सोबत नेता येणार आहे.