◼️“उद्धव ठाकरेंनी कोकणात येऊन दाखवावं”, नारायण राणेंच्या आव्हानावर संजय राऊतांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
“सरकारच्या डोळ्यात मोतीबिंदू झाला असून, त्यांची शस्त्रक्रिया करावी लागेल”
◼️“निरंजन डावखरेंनी मुस्लीम भगिनीशी विवाह केला…”, जितेंद्र आव्हाडांच्या ट्वीटवर चित्रा वाघ संतापल्या; म्हणाल्या, “लव्ह जिहादचं निर्लज्जपणे समर्थन
करणारेच…”
लव्ह जिहाद धर्मांतर आणि लँड जिहादविरोधी कायदा पूर्ण देशभर लागू करण्याकरता अॅड.निरंजन डावखरे यांनी हिंदू जनजागरण धर्मसभेचे आयोजन केले आहे.
हे ही वाचा : पुढचे पाच दिवस होणार ऊन पावसाचा खेळ; राज्यातील ‘या’ जिल्ह्यात पाऊस लावणार हजेरी
◼️पुण्याच्या मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकास आघाडीची एक हाती सत्ता
मावळ कृषी उत्पन्न बाजार समितीवर महाविकासआघाडीने दणदणीत विजय मिळवला आहे.
◼️भिवंडीत तीन मजली इमारत कोसळली; ४० ते ५० जण ढिगाऱ्याखाली दबल्याची भीती
भिवंडीतील वलपाडा परिसरात एक तीन मजली इमारत कोसळली आहे.
हे ही वाचा : पालक, विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी शाळेच्या निकालाची तारीख बदलली, जाणून घ्या तपशील.
◼️“घरातील माणसावरच बायोपिक असेल तर…”, ‘महाराष्ट्र शाहीर’ चित्रपटाबद्दल प्रवीण तरडेंची खास पोस्ट, म्हणाले…
Maharashtra Shaheer : प्रवीण तरडेंना ‘महाराष्ट्र शाहीर’च्या टीमचं कौतुक, म्हणाले, “एखादी बायोपिक करणं हेच मुळात शिवधनुष्य असतं आणि…”
◼️Good News! ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि विद्यार्थ्यांना मेट्रो प्रवासात २५ टक्के सवलत; मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा
१ मे, म्हणजेच महाराष्ट्र दिनापासून या सवलतीचा लाभ घेता येणार आहे.
हे ही वाचा : CRPF अंतर्गत सरकारी नोकरी शोधत असलेल्या इच्छुकांना एक उत्तम संधी मिळणार आहे.
◼️बुलढाणा: तीन बाजार समित्यांत आघाडीला दणदणीत यश, युतीचा दोन समित्यांत विजय; मतमोजणी अन् काही निकाल ठरले वैशिष्ट्यपूर्ण
बुलढाणा जिल्ह्यातील पाचपैकी तीन बाजार समित्यांमध्ये महाविकास आघाडीला दणदणीत यश मिळाले आहे.
◼️पुणे : हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत १८ पैकी १३ जागांवर राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपाच्या पॅनलचा दणदणीत विजय
हवेली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत राष्ट्रवादी बंडखोर आणि भाजपाच्या पॅनलच्या अण्णासाहेब मगर शेतकरी विकास आघाडीला १८ पैकी १३ जागांवर दणदणीत विजय मिळविण्यात यश आले आहे.
◼️वर्धा: समृध्दीवर महिला पोलीस निरीक्षक ठार; कर्मचारी,आरोपीही जखमी
हरियाणातील पंचकुला येथील आरोपींना घेऊन जाणाऱ्या पोलीस वाहनाचा समृद्धी मार्गावर पांढरकवडा येथे अपघात झाला.
◼️नागपूर: शाळेचे छत कोसळून सुरक्षारक्षक ठार
वानाडोंगरीतील स्कूल ऑफ स्कॉलर शाळेचे छत कोसळल्याने छताच्या ढिगाऱ्याखाली दबून सुरक्षारक्षक ठार झाला. ही दुर्दैवी घटना आज शनिवारी सकाळी अकरा वाजता घडली.
◼️“…तेंव्हा आदित्य ठाकरे मुख्यमंत्री बनण्याचं षडयंत्र रचत होते”; नितेश राणेंचा खळबळजनक दावा!
आदित्य ठाकरे यांनी जसलोक रुग्णालयाच्या एका खोलीत बैठका घेतल्या होत्या, असं ते म्हणाले.
◼️“काँग्रेसने मला ९१ वेळा शिव्या दिल्या, पण…”, पंतप्रधान मोदींचा कर्नाटकातून हल्लाबोल
मल्लिकार्जुन खरगेंची पंतप्रधान मोदींची ‘विषारी सापा’शी तुलना केली होती.
◼️BYJUs चे सीईओ रवींद्रन यांच्यांशी संबंधित तीन ठिकाणांवर ईडीकडून छापेमारी
◼️बंगालच्या न्यायमूर्तीच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; ‘न्यायिक शिस्त’ राखण्यासाठी तातडीच्या सुनावणीत निर्णय
सर्वोच्च न्यायालयाने शुक्रवारी रात्री ८ वाजता घेतलेल्या विशेष सुनावणीत कोलकाता उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभिजित गंगोपाध्याय यांनी दिलेल्या एका अपवादात्मक आदेशाला तातडीने स्थगिती दिली.
This post was last modified on %s = human-readable time difference 12:38 pm