तुमच्या अर्जाची सध्या स्थिती काय आहे?
● हे लक्षात घ्या की, तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तेथे तुम्हाला ‘In Pending To Submitted’ शिवाय आणखी दोन पर्याय दिसत आहेत.
● त्यात एक ‘SMS Verification Done’ असा पर्याय आहे. याचा अर्थ तुमच्या अर्जाची खात्रीशीर पडताळणी झाली आहे आणि दुसरा पर्याय आहे तो ‘Edit’, यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात दुरुस्ती करू शक
● हे लक्षात घ्या की, तुम्ही अर्ज सबमिट केल्यानंतर तेथे तुम्हाला ‘In Pending To Submitted’ शिवाय आणखी दोन पर्याय दिसत आहेत.
● त्यात एक ‘SMS Verification Done’ असा पर्याय आहे. याचा अर्थ तुमच्या अर्जाची खात्रीशीर पडताळणी झाली आहे आणि दुसरा पर्याय आहे तो ‘Edit’, यावर क्लिक करून तुम्ही तुमच्या अर्जात दुरुस्ती करू शकता.
● परंतु आता आणखी एक पर्याया या ठिकाणी देण्यात आला आहे. इग्रजीमधील i हे चिन्न असलेला पर्याय तुम्हाला तिथे दिसेल. त्यावर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या अर्जाच्या स्थितीविषयी माहिती मिळणार आहे.
● माझी लाडकी बहिन योजनेची तीन प्रकारची स्थिती आहे जी अर्जदारास अर्ज सबमिट केल्यानंतर प्राप्त होईल.
१. मंजूर : जेव्हा अर्जदार पात्रता निकष पूर्ण करेल आणि अर्जामध्ये कोणतीही चूक नसेल तेव्हा महाराष्ट्र राज्य सरकारद्वारे अर्ज मंजूर केला जाईल. असे झाल्यास तुम्हाला ‘Approved’ अशी स्थिती दिसेल
२. नामंजूर : अर्जदाराने पात्रतेचे निकष पूर्ण न केल्यास किंवा अर्जामध्ये चुका असल्यास महाराष्ट्र राज्य सरकार अर्ज नाकारेल. तेव्हा तुम्हाला ‘Rejected’ अशी स्थिती दिसेल.
३. प्रलंबित : आवश्यक कागदपत्रांसाठी शासन अद्याप अर्ज तपासत असताना प्रलंबित म्हणजेच ‘Pending’ असा पर्याय तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.
1 ऑगस्टला अंतिम यादी प्रसिद्ध होणार
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करण्याची मुदत 31 ऑगस्टपर्यंत वाढवण्यात आली आहे. या योजनेसाठी अर्ज केलेल्या पात्र लाभार्थ्यांची अंतिम यादी 1 ऑगस्टला प्रसिद्ध केली जाईल. त्यानंतर लाडकी बहीण योजनेचे पैसे 14 ऑगस्टला महिलांच्या खात्यात जमा करण्याची प्रक्रिया सुरु होईल. साधारण 15 ऑगस्टपर्यंत राज्यातील सर्व लाभार्थी महिलांना ही रक्कम मिळेल. ऑगस्ट महिन्यानंतर पुढे दर महिन्याच्या 15 तारखेला महिलांच्या बँक खात्यात 1500 रुपयांची रक्कम जमा होईल.