BREAKING NEWS : VIDEO तरुणाने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर कोयत्याने हल्ला

WhatsApp Image 2023 06 27 at 2.40.23 AM

VIDEO : सदाशिव पेठेत तरुणीवर कोयत्याने हल्ला
पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली.

पुणे : पुण्याच्या ऐन मध्यवस्तीतील सदाशिव पेठेत पेरुगेट पोलीस चौकीजवळ तरुणीवर कोयत्याने हल्ला करण्यात आल्याची घटना घडली. पावन मारुती मंदिराजवळ तरूणी थांबली. त्या वेळी हल्लेखोर तरूण तेथे आला. त्याने तरुणीशी वाद घालण्यात सुरुवात केली. तरुणाने तिच्यावर कोयत्याने हल्ला केला. ही घटना उघडकीस आल्यानंतर परिसरात घबराट उडाली.

पहा व्हीडिओ : –

या घटनेची माहिती मिळताच पोलीस दाखल झाले. एकतर्फी प्रेमातून तरुणीवर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळाली असून पसार झालेल्या हल्लेखोर तरुणचा शोध घेण्यात येत आहे. एमपीएससी उत्तीर्ण दर्शना पवार हिचा खून झाल्याची घटना नुकतीच घडली. त्यांनतर पुण्यातील सदाशिव पेठेत तरुणीवर हल्ला झाल्याने खळबळ उडाली आहे.

Student suicide : विद्यार्थी आत्महत्या का करतात? काय कारण असू शकते

WhatsApp Image 2023 06 23 at 1.29.36 AM 2

प्रचंड स्पर्धेला तोंड देताना विद्यार्थ्याच्या मनावर खूप ताण येतो.

आत्महत्ये प्रमाण खूप वाढल आहे.
कोटा या शहरामध्ये गेल्या सहा महिन्यात १३ विद्यार्थ्यांनी आत्महत्त्या केल्या. २०१८ साली आयआयटीमध्ये शिकणाऱ्या ३५ मुलांनी आत्महत्त्येचा मार्ग स्वीकारला आणि दरवर्षी ही संख्या वाढतेच आहे. दहावी बारावीच्या निकालानंतरसुद्धा अशा बातम्या येतातच.

नुकतीच ज्या विद्यार्थ्याविषयी बातमी आली होती तो होता बिहारचा, एक खोली घेऊन अभ्यासासाठी कोट्यामध्ये राहिलेला जवळजवळ दीड लाख मुलांपैकी एक. डॉक्टर होण्याचे स्वप्न घेऊन आपल्या घरापासून दूर एकटा राहणारा मुलगा.

यंदा नीट परीक्षेला २० लाख मुले बसली, तर जेईईला १८ लाख मुले बसली. म्हणजे किती जणांना डॉक्टर आणि आयआयटीमधून इंजिनियर व्हायचे आहे, पाहा! अशा जीवघेण्या स्पर्धेला तोंड देताना मुलांची काय अवस्था होत असेल, कल्पनाच केलेली बरी!

आपल्या तरुणाईचा एक हिस्सा असा हकनाक गमावणे आपल्या समाजाने चालवून घेता कामा नये. म्हणूनच आधी विद्यार्थ्यांच्या मनात आत्महत्त्या करावी असे का येत असेल ते पाहिले पाहिजे. ‘माझ्या घरी सगळेच डॉक्टर आहेत! त्यामुळे मग स्वाभाविकच मीही डॉक्टर होणार, असे लहानपणापासूनच ठरले होते! पण प्रत्यक्ष परीक्षेची तयारी करताना माझ्या मनावर फारच दडपण येऊ लागले. नाहीच मिळाले चांगले मार्क तर? नाहीच मिळाली अ‍ॅडमिशन तर? चांगलाच घाबरलो. अभ्यासातले लक्षच उडाले.

सतत टेन्शन, मनात नुसती भीती. कोणाला कसे सांगायचे, काय म्हणतील मला? अरे, तुझे वडील नेहमीच पहिले आलेत, तुला काय झालं घाबरायला? त्यापेक्षा परीक्षाच नको! म्हणून शेवटी अत्म्हत्त्येकडे वळलो’ अनिकेत सांगत होता. त्याच्या आईवडलांना तर धक्काच बसला होता. त्याचे क्लास, खाणे पिणे वेळेवर होणे, सगळ्या सुखसोयी त्याला अभ्यासाला उपलब्ध करून देणे, सगळे केले होते त्यांनी. कधीच त्याच्यावर दबाव आणला नव्हता की अपेक्षा व्यक्त केल्या नव्हत्या! मग असे का?

‘नीट परीक्षा तिसऱ्यांदा दिली होती त्याने. काहीही करून यंदा मेडिकलला जायचेच असे त्याने ठरवले होते. पण परत नापास झाला आणि …’ असे अनेक अनुभव! प्रचंड स्पर्धेला तोंड देताना विद्यार्थ्याच्या मनावर खूप ताण येतो. क्लासमधले वातावरणही खेळीमेळीचे न राहता स्पर्धात्मक होते आणि प्रत्येक विद्यार्थी आपापल्या कोशात जातो.

आपल्याकडे अजूनही प्रतिष्ठेचे समजले जाणारे शिक्षणाचे पर्याय म्हणजे मेडिकल आणि इंजिनियरिंग. या व्यतिरिक्त इतके वेगवेगळे पर्याय आज उपलब्ध आहेत आणि होताहेत की सगळ्या शिक्षणाकडे पाहण्याचा रोखच बदलायला हवा आहे.

मुलांना मनावर येणारे दडपण व्यक्त करण्याची जागा असणे अत्यावश्यक आहे. आईवडील, एखादे जवळचे नातेवाईक, कुटुंबाचे स्नेही कोणाचा तरी त्याच्याशी संवाद असेल तर अनेक गोष्टी सुकर होतील. मुळात निवडलेला शिक्षणाचा मार्ग त्याला हवा असलेला आहे ना, हे पाहिले पाहिजे.

अनेक पर्यायांशी विद्यार्थ्यांची ओळख करून दिली पाहिजे. हा विश्वास दिला पाहिजे की कोणत्याही क्षेत्रात गेले तरी यश मिळते. जेव्हा मनावरचा ताण असह्य होतो, सतत चिंता वाटते, डिप्रेशन येते, आत्महत्त्येचे विचार मनात यायला लागतात, तेव्हा हा संवादाचा मार्ग उपलब्ध असेल तर वेळच्यावेळी मदत होऊ शकते.

मनोविकारतज्ज्ञाकडे नेणे, उपचार सुरू करणे, आपल्या मुलाबरोबर असणे, कधी बोलण्यातून, कधी आपल्या लहानशा स्पर्शातून, पाठ थोपटण्यातून त्याला धीर देता येईल. आपल्या मुलाच्या कठीण प्रसंगात आपण त्याच्याबरोबर असलो तर त्याला अशा बिकट प्रसंगाला तोंड देणे शक्य होईल.

‘I am a failure’ डोळ्यात पाणी आणून मनीष सांगत होता. आपल्या आईवडिलांना नापास झाल्यावर सामोरेच जायला नको. कारण आपण नापास झालो ही शरमेची गोष्ट आहे, असे त्याला वाटले. अपयश आणि यश हे दोन्ही या आयुष्यात एकदा नाही तर अनेकदा येणारे अनुभव असतात, हे समजावून सांगितले पाहिजे. यश म्हणजे तरी काय असते? परीक्षेत उत्तम मार्क मिळणे हे जसे यश आहे, तसेच घरातला नळ दुरुस्त करण्यातही यश आहे. अपयश पचवायचे तर मन सुदृढ हवे.

मनाला लवचिकता हवी. कोणत्याही प्रसंगात न डगमगून जाता त्या त्या परिस्थितीला तोंड देण्याची मानसिकता हवी. म्हणूनच केवळ मेडिकल तर मेडिकल, आयआयटी एके आयआयटीच असे न करता, माझा पहिला पर्याय, दुसरा पर्याय, तिसरा पर्याय अशी जंत्री तयार हवी. अगदी तिसऱ्या क्रमांकाची संधी मिळाली तरी मग लक्षात येईल की आपल्याला हेही शिकायला आवडते आहे आणि पुढे जाऊन तिथेही अनेक संधी आहेत.

समाजापासून तुटलेले कुटुंब, अतिशिस्तप्रिय पालक, डोळ्यावर झापडे ठेवून शिक्षणाचा विचार आणि अतिअपेक्षा अशांनी मनावरचा ताण वाढतो आणि आत्महत्त्येचा धोका वाढतो. कॉलेजजीवनात नवीन अभ्यासक्रमाबरोबर नवीन वातवरण, नवीन मित्र अशा अनेक गोष्टींशी जुळवून घ्यावे लागते. एखाद्या विद्यार्थ्याची दादागिरी करून छळवणूक (bullying) केली जाते, मुद्दाम चिडवणे, कुरापती काढणे तर कधी शारीरिक आणि लैंगिक शोषणापर्यंत काही जणांची मजल जाते.

महाविद्यालयात सजग प्राध्यापक असतील, मार्गदर्शक (mentor) असतील तर विद्यार्थ्यांना मन मोकळे करायला जागा मिळते, अन्यथा मनावरचा ताण वाढत राहतो. हेच वय बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड मिळवण्याचे असते. अशा नातेसंबंधातली ओढाताण कधी कधी मनाचे संतुलन बिघडवणारी असते. अशा विविध कारणांनी मनःस्वास्थ्य बिघडते. डिप्रेशन, अतिचिंता असे मनोविकार होतात. विद्यार्थ्यांमध्ये व्यसनांचे वाढते प्रमाण दिसून येते. वेळच्यावेळी मदत मिळणे, उपचार सुरू होणे गरजेचे असते.

महाविद्यालयामध्ये समुपदेशन केंद्र असणे, संवेदनशील प्राध्यापक असणे, आपल्या मुलाच्या मनाची आंदोलने ओळखू शकणारे पालक या काही गोष्टींमुळे आपल्याला आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर लवचिकपणे आणि आनंदाने पुढचे पाऊल टाकणारे विद्यार्थी तयार होतील.

Relations: पत्नीला पतीच्या ऐवजी प्रियकरासोबत राहण्यास उच्च न्यायालयाची परवानगी….

WhatsApp Image 2023 06 20 at 3.30.26 AM

एका प्रकरणात उच्च न्यायालयाने विवाहित महिलेला पतीच्या ऐवजी तिच्या प्रियकरसोबत राहण्याची परवानगी दिली. एक विवाहित स्त्री तिच्या प्रियकरासोबत स्वतःच्या इच्छेने राहते त्यामुळेच तिला तिच्या प्रियकरासोबत राहण्याची परवानगी देण्यात आली आहे.

उत्तराखंड उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला असून याप्रकरणी विवाहितेच्या पतीने न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्याने सांगितले होते की, आमचे दोघांचे २०१२ मध्ये लग्न झाले आणि त्यानंतर आम्हाला दोन मुले झाली. आम्हा दोघांना दहा वर्षांचा मुलगा आणि सहा वर्षांची मुलगी आहे. ऑगस्ट 2022 मध्ये माझी पत्नी माहेरी गेली. यानंतर मला वाटले की ती तिच्या मैत्रिणीसोबत राहत आहे. जे प्रकरणातील प्रतिवादी क्रमांक 9 आहे. पतीने तक्रारीत म्हटले आहे की, तीच्या मित्राने माझ्या पत्नीला बेकायदेशीरपणे त्यांच्या घरी ठेवले आहे याविषयी त्याने रिट याचिका दाखल केली होती आणि बायकोचा ताबा मिळावा अशी मागणीही केली होती.

न्यायालयाच्या सुनावणीदरम्यान त्या व्यक्तीच्या पत्नीला न्यायालयात हजर राहण्याचे सांगण्यात आले. त्यानुसार याचिकाकर्त्याची पत्नी न्यायालयात हजर राहिली. तिने न्यायालयात सांगितले की तिचा पती आणि या खटल्यातील मुख्य याचिकाकर्ता तिच्याशी चांगलं वागत नाही,गैरवर्तन करतो, म्हणूनच मला त्याच्या घरात राहायचे नाही आणि मी माझ्या इच्छेनुसार माझ्या मित्रासोबत राहतो. केवळ किंवा महिलेच्या पतीचे आरोप घातक आहेत. मात्र पतीने हे आररोप फेटाळले. लाइव्ह लॉने याविषयी वृत्त दिले आहे.

न्यायमूर्ती मनोज कुमार तिवारी आणि न्यायमूर्ती पंकज पुरोहित या दोघांच्या खंडपीठाने दोन्ही बाजू ऐकल्या. त्यानी या प्रकरणातील मुख्य याचिकाकर्त्याने म्हणजे महिलेच्या पतीला दिलासा दिला नाही. या प्रकरणात, न्यायालयाने म्हटले आहे की प्रतिवादी क्रमांक 9 म्हणजे त्या महिलेचा मित्र तिच्या स्वेच्छेने राहत आहे. म्हणूनच तिला तशीच राहण्याची संमती दिली आहे हे सांगत महिलेच्या पतीने दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली.

TOP News Update: सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

📙 रेशन कार्डधारकांनो 30 जूनपर्यंत करा ‘हे’ काम अन्यथा …..‼️

👇येथे पहा सविस्तर 👇
https://davandi.in/2023/05/14/ration-card-रेशन-कार्डधारकांनो-30-जून/

💁‍♂️ आत्मनिर्भर भारतासाठी संरक्षण मंत्रालयाचा मोठा निर्णय; अंतर्गत संरक्षण विभागाने 928 संरक्षण उत्पादनांवर बंदी

🤗 कोस्टल रोडला छत्रपती संभाजी महाराजांचं नाव देणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची मोठी घोषणा!

😱 निवडणुका आल्या की नाक्यावर सभा घेणारी ही माणसं; अशा शब्दांत आशिष शेलार यांचं नाव न घेता राज ठाकरे यांनी केली टीका

📄 आवारे हत्या प्रकरणातील सहा आरोपींना 20 मे पर्यंत पोलिस कोठडी

🪀 WhatsApp 📞कॉलने देश त्रस्त बचावासाठी तत्काळ करा हे 5 काम
⬇️येथे वाचा 👇
https://davandi.in/2023/05/14/whatsapp-call-कॉलने-देश-त्रस्त-बचावास

👨🏻‍🌾 पंतप्रधान किसान योजनेचा पुढील हप्ता 26 मे ते 31 मे या कालावधीत कधीही जारी केला जाऊ शकतो.

👉 NCB आणि नौदलाची मोठी कारवाई; 12 हजार कोटी रुपयांचे ड्रग्स जप्त

🤑 ‘द केरळ स्टोरी’ बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी, 100 कोटींच्या क्लबमध्ये झाला दाखल

🤷‍♀️ कर्नाटकप्रमाणे महाराष्ट्रातूनही भाजपला हद्दपार करणार; महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्धार

🌀 बांग्लादेश, म्यानमारला मोचा चक्रीवादळ धडकण्याची शक्यता; 175किमी प्रतितास वेगाने वारे वाहणार

🎒 दहावी-झाली-बारावी-झाली आता पुढे काय
⬇️येथे वाचा👇
https://davandi.in/2023/03/15/ssc-hsc-दहावी-झाली-बारावी-झाली-आ

👍 कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांचा पुण्यातील वज्रमुठ सभेत सत्कार करणार; मविआच्या सिल्व्हर ओकवरील बैठकीत निर्णय

🏏 मेडिकाे चॅम्पियनशिप:टी 20 क्रिकेटमध्ये एनजे व्हिक्टर्सकडून आयकॉन संघाचा पराभव

👮 कर्नाटकचे पोलिस महासंचालक प्रवीण सूद यांची सीबीआय संचालकपदी नियुक्ती, 25 मे रोजी स्वीकारणार पदभार

WhatsApp CALL: कॉलने देश त्रस्त! बचावासाठी तत्काळ करा हे 5 काम

WhatsApp Image 2023 05 09 at 5.49.04 PM

1️⃣ कॉल उचलू नका : तुम्हाला एखाद्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल आला जो अननोन आहे. तो कॉल उचलू नका. कारण, असे कॉल्स तुम्हाला फसवणुकीत ढकलू शकतात.

2️⃣ पैसे कमावणाऱ्या मेसेजपासून दूर राहा : तुम्हाला आंतरराष्ट्रीय नंबरवरून मेसेज करून पैसे कमवण्याची ऑफर दिली जात असेल. तर याचं उत्तर देऊ नका आणि रिपोर्ट करा.

3️⃣ ब्लॉक नंबर : तुम्हाला एखाद्या इंटरनॅशनल नंबरवरून वारंवार कॉल येत असेल तर तो लगेच ब्लॉक करा. यासाठी तुम्हाला आधी कॉल लॉगवर जावं लागेल.

4️⃣ रिपोर्ट करा : ज्या नंबरवरून तुम्हाला सतत कॉल किंवा मेसेज येत आहेत. तो कोणत्याही स्पॅम, फसवणूक किंवा क्रिमिनल कामांचा भाग असेल तर त्याला रिपोर्ट करा.

5️⃣ टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन ऑन करा : तुम्ही कोणताही संभाव्य धोका टाळण्यासाठी टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन चालू केले नसेल. तर ते लगेच इनेबल करा.

TOP NEWS:सकाळच्या महत्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 5 मे 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्याच्या विविध भागात अवकाळीचा कहर : शेती पिकांचं मोठ नुकसान; तर वादळी वाऱ्यामुळं लग्नकार्यात देखील अडथळा.

● पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेच्या (DRDO) संचालकांना एटीएसकडून अटक; हनिट्रॅपमध्ये सापडून पाकिस्तानला संवेदनशील माहिती दिल्याचा संशय.

जळगावात सोन्याचे दर पुन्हा विक्रमी पातळीवर;गेल्या 24 तासात 1000 रुपयांची वाढ, प्रतितोळा दर 63500 वर.

● मुंबई – पुणे एक्सप्रेस वे वरील लोणावळा घाटातील अपघाताचे 5 ब्लॅकस्पॅाट निश्चित; हाईट बॅरेकेट्स लावण्यास सुरुवात.. वाढत्या अपघातानंतर प्रशासनाला जाग.

मुंबई भांडवलदारांची बटीक करण्याचा प्रयत्न, भाजपचा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याशी कसलाही संबंध नाही; संजय राऊतांचा कर्नाटकमध्ये हल्लाबोल.

मोठ अस्मानी संकट! वर्षातील पहिले चक्रीवादळ धडकणार, बंगाल – ओडिसाला हाय अलर्ट जारी.

● आयटी कंपन्या मंदीच्या विळख्यात? कॉग्निझंटच्या नफ्यात फक्त 3 टक्क्यांची वाढ झाल्यामुळे कंपनीने 3,500 कर्मचाऱ्यांना कमी करण्याचा निर्णय घेतला.

● IPL 2023 KKR vs SRH : अटीतटीच्या लढतीत कोलकात्याचा हैद्राबादवर पाच धावांनी विजय.

Aadhaar Card, Lock, Unlock, Fraud Alert:आज आपलं आधार कार्ड आपल बँक अकाऊंट, पॅन कार्ड आणि इतर माहिती सगळीकडे जोडले गेलेले आहे.त्यामुळे जर ही माहिती

WhatsApp Image 2023 04 15 at 12.25.58 PM

ही माहिती चुकीच्या व्यक्तीच्या हाती लागली तर ते तुमचे सर्व अकाऊंट एका क्षणात खाली करू शकतात.

WhatsApp Image 2023 04 15 at 12.26.37 PM

आता तुम्ही म्हणाल बायोमेट्रिक कसं चोरणार ?
हो ते देखील चोरी होऊ शकतं…

बायोमेट्रिक ओळख सुधा चोरली जाऊ शकते याची बरीच उदाहरणे तुम्हाला बातम्यांमध्ये मिळतील, जमिनीच्या कागदपत्रांवरून अंगठ्याचे ठसे चोरून झालेली आधार कार्ड फसवणूक ची केस, त्यानंतर नकली रबरचा अंगठा बनवून झालेली फसवणूक बरच काही.
आता ही बायोमेट्रिक माहिती ती व्यक्ती तिथे नसतानाही आधार मधून चोरली जाऊ शकते हे तुम्हाला कळलं असेलच मग आता त्यापासून वाचायचं कसं ?

तुम्ही ही माहिती जपण्यासाठी तुमचं आधार लॉक 🔐 करू शकता आणि जेव्हा तुम्हाला गरज असेल तेव्हाच अनलॉक 🔓 करू शकता.

यासाठी काय लागेल ?
UIDAI ला लॉक करण्यासाठी १६ अंकांचा व्हीआयडी नंबर असणे गरजेचे आहे.

कार्ड लॉक करायचे असेल तर VID आवश्यक आहे. जर एखाद्याकडे व्हीआयडी नसेल तर तो एसएमएस सेवा किंवा वेबसाइटद्वारे जनरेट करू शकतो.

आधार लॉक करण्याची प्रक्रिया
१.सर्वप्रथम युआयडीएआय च्या वेबसाईटवर जा लिंक बायो मध्ये आहेच.
२. मग माय आधारवर क्लीक करून आधार लॉक-अनलॉक वर क्लिक करा

WhatsApp Image 2023 04 15 at 12.26.37 PM 1

३) आधार नंबरवर व्हिआयडी टाका.
४) Captcha भरून OTP नंबर येण्यासाठी क्लिक करा.
५) तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबरवर आलेला ओटीपी क्रमांक टाका.
६) आलेला ओटीपी नंबर टाकल्यावर सबमिट करा बटणावर क्लिक करा
तुमची बायोमेट्रिक माहिती लॉक केली जाईल.

तुम्हाला याचा परत उपयोग करायचा असेल तर ही माहिती अनलॉक करावी लागेल. ती सुधा याच प्रक्रियेने होईल फक्त अगोदर जिथे तुम्हाला लॉक चा पर्याय निवडला होता तिथे अनलॉक चा पर्याय निवडा आणि OTP टाकून सबमिट करा

आहे ना सोप्प ..

मग आजच आपलं आधार लॉक करा आणि फसवणूक होण्यापासून वाचा…

ही महत्त्वाची माहिती जास्तीत जास्त शेअर करा

Morning Barking News:सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट : 15 एप्रिल 2023

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

राज्यात कोरोनाचेरुग्ण वेगाने वाढत आहेत – शुक्रवारी १ हजार १५२ नवे रुग्ण आढळले – तर ४ जणांचा मृत्यू झाला

हवामान विभागाने सांगितले – उत्तर महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये मेघगर्जना, विजांचा कडकडाट आणि सोसाट्यासह मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे.

यामध्ये सांगली, सोलापूर, जळगाव, धुळे, नंदुरबार, परभणी, लातूर, नांदेड, हिंगोली, वाशिम, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली, नाशिक, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी या जिल्ह्यांचा समावेश आहे

काल १४ एप्रिल ला कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ ०.१७ टक्यानी वाढ झाली – त्यानुसार ब्रेंट क्रूड ऑइलची किंमत प्रति बॅरल ८६.२४ डॉलर झाले आहे

तर आज सकाळी पेट्रोल चे दर 106.42 रुपये प्रति लिटर , तर डिझेल 92.92 रुपये प्रति लिटर झाले आहे

मद्य विक्री धोरण घोटाळा: दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची सीबीआय चौकशी होणार; अरविंद केजरीवाल यांना सीबीआयने चौकशीसाठी बजावले समन्स.

शेतकरी मुलांबरोबर लग्न केल्यास मुलीस 10 लाख आणि तिच्या वडिलांच्या नावावर 5 लाख रुपये ठेव सरकारने ठेवावी; स्वाभिमानी पक्ष सरकारकडे मागणी करणार.

राहुल गांधींनी महाराष्ट्रात पाऊल ठेवण्यापूर्वी माफी मागावी : भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांची मागणी.

हैदराबादमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 125 फुटी पुतळ्याचं अनावरण, प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री केसीआर यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम.

सोन्याच्या भावात रेकॉर्ड ब्रेक वाढ; गेल्या 24 तासात 700 रुपयांची वाढ, प्रतितोळा दर 63 हजारांच्या पार.

जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर खासगी बस दरीत कोसळून झाला मोठा अपघात, अपघातामध्ये सात ते आठ जणांचा मृत्यू झाला असल्याची प्राथमिक माहिती समोर.

आता कोर्टाच्या कामात AI चा वापर होणार: कोर्टाच्या कामकाजात सुलभता यावी, याचिकाकर्त्यांना न्याय मिळावा यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावा अशी सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

सलमान खानला पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी; धमकी देणारा अल्पवयीन मुलगा मुंबई गुन्हे शाखेच्या ताब्यात.

कोरोनाचा धोका वाढला! देशात गेल्या 24 तासांत रुग्णसंख्या 11 हजारपार तर राज्यात कोरोनाच्या हजाराहून जास्त रुग्णांची नोंद.

हॅरी ब्रूकचे वादळी शतक, हैदराबादचा केकेआरवर 23 धावांनी रोमहर्षक विजय.

सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट १४ एप्रिल २०२३

WhatsApp Image 2023 03 11 at 7.29.28 AM

नोकरी देण्याच्या नावाखाली १९ वर्षीय तरुणीवर कारमध्ये सामूहिक बलात्कार, सोशल मीडियावरील मित्रानेच फसवलं

मंगल प्रभात लोढांनी फार लोड घेऊ नये” ‘त्या’ निर्णयावरून सुषमा अंधारेंनी सुनावलं
विधवा महिलांना जगण्याचा नैतिक अधिकार कसा प्राप्त होईल यावर आपली बुद्धी लोढांनी खर्ची घालावी असंही अंधारे यांनी म्हटलं आहे.

ठाणे शहरातील धूळ प्रदूषणास जबाबदार असणाऱ्यांवर TMC आकारणार दंड; महापालिकेने जारी केली मार्गदर्शक तत्त्वे

सीमावादाची सुनावणी आता लांबणीवर ते वाशिमच्या मंगरुळपीर शहरात तणावाचं वातावरण

राज्यात कोरोनाच्या हजाराहून जास्त रुग्णांची नोंद, दिल्लीत 1,527 रुग्ण आढळले

भाईंदरमध्ये तासाभरात १० लाख ६२ हजारांची घरफोडी, पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आदिवासी भागांतील डॉक्टरांची विशेष काळजी घ्या; हायकोर्टाचे राज्य सरकारला निर्देश

विरारमध्ये मोठी दुर्घटना, आंबेडकर जयंतीच्या मिरवणुकीत विजेचा शॉक लागून दोघांचा मृत्यू, ३ गंभीर

आयएमएफ-जागतिक बँकेच्या विकास समितीच्या बैठकीत निर्मला सीतारामन सहभागी.

एकनाथ शिंदे 2014 सालीच बंडाच्या पावित्र्यात होते, उद्धव ठाकरेंचा कॉल आला आणि सर्व शांत; मुख्यमंत्री शिंदे यांचे चरित्रग्रंथ लिहिणाऱ्या प्रा. प्रदीप ढवळ यांचा दावा.

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावर तारीखच नव्हे तर आता न्यायमूर्तीही मिळेना; ना. अरविंद कुमार हे कर्नाटकचे असल्यानं ते स्वतः केसांमधून गेले बाहेर, आत्तापर्यंत 5 न्यायमूर्तींनी स्वतःला केसांमधून केलं बाहेर.

‘विधवा महिलांचा यापुढे ‘गंगा भागिरथी’ असा उल्लेख करावा’, केंद्रीय मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या सचिवांना सूचना; महिला संघटनांचा आक्षेप

नंदुरबारमधील शहादा तालुक्यात घोड्यांवर ग्लॅन्डर्स रोगाचा प्रादुर्भाव, पाच किमीचा परिसर प्रतिबंधात्मक क्षेत्र म्हणून घोषित.

प्रत्येक मोबाईलमध्ये आपात्कालीन अलर्ट फीचर बंधनकारक, केंद्र सरकारचे मोबाईल बनवणाऱ्या कंपन्यांना आदेश.

देशातील 30 पैकी 29 मुख्यमंत्री कोट्यधीश; आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगन मोहन रेड्डी 510 कोटी रुपयांच्या संपत्तीसह सर्वाधिक श्रीमंत मुख्यमंत्री ठरले तर 15 लाख रुपयांच्या संपत्तीसह ममता बॅनर्जी सर्वात गरीब मुख्यमंत्री.

19 एप्रिलपासून मंत्रालयाच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ मध्यवर्ती टपाल केंद्र सुरू करणार: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती.

कर्नाटकात भाजपला पहिला धक्का, तिकीट नाकारल्याने माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी यांचा पक्षाचा राजीनामा.

संप करणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारचा दिलासा, संप काळातील ते सात दिवस पगारी रजा म्हणून ग्राह्य धरल्या जाणार.

अहमदनगर, नाशिक, छ. संभाजीनगर मध्ये विजांच्या कडकडाटासह तुफान पाऊस, पिकांचं मोठ नुकसान.

दिवसभरातील अती महत्वाच्या घडामोडी: 12-4-23

WhatsApp Image 2023 03 12 at 8.58.59 PM

अजित पवार खरंच भाजपासोबत जाणार? अंजली दमानियांच्या दाव्यावर सुप्रिया सुळेंची सूचक प्रतिक्रिया; म्हणाल्या, “पाऊस पडेल…”
सुप्रिया सुळे म्हणतात, “ट्विटर किंवा अंजलीताई यांना अजूनतरी या देशात स्वत:चं मत मांडण्याचा अधिकार…!”

…आणि भाजपवर डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे ते फलक काढण्याची वेळ
डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ वी जयंती आहे. परंतु फलकावर १२८ वी जयंती हा चुकीचा उल्लेख केल्याने काहीजणांनी तीन हात नाका येथे येऊन रस्ता अडविण्याचा प्रयत्न केला.

“मी फक्त नामधारी कर्णधार…”, रोहित शर्माने आयपीएलमधील मुंबई इंडियन्सच्या संघाबाबत केले मोठे विधान
आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सला पाच जेतेपद पटकावणारा कर्णधार रोहित शर्माने बुधवारी स्टार स्पोर्ट्सच्या एका कार्यक्रमात कर्णधारपदाबाबत बोलताना मोठा खुलासा केला आहे.

तुम्हाला आणि सुनेत्रा पवारांना राज्य सहकारी बँक घोटाळ्यात क्लीनचिट का? अजित पवार म्हणाले…
ईडीने जरंडेश्वर कारखाना घोटाळा प्रकरणाच्या आरोपपत्रात अजित पवार आणि त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या नावाचा समावेश न केल्यानं क्लीनचिट दिल्याची चर्चा सुरू झाली. यावर आता स्वतः अजित पवार यांनी भाष्य केलं.

चार महिन्यांचं प्लॅनिंग अन् सीक्रेट सीमकार्ड; सूनेनं प्रियकराच्या मदतीने काढला सासू-सासऱ्याचा काटा
सूनेनेच प्रियकराच्या मदतीने सासू सासऱ्याच्या हत्येचा कट रचल्याचं पुढे आलं आहे. मोनिका असं आरोपी महिलेचा नाव असून आशिष असं तिच्या प्रियकराचं नाव आहे.

“भाजपाबरोबर युती केल्यास राष्ट्रवादीही…”, नाना पटोलेंच्या वक्तव्यावर अजित पवार स्पष्टच म्हणाले, “काँग्रेस…”
राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी गोंदिया एपीएमसी निवडणुकीत भाजपाबरोबर युती करण्यावरून नाना पटोलेंच्या आरोप आणि टीकेला प्रत्युत्तर दिलं.

“शरद पवारांसह अजित पवार हळुवारपणे…” ‘त्या’ प्लॅनबद्दल शहाजीबापू पाटलांचा गौप्यस्फोट!
महाविकास आघाडीतीन नेत्यांच्या ‘त्या’ प्लॅनबद्दल शहाजीबापू पाटलांनी गौप्यस्फोट केला आहे.

मोदी सरकार कसं आहे? केरळच्या चर्चप्रमुखांनी मांडलं स्पष्ट मत
जाणून घ्या मॅथ्युज यांनी नेमकं काय म्हटलं आहे



😱 मोठी बातमी ! म्यानमारमध्ये सैन्याचे संपूर्ण गावावर एअर स्ट्राइक चिमुकल्यासह 100 जणांचा मृत्यू‼️
👇👇

https://davandi.in/2023/04/12/म्यानमार-मिलिटरी-म्यानम/

🤩 Amazon चा बंपर समर सेल! सेलमध्ये ‘या’ आयटमवर मोठ्या ऑफर्स‼️
👇 येथे पहा 👇
http://bit.ly/3KDdbDA
http://bit.ly/3KDdbDA

💁‍♂️ महंत डॉ. शास्त्री, पंकजा मुंडे, धनंजय मुंडे एका व्यासपीठावर…
👇 येथे पहा 👇
http://bit.ly/3zOAcOO
http://bit.ly/3zOAcOO

😱 धक्कादायक घटना : परीक्षेदरम्यान फसवणूक केल्याने एका १६ वर्षीय विद्यार्थिनीने केली आत्महत्या
👇 येथे पहा 👇
http://bit.ly/43uTw1g
http://bit.ly/43uTw1g

🤩 खुशखबर मोकळ्या जागेत किंवा घरावरती मोबाईल टॉवर लावा आणि महिन्याला 50 ते 70 हजार कमवा..‼️
👇 येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/12/खुशखबर-मोकळ्या-जागेत-किं/

🤩 शेतकऱ्यांने केला नादच पुरा ! गव्हाची कापणीसाठी चक्क लावला ‘डीजे’‼️👇
👇येथे पहा 👇
https://davandi.in/2023/04/12/royal-shetkari-शेतकऱ्यांने-केला-नादच-प/

💁‍♂️ त्वचेसाठी सनस्क्रीन वापरणे का महत्त्वाचे आहे?
👇येथे पहा 👇
https://wp.me/peIBTQ-8L

😟 “साहेब, मुलगा दारू पिऊन आम्हाला खूप मारहाण करतो”;
👇Viral Video 👇
https://aavajmaharashtracha.in/2023/04/12/video-साहेब-मुलगा-दारू-पिऊन-आ/

watermelon : कलिंगडावर मीठ टाकून खाणे – योग्य की अयोग्य? राया करा ना हो इशारा आलेच मी… सई ताम्हणकर पहिल्यांदाच गाजवणार लावणीचा फड Summer Drinks : नारळ पाणी आणि लिंबू पाणी जाणून घ्या महत्त्वाचे दहा फायदे रात्री झोपण्यापूर्वी त्वचेला लावा कोरफडीचा रस – १० जबरदस्त फायदे