Amrut Yojna Maharashtra : योजनेचा उद्देश:
शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल घटकातील उमेदवारांना उद्योगाभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनविणे.
अमृतचा लक्षगट:
खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही स्वतंत्र शासकीय विभाग / संस्था / महामंडळा मार्फत समकक्ष योजनाचा लाभ मिळत नाही, अशा खुल्या प्रवर्गातील अमृतच्या लक्षीत गटातील जातींचा, आर्थिकदृष्टया दुर्बल घटकांतील विद्यार्थी, युवक, युवती जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा (GCC-TBC) व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार.
अमृत योजना महाराष्ट्र ही एक आर्थिक मदत योजना आहे, महाराष्ट्र सरकारने सुरू केली आहे. या योजनेत शासकीय संगणक टंकलेखन (GCC/TBC) किंवा लघुलेखन परीक्षा पास झालेल्या विद्यार्थ्यांना 6,500 रुपयांची मदत दिली जाते.
पात्रता निकष खालीलप्रमाणे :
- उमेदवार महाराष्ट्राचा रहिवासी असावा.
- उमेदवाराने 10 वी पास असणे आवश्यक आहे.
- उमेदवार शासकीय संगणक टंक लेखन (GCC-TBC) किंवा लघुलेखन परीक्षा पास झालेला असावा.
योजनेचे फायदे जाणून घ्या :
- तुम्ही 30, 40, 50, 60 WPM वेगाने मराठी / हिंदी / इंग्रजी मध्ये परीक्षा पास असाल तर, तुम्हाला 6,500 ₹ अर्थसहाय्य मिळेल.
- तुम्ही 60 ते 160 WPM पर्यंत वेगाने मराठी/हिंदी मध्ये परीक्षा पास असाल तर, तुम्हाला 5,300 रूपये आर्थिक सहाय्य मिळेल.
संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना प्रश्नावली
१. या योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक निकष काय आहेत?
> या योजनेसाठी आवश्यक शैक्षणिक निकष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने निर्धारित केल्यानुसार किमान १० वी उत्तीर्ण राहतील.
२. एकच उमेदवार एकावेळी टंकलेखन व लघुलेखन या दोन्ही विषयातील परीक्षा उत्तीर्ण झाल्यास त्यास दोन्ही परीक्षांचा लाभ मिळेल काय?
होय. यामध्ये एका सत्रात जास्तीत जास्त ०३ (तीन) विषय संगणक टंकलेखनासाठी व ०३ (तीन) विषय लघुलेखनासाठी अनुज्ञेय राहतील.
३. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यता प्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासनमान्य टंकलेखन संस्थांचे व्यतिरिक्त इतर संस्थांमध्ये परीक्षा देवून उत्तीर्ण झाल्यास योजनेचा लाभ मिळेल का?
नाही.
४. कोणते उमेदवार ह्यासाठी अर्ज करू शकतात ?
डिसेंबर २०२४ मध्ये शासकीय टांकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात.
योजनेविषयी माहितीसाठी तूम्ही https://www.mahaamrut.org.in सरकारच्या वेबसाइटला भेट देऊ शकता. व तुमच्या जिल्ह्यातील समाज कल्याण कार्यालयातही संपर्क साधू शकता.
This post was last modified on April 11, 2025 8:47 am