🔰 नाना पटोलेंकडून नाशिकमधील उमेदवाराचं नाव जाहीर, म्हणाले, “महाविकासआघाडी म्हणून…”
नाशिक मतदारसंघात काँग्रेस नेते सुधीर तांबे आणि त्यांचे पुत्र सत्यजीत तांबे यांनी केलेल्या बंडखोरीनंतर महाविकासआघाडीचा उमेदवार कोण असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी परिस्थिती स्पष्ट झाली.
🔰 अपक्ष अर्ज दाखल केल्यानं कारवाईची टांगती तलवार; सत्यजीत तांबे म्हणाले, “१८ किंवा १९ तारखेला…”
सुधीर तांबे यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे…
🔰 महाराष्ट्र केसरी स्पर्धेतील पंच मारुती सातव यांना धमकी; पुणे जिल्हा कुस्तीगीर संघटनेकडून कोथरुड पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज
महाराष्ट्र केसरी स्पर्धा नुकतीच कोथरुड परिसरात पार पडली. या स्पर्धेत मारुती सातव यांनी पंच म्हणून काम पाहिले.
🔰 भाजपाचा नाशिक पदवीधर निवडणुकीत कोणाला पाठिंबा? गिरीश महाजनांच्या विधानामुळे संभ्रम वाढला; म्हणाले, “पाठिंबा देऊ तो…”
Nashik Election : विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघ निवडणुकीमुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे.
🔰 “शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादीच्या एकूण २०-२२ लोकांनी अर्ज केले, त्यातील…”, पृथ्वीराज चव्हाणांचं मोठं विधान
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि महाराष्ट्र काँग्रेस शिस्तपालन समितीचे सदस्य पृथ्वीराज चव्हाण यांनी या निवडणुकीत शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या एकूण २०-२२ उमेदवारांनी अर्ज केले होते, अशी माहिती दिली आहे.
🔰 “राधाकृष्ण विखे पाटील असतील भाजपाचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा”, प्रकाश आबंडेकर यांचं मोठं विधान; म्हणाले, “फडणवीसांना कदाचित…”
औरंगाबादेत पत्रकारांशी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी विविध मुद्द्यावर भूमिका स्पष्ट केली.
🔰 सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीश निवडीत केंद्र सरकारला हवा आहे हस्तक्षेप; किरण रिजिजू यांचे पत्र
केंद्रीय विधी व न्याय मंत्री किरण रिजिजू हे सुरुवातीपासून कॉलेजियम पद्धतीला विरोध करत आले आहेत.
🔰 अमरावती पदवीधर मतदारसंघात जागा कायम राखण्याचे भाजपपुढे आव्हान
या निवडणुकीत भाजप विरूद्ध कॉंग्रेस अशा थेट लढतीचे चित्र असले, तरी अन्य उमेदवारांमध्ये होणाऱ्या मतविभागणीचा फायदा किंवा नुकसान कुणाला होऊ शकतो, याचे आडाखे बांधले जात आहेत.
🔰 ठाणे : टोरंट पाॅवर वीज थकबाकीदारांची भामट्यांकडून आर्थिक फसवणुक
भामट्यांपासून सावध राहण्याचे टोरंट पाॅवर कंपनीचे आवाहन
🔰 डोंबिवलीत शुक्रवारपासून दहा दिवसांचा पुस्तक अदान प्रदान सोहळा
वाचकाने ५० रुपये किंमतीचे पुस्तक देण्यासाठी आणले असेल आणि त्याला कार्यक्रमस्थळी ५०० रुपये किंमतीचे पुस्तक आवडले तर ते पुस्तक वाचकाला स्वत: जवळील पुस्तक देऊन घेता येणार आहे.
🔰 नागपूरमध्ये महाविकास आघाडीत बिघाडी, काँग्रेसचा अडबाले यांना पाठिंबा
महाविकास आघाडीत काँग्रेसला सुटलेल्या या जागेवर काँग्रेसने विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे उमेदवार सुधाकर अडबाले यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
🔰 अफगाणिस्तानच्या कर्तृत्ववान महिला, माजी खासदार नबीजादा यांची गोळ्या झाडून हत्या; तालिबानसमोर झुकल्या नाहीत
नबीजादा या फक्त ३२ वर्षांच्या होत्या. २०१८ मध्ये त्या काबूलमधून खासदार म्हणून निवडून आल्या होत्या.
🔰 मालेगाव आणि रिसोड येथे कडकडीत बंद, शिरपूर जैन येथील घटनेचा निषेध
एका समाजातील युवकाने व्हॉट्सॲप, इंस्टाग्रामवर वादग्रस्त स्टेटस ठेवल्याने शिरपूर येथे दोन गटात वाद उफाळून आला होता.
🔰 मुंबईतील ६ हजार कोटी रुपयांच्या रस्ते कंत्राटावरून आदित्य ठाकरेंचं पुन्हा टीकास्र; शिंदे सरकारला विचारले १० प्रश्न
मुंबई महापालिकेकडून ४०० किलोमीटरच्या रस्त्यांमध्ये ६ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेना नेते तथा आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.
🔰 २५ वर्षांच्या स्ट्रीट डॉग लव्हर तरूणीला चिरडत गेली थार, चंदीगढमधली धक्कादायक घटना
थार या कारने या तरूणीला उडवलं आहे, ही मुलगी जखमी असून तिच्यावर उपचार सुरू आहेत
🔰 Government Jobs: कॉपी करणाऱ्या उमेदवारांना ‘या’ राज्यात १० वर्षांसाठी नोकरभरती बंद
सरकारी नोकरीच्या परीक्षेत कॉपी करणाऱ्या उमेदवारांना १० वर्षांसाठी केले जाणार बॅन
🔰 Virat and Dhoni Daughters: धोनी, कोहलीच्या मुलींविरोधात आक्षेपार्ह कॉमेंट करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल
Virat and Dhoni Daughters: विराट कोहली आणि महेंद्रसिंग धोनी यांच्या मुलींबाबत सोशल मीडियावर काही लोकांनी आक्षेपार्ह कॉमेंट केल्या होत्या. त्यावर आता दिल्ली महिला आयोगाने केलेल्या तक्रारीनंतर एफआयआर नोंदवण्यात आला.
This post was last modified on January 16, 2023 12:31 pm