दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 07/5/23

◼️शरद पवार पंढरपुरात विठ्ठलाच्या चरणी, दर्शनानंतर व्यक्त केलं समाधान; म्हणाले…
शरद पवार ६ वर्षानंतर विठ्ठलाच्या दर्शानासाठी आले होते

◼️मित्राबरोबर बसलेल्या तरुणीचा अज्ञाताने बनवला व्हिडीओ, नंतर ब्लॅकमेल करत जंगलात नेलं, अन्…; धक्कादायक घटना समोर
पीडित तरुणीच्या तक्रारीनंतर अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

◼️अदिती सारंगधरने ‘या’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटरला केलं होतं प्रपोज, लव्ह लेटरमध्ये लिहिलेल्या मजकूराबद्दल खुलासा करत म्हणाली…
काही वर्षांपूर्वी एका क्रिकेटरला प्रपोज केलं होतं असा खुलासा तिने केला आहे.

◼️कर्नाटकात राहुल गांधींचा हटके अंदाज, डिलीव्हरी बॉयच्या दुचाकीवरून मारला फेटफटका
गेल्या काही दिवसांपासून राहुल गांधी कर्नाटकात असून, नागरिकांशी संवाद साधत आहेत.

◼️महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोणाचा होणार? शरद पवार म्हणाले…
महाविकास आघाडीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोणाचा होणार यावर शिवसेना (ठाकरे गट), काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी अनेकदा प्रतिक्रिया दिल्या आहेत.

◼️महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल कधी लागणार? उज्ज्वल निकम म्हणाले..
महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाची सुनावणी पूर्ण झाली आहे नऊ महिन्यांच्या युक्तिवादानंतर आता या आठवड्यात महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल लागणार का? याविषयी चर्चा सुरु आहे.

◼️राजकीय पक्षांचा फंड येतो कुठून? ९० टक्के निवडणूक रोखे पाच मोठ्या शहरांतून आले; त्यातही मुंबई आघाडीवर
निवडणूक रोखे (Electoral Bonds) ही योजना जानेवारी २०१८ साली लागू करण्यात आली. आयटी हब असलेले बंगळुरू शहर मात्र या टॉप पाच शहरांमध्ये नाही.

◼️पुणे: अवकाळी पावसामुळे फळभाज्यांची आवक घटली
अवकाळी पावसामुळे फळभाज्यांची आवक घटली आहे. तसेच फळभाज्यांना फारशी मागणी नसल्याने टोमॅटो, हिरवी मिरची, ढोबळी मिरची, शेवग्याच्या दरात घट झाली.

◼️कंत्राटी क्षयरोग कर्मचाऱ्यांच्या काम बंद आंदोलनाचा ‘क्षयरोग निर्मूलन कार्यक्रमाला’ फटका!
क्षयरोगासारख्या संसर्गजन्य आजारात जीव धोक्यात घालून कंत्राटी म्हणून काम करणाऱ्या आरोग्य विभागातील सुमारे २२०० कर्मचाऱ्यांनी १ मेपासून बेमुदत काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

◼️मार्केट यार्डात टेम्पोच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू
मार्केट यार्ड परिसरात टेम्पोच्या धडकेने पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

◼️‘द केरला स्टोरी’ वादाच्या भोवऱ्यात; तमिळनाडूतील मल्टीप्लेक्स संघटनांनी चित्रपटाविरोधात घेतला मोठा निर्णय
अदा शर्माच्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाला अनेक लोक प्रोपगंडा चित्रपट म्हणत आहेत.

◼️“संजय राऊत राष्ट्रवादीत जाणार”, नितेश राणेंच्या दाव्यावर सुनिल राऊत म्हणाले; “१०४ दिवस तुरुंगात काढले, पण…”
नितेश राणे यांच्या या दाव्यानंतर राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. संजय राऊत यांचे बंधू सुनिल राऊत यांनीही याबाबती प्रतिक्रिया दिली आहे.

◼️“शरद पवारांच्या तोंडून कधीही शिवरायांचं नाव आलं नाही”, राज ठाकरेंच्या टीकेला भुजबळांचं प्रत्युत्तर; म्हणाले…
राज ठाकरेंनी शरद पवारांनी एक मुलाखत घेतली होती. त्याचा दाखला छगन भुजबळांनी दिला आहे.

◼️“संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार”, नितेश राणेंच्या दाव्यावर आदित्य ठाकरेंची एका वाक्यात प्रतिक्रिया; म्हणाले…
संजय राऊत १० जूनपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासंदर्भात त्यांच्या बैठका झाल्या असून बोलणीही सुरु आहे, असा दावा भाजपाचे आमदार नितेश राणे यांनी केला आहे.

◼️“अरविंद केजरीवालांच्या घरातील फर्निचरसाठी मी स्वत: पैसे दिले”, सुकेश चंद्रशेखरचा मोठा दावा; नायब राज्यपालांना लिहिले पत्र
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे.

◼️GT vs LSG: हार्दिक आणि क्रृणाला पांड्याने रचला इतिहास; आयपीएलमध्ये ‘हा’ कारनामा करणारी ठरली पहिलीच जोडी
Hardik Pandya vs Krunal Pandya : आयपीएल २०२३ मध्ये लखनऊ आणि गुजरात संघात सामना खेळला जात आहे. आयपीएलच्या इतिहासात प्रथमच, दोन सख्खे भाऊ कर्णधार म्हणून एकमेकांविरुद्ध मैदानात उतरले.

tc
x