Driving license : कोणतेही वाहन चालवण्यासाठी ड्रायव्हिंग लायसन्स खूप आवश्यक आहे. जर तुमच्या लायसन्सची वैधता संपली असेल तर ते रिन्यू करणे गरजेचं आहे. जर तुम्हाला लायसन्स रिन्यू करायचे असेल तर तुम्हाला कोणत्याही आरटीओ कार्यालयात जाण्याची गरज नाही.
तुम्ही ड्रायव्हिंग लायसन्ससाठी घरबसल्याही अर्ज करू शकता. ड्रायव्हिंग लायसन्सची वैधता संपल्यानंतर ते रिन्यू करण्यासाठी 30 दिवसांची मुदत देण्यात येते. जर तुम्ही या कालावधीत लायसन्स रिन्यू केले नाही तर तुम्हाला दंड भरावा लागू शकतो.
Driving license : असे करा रिन्यू
स्टेप 1
- जर तुमच्या ड्रायव्हिंग लायसन्सचीही मुदत संपली असेल, तर तुम्ही ते रिन्यू करू शकता
- त्यासाठी तुम्हाला परिवहन सेवेच्या अधिकृत वेबसाइट, http://Parivahan.gov.in वर लावे लागेल.
स्टेप 2
- त्यानंतर तुम्हाला येथे अनेक पर्याय दिसतील
- तुम्हाला ‘लायसन्स रिन्यू’ या पर्यायावर क्लिक करावे लागणार आहे.
- त्यानंतर तुमच्यासमोर एक अर्ज येईल, जो तुम्हाला भरायचा आहे
स्टेप 3
- यात तुम्हाला नाव, ड्रायव्हिंग लायसन्स नंबर आणि मोबाईल नंबर यासारखी इतर माहिती भरून द्यावी लागेल.
- त्यानंतर तुम्हाला येथे विचारलेली कागदपत्रे अपलोड करावी लागेल.
- तसेच तुमचा पत्ता पुरावा, प्रमाणपत्र, पासपोर्ट आकाराचा फोटो आणि तुमची डिजिटल स्वाक्षरी अपलोड करावी लागणार आहे.
स्टेप 4
- सर्व कागदपत्रे अपलोड झाल्यानंतर तुम्हाला शुल्क भरावे लागेल.
- तुम्ही ऑनलाइन पद्धतीने विहित शुल्क भरू शकता.
- त्यानंतर तुमचे DL रिन्यू होईल.
This post was last modified on %s = human-readable time difference 10:12 am