2024 मध्ये इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण?
भारताच्या राजकारणात सध्या एकच चर्चा आहे, ती म्हणजे 2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी इंडिया आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण असेल? गेल्या काही दिवसांपासून या मुद्द्यावर जोरदार चर्चेचे वातावरण आहे. काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी राहुल गांधी हेच इंडिया आघाडीचे उमेदवार असतील असे स्पष्ट केले आहे. मात्र, यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
इंडिया आघाडीचा निर्णय
इंडिया आघाडीच्या पंतप्रधानपदाच्या उमेदवारपदासाठी अंतिम निर्णय 2024 च्या लोकसभा निवडणुकीच्या काही महिने आधी घेतला जाईल. त्यासाठी, सर्व सहयोगी पक्षांशी चर्चा करून एकमताने निर्णय घेतला जाईल.
‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधानपदाचे उमेदवार कोण?
‘इंडिया’ आघाडीचे पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असतील?
Asia Cup Time table: क्रिकेट चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! आता संपूर्ण आशिया कप पाहू शकता अगदी मोफत
याबाबतची महत्त्वाची माहिती समोर आली आहे.
देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सत्ताधारी भाजपासह विरोधी पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. भाजपा नेतृत्वाखालील एनडीएकडून २०२४ मध्येही पंतप्रधानपदाचे उमेदवार नरेंद्र मोदीच असतील, अशी घोषणा करण्यात आली आहे. पण ‘इंडिया’ आघाडीकडून पंतप्रधान पदाचे उमेदवार कोण असतील? याबाबत अद्याप स्पष्टता नव्हती. मात्र, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी शनिवारी ‘इंडिया’ आघाडीच्या पंतप्रधान पदाच्या उमेदवाराबद्दल महत्त्वाची माहिती दिली आहे.
‘इंडिया’ आघाडीवर भाष्य करताना गेहलोत म्हणाले की, प्रत्येक निवडणुकीत स्थानिक घटक महत्त्वाची भूमिका पार पाडत असतो. परंतु सध्या देशातील परिस्थितीमुळे सर्व पक्षांवर प्रचंड दबाव निर्माण झाला आहे. जनतेनेच असा दबाव निर्माण केला आहे. त्यामुळे सर्व विरोधी पक्षांची युती झाली आहे, असंही ते म्हणाले.
बोर्ड परीक्षांमध्ये मोठा बदल: विद्यार्थ्यांना वर्षातून दोनदा संधी!!
“पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अहंकारात राहू नये. २०१४ मध्ये भाजपाला केवळ ३१ टक्के मते मिळाली होती. उर्वरित ६९ टक्के मतं त्यांच्या विरोधात होती. गेल्या महिन्यात जेव्हा ‘इंडिया’ आघाडीच्या पक्षांची बंगळुरू येथे बैठक झाली, तेव्हा ‘एनडीए’ घाबरली आहे,” असंही गेहलोत यांनी नमूद केलं.
२०२४ च्या सार्वत्रिक निवडणुकीत एनडीए ५० टक्के मतांसह सत्तेत येईल, या दाव्यांबद्दल विचारलं असता ते म्हणाले, “पंतप्रधान मोदी हे कधीही साध्य करू शकणार नाहीत. ते जेव्हा लोकप्रियतेच्या शिखरावर होते, तेव्हा त्यांना असं करता आलं असतं. पण आता त्यांना ५० टक्के मतं मिळू शकत नाहीत. याउलट त्यांच्या मतांची टक्केवारी आणखी कमी होईल. त्यामुळे २०२४ मध्ये पंतप्रधान कोण बनेल? हे आगामी लोकसभा निवडणुकांचे निकालच ठरवतील.”