सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आला आहे. मासिक उत्पन्न खात्यावरील व्याज आता 7.1 टक्क्यांवरून 7.4 टक्के आणि किसान विकास पत्रावरील व्याज 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के करण्यात आले आहे.
लहान बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. केंद्र सरकारने अल्पबचत योजनांच्या व्याजदरात वाढ केली आहे. सुकन्या समृद्धी योजना, राष्ट्रीय बचत प्रमाणपत्र (NSC), किसान विकास पत्र, पोस्ट ऑफिस ठेव योजना आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजनांसाठी व्याजदर वाढवण्यात आले आहेत.
या बचत योजनांच्या व्याजदरात 10 ते 70 बेसिस पॉइंट्सने वाढ करण्यात आली आहे. मात्र, पीपीएफच्या व्याजदरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर ७.६ टक्क्यांवरून ८ टक्के करण्यात आला आहे.
मासिक उत्पन्न खात्यावरील व्याज आता 7.1 टक्क्यांवरून 7.4 टक्के आणि किसान विकास पत्रावरील व्याज 7.2 टक्क्यांवरून 7.5 टक्के झाले आहे. ज्येष्ठ नागरिक बचत योजनांमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांना आता ८ टक्क्यांऐवजी ८.२ टक्के व्याज मिळणार आहे.
फिक्स डिपॉझिटवरील व्याजदरातही वाढ सरकारने एक, दोन, तीन आणि पाच वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याजदरातही वाढ केली आहे. आता एक वर्षाच्या ठेवीवर ६.८ टक्के व्याज मिळणार आहे.
आतापर्यंत ६.६ टक्के व्याज मिळत होते. दोन वर्षांच्या मुदत ठेवींवर ६.९ टक्के व्याज दिले जाईल. यापूर्वी हा दर ६.८ टक्के होता. त्याचप्रमाणे तीन वर्षांच्या मुदत ठेवींवरील व्याज ६.९ टक्क्यांवरून ७.० टक्के करण्यात आले आहे.
गुंतवणूकदारांना आता 5 वर्षांच्या मुदत ठेवींवर 7 टक्क्यांऐवजी 7.5 टक्के व्याज मिळणार आहे. त्याच वेळी, 5 वर्षांच्या आवर्ती ठेवीवरील व्याज दर 5.80 टक्क्यांवरून 6.20 टक्के करण्यात आला आहे.