◼️ अश्लील रॅप साँग शूट केल्याचा आरोप करत अभाविपकडून पुणे विद्यापीठात तोडफोड, म्हणाले…
पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेची बैठक सुरू असतानाच अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने आक्रमक आंदोलन केलं. अभाविपने विद्यापीठात अश्लील रॅप साँगचं शूट झालं आणि त्यावर कुलगुरूंनी कारवाई केली नाही, असा आरोप केला आहे.
◼️ मोठी बातमी! सरकारी कंपन्यांकडून पीएम केअरमध्ये २९०० कोटींहून अधिक रक्कम जमा; पेट्रोल आणि गॅस कंपन्या सर्वात मोठ्या देणगीदार
पीएम केअर्स फंडासाठी एकूण देणग्यांपैकी हे प्रमाण सुमारे ५९.३ टक्के आहे. विशेष म्हणजे सीएसआरने हा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात पीएम केअरमध्ये सरकारी कंपन्यांचे योगदान २,९१३ कोटी रुपयांएवढे असल्याचा दावा करण्यात आला आहे.
◼️ शिंदे गटाच्या आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेणार? नीलम गोऱ्हेंचं सूचक विधान; म्हणाल्या, “शत्रुत्व असलं तरी…”
शिंदे गटातील आमदारांना पुन्हा ठाकरे गटात घेण्यावर नीलम गोऱ्हे यांनी भाष्य केलं आहे.
◼️ “दिल्लीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बदलण्याच्या हालचाली”, संजय राऊतांच्या दाव्यावर शिंदे गटाची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…
शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी दिल्लीतूनच महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचा मोठा दावा केला.
हे ही वाचा : एक लाखांहून अधिक शेतकरी कृषी पंपासाठी वीज जोडणीच्या प्रतीक्षेत!!
◼️ उद्धव ठाकरेंसाठी सहानुभूती पण स्थानिक पातळीवर नेतृत्वाची पोकळी
कुरघोडीच्या राजकारणातून धनुष्यबाण हे चिन्ह काढून घेतल्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाबाबत ग्रामीण भागात सहानुभूती निर्माण झाली.
◼️ मुकेश अंबानींच्या RILचा रेकॉर्ड ब्रेक नफा, शेअर्स ३१२५ रुपयांपर्यंत जाण्याची शक्यता
मुख्य व्यवसाय ऑइल रिफायनरी आणि पेट्रोकेमिकलचे करपूर्व उत्पन्न १४.४ टक्क्यांनी वाढून १६,२९३ कोटी रुपये झाले आहे. रिलायन्स जिओचा नफा १५.६ टक्क्यांनी वाढून ४९८४ कोटी रुपये झाला आहे.
हे ही वाचा : कमावलेला💰 पैसा हातात टिकत नाहीये
◼️ चक्क कारवर थापलं शेण, गरमीपासून वाचण्यासाठी डॉक्टरचा अनोखा जुगाड; पाहून तुम्हीही डोक धराल
कारवर थापलं शेण, गरमीपासून वाचण्यासाठी डॉक्टरचा जुगाड, एसीचीही गरज नाही…
◼️ डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या नावे बनावट पत्र प्रकरण, रायगड पोलिसांनी पुण्यातून घेतले एकाला ताब्यात
शुभम काळे असं अटक केलेल्या तरुणाचे नाव, स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, आरोपीला एक दिवसाची पोलीस कोठडी
हे ही वाचा : SBI, HDFC, ICICI, PNB, Canara कोणत्या बँकेचे व्याजदर फायदेशीर आहेत
◼️ जगभरातील देश लष्करावरील खर्च वाढवत आहेत; या सर्वात भारत कुठे आहे आणि पाकिस्तान-चीनची काय परिस्थिती आहे?
जगभरातील अनेक देशांनी त्यांच्या सैन्यावर आधीपेक्षाही अधिक निधी खर्च करण्यास सुरुवात केली आहे. महागाई, रशियाचा युक्रेनवर हल्ला आणि चीनला मागे रेटण्याचे अमेरिकेचे प्रयत्न, हे आज जगातील महत्त्वाचे विषय बनले आहेत.
◼️ सांगली : वाढदिवसानिमित्त सचिनच्या पुतळ्याची पालखीतून मिरवणूक
भारतरत्न क्रिकेटपटू, मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर यांचा पन्नासावा वाढदिवस शिराळा तालुक्यातील औंढी येथे गुढ्या-तोरणे उभा करून सचिनच्या अर्धपुतळ्याची पालखीतून मिरवणूक काढून साजरा करण्यात आला.
हे ही वाचा : UPI : तुम्ही UPI वापरताना ‘या’ चुका करू नका अन्यथा…
◼️ “या निर्लज्ज सरकारचा पर्दाफाश…” खारघर घटनेप्रकरणी नाना पटोलेंनी जाहीर केली काँग्रेसची भूमिका
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेसची भूमिका जाहीर केली आहे.
◼️ “भेंडवळच्या घटमांडणीवर विश्वास ठेवू नका”, ‘अंनिस’चे शेतकऱ्यांना आवाहन; म्हणाले, “ही निव्वळ पोपटपंची!”
घटमांडणीच्या या अंदाजावरून शेतकरी आपले पिक-पाण्याचे नियोजन करत असतात. मात्र, या भेंडवळीच्या अंदाजावर विश्वास न ठेवण्याचे आवाहन अंधश्रद्धा निर्मुलन समितीने केले आहे.
◼️ “सरकार कोसळणार” या राऊतांच्या दाव्यानंतर काही वेळातच देवेंद्र फडणवीस यांचं ट्वीट! म्हणाले, “राजकारणात पण कुस्ती..”
देवेंद्र फडणवीस यांच्या ट्वीटचा अर्थ काय? विविध चर्चा सुरू
This post was last modified on %s = human-readable time difference 1:01 pm