🏏 आधी श्रीलंका मग न्यूझीलंड-ऑस्ट्रेलिया; टीम इंडियाचे मार्चपर्यंतचे शेड्यूल बिजी
🎇 सरत्या वर्षाला निरोप देत देशभरात नववर्षाचे जोरदार स्वागत केले जात आहे.
नववर्षात ज्याप्रमाणे सिने जगतात धमाकेदार चित्रपटांची रेलचेल राहणार आहे, त्याचप्रमाणे क्रिकेटविश्वातही भारतीय संघाचे वर्षभर विविध दौरे असणार आहेत.
💁♂️ ज्यामध्ये भारतीय क्रिकेटसंघ मार्चपर्यंत श्रीलंका, न्यूझीलंड व त्यानंतर ऑस्ट्रेलिया सारख्या बलाढ्य संघांशी दोन हात करणार आहे. जाणून घेऊया मार्च 2023 पर्यंतचे भारतीय संघाचे व्यस्त वेळापत्रक.
📍 श्रीलंकेचा भारत दौरा :
▪️ पहिला टी-20 – 3 जानेवारी
▪️ दूसरा टी-20 – 5 जानेवारी
▪️ तिसरा टी-20 – 7 जानेवारी
▪️ पहिली एकदिवसीय – 10 जानेवारी,
▪️ दूसरा एकदिवसीय – 12जानेवारी
▪️ तिसरी एकदिवसीय – 15 जानेवारी
📍 भारताचा न्यूझीलंड दौरा :
▪️ पहिली एकदिवसीय – 18 जानेवारी
▪️ दूसरा एकदिवसीय – 21 जानेवारी
▪️ तिसरी एकदिवसीय – 24 जानेवारी
▪️ पहिला टी-20 – 27 जानेवारी
▪️ दूसरा टी-20 – 29 जानेवारी
▪️ तिसरा टी-20 – 1 फेब्रुवारी
📍 ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा :
▪️ पहिली कसोटी – 9 ते 13 फेब्रुवारी
▪️ दुसरी कसोटी – 17 ते 21 फेब्रुवारी
▪️ तिसरी कसोटी – 1 ते 05 मार्च
▪️ पहिली वनडे – 17 मार्च
▪️ दुसरी वनडे – 19 मार्च
▪️ तिसरी वनडे – 22 मार्च
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघासाठी 2022 हे वर्ष फारसे खास राहिले नव्हते. त्यामुळे आता नव्या वर्षात टीम इंडिया जागतिक क्रिकेटच्या मंचावर वर्चस्व गाजवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल.