दरम्यान थोरातांनी संगमनेर येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना आपली नाराजी व्यक्त केली आहे.त्यांनी यावेळी आपले भाचे सत्यजित तांबे यांच्या विजयाबद्दल अभिनंदन सुद्धा केले आहे आणि विधान परिषदेच्या वेळी झालेले राजकारण खूप मोठं आणि थक्क करणार होत असंही ते यावेळी म्हणाले . त्यातच त्यांनी नाना पटोले यांवर नाराजी व्यक्त केली आहे . थोरातांनी पटोलेंची तक्रार डायरेक्ट हाय कमांड कडे केल्याचेही समोर आले आहे. त्यामुळे पटोलेंच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे .
विधान परिषदेवेळी मला राजकारणातून अपमानास्पद वागणूक देण्यात आली. गोष्टी मिटवण्याऐवजी वाढवण्यात आल्या . माझ्या कुटुंबियांबद्दल वक्तव्य केली गेली. हे जर असेच राहणार असेल आणि माझ्याबद्दल एवढा राग असेल पटोलेंबरोबर काम करणं शक्य नाही. असेच राहिले तर काँग्रेसमध्ये दोन गट होतील .असेही थोरात म्हणाले.