अनेकदा तुम्हाला बाईक किंवा कार चालवत असताना कुत्रं मागे लागल्याचा अनुभव आला असेल. तुम्ही गाडी चालवताय आणि अचानक तुमच्यामागे कुत्रे भुंकायला लागतात. अश्या वेळी तुमचा गोंधळ उडतो तुमचेही लक्ष विचलित होते, खरंतर कुत्र्यामुळे तुम्हाला फार धोका नसला तरी अगदी जीवाच्या भीतीने आपण गाडी पळवू लागता.
आणि यामुळे कुत्रे अजून वेगाने तुमच्यामागे पळू लागतात. एवढंच नाही तर कधी कधी तर कुत्र्यांची आपापसातच भांडणे सुरु असतात आणि आपल्याला रस्ता ओलांडायलाही भीती वाटते.
अशावेळी तुम्ही कुत्र्यांना मारायची तर चूक चुकूनही करू नये. उलट तुम्हाला माहितेय हा कुत्र्यांना शांत करण्यासाठी काही सोप्या टिप्स तुम्ही वापरू शकता.
यामुळे कुत्रे चक्क शांत बसून तुम्हाला जाण्यासाठी जागा करून देऊ शकतात.
चला तर मग या ट्रिक्स आपणही जाणून घेऊया..
रस्त्यावर भुंकणाऱ्या कुत्र्यांना शांत कसं करायचं?
१) सगळ्यात मुख्य म्हणजे तुम्ही गाडीचा वेग नियंत्रणात ठेवा. विनाकारण गाडी वेगाने पळवू नकाच पण कुत्रे मागे लागल्यावर आणखी वेग वाढवण्याची चूक अजिबात करू नका.
२) कुत्र्यांच्या डोळ्यात पाहायला शिका. तुम्हाला जर त्यांची भीती वाटत असेल तर अनेकदा हे शक्य आहे की ते ही तुम्हाला घाबरत आहेत.
अशावेळी त्यांच्या नजरेला नजर दिल्यास ते निदान शांत होऊ शकतात. निरीक्षणासाठी का होईना थांबू शकतात.
३) चुकूनही ओरडू नका किंवा मारायला जाऊ नका. यामुळे त्यांना तुम्ही आक्रमक वाटाल व ते स्वतःच्या रक्षणसाठी तुमच्यावर हल्ला करू शकतात. अशावेळी कुत्र्याला प्रेमाने हाक मारा. मग जवळ घ्या
४) तुम्ही तुमचा हात पुढे करू शकता पण थेट त्याला गोंजारायला जाऊ नका. हात पुढे करा त्याला वास घेऊद्या. पण अगदी कुत्र्याच्या तोंडापाशी हात नेऊ नका
५) तुम्ही जरी कुत्र्याला मायेने कुरवाळणार असाल तरी त्याच्या मागे उभे राहा व वाकू नका त्याच्या नजरेत दिसाल अशा पद्धतीने खाली बसा. यामुळे अशावेळी कुत्रे तुमच्यावर हाताने हल्ला करण्याची भीती कमी होऊ शकते.
दरम्यान, श्वान तज्ज्ञांच्या मते, कुत्रे कोणत्याही वाहनाच्या मागे तुमच्यामुळे धावत नाहीत. वास्तविक, ते गाडीच्या टायरभोवती धावतात, ज्यावर काही कुत्र्याने आपला वास सोडला असतो.
इतर कुत्र्यांना आपले शत्रू मानतात आणि जेव्हा त्यांना तुमच्या गाडीच्या टायरमधून दुसऱ्या कुत्र्याचा वास येतो तेव्हा ते त्याच्या मागे भुंकत धावतात. यामुळे लक्षात घ्या त्यांना तुमच्यावरच हल्ला करायचा असेल याची शक्यता नगण्य आहे.