Sankashti Chaturthi May 2023 : ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला विशेष महत्त्व आहे. या दिवशी गणेशाची पूजा करण्याचा काही नियम आहेत.
ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी तिथी खालील प्रमाणे
ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथीला संकष्टी चतुर्थी साजरी केली जाते. पंचांगानुसार, चतुर्थी ८ मे २०२३ रोजी संध्याकाळी ६.१८ वाजता सुरू होत आहे, जी ९ मे २०२३ रोजी संध्याकाळी ४.०३ वाजता संपेल. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्राची पूजा केली जाते. त्यामुळे ८ मे रोजीच संकष्टी चतुर्थीचा उपवास केला जाणार आहे.
ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थीला शुभ योग जाणून घ्या
अभिजीत मुहूर्त – सकाळी ११.५१ ते दुपारी १२.४५ पर्यंत
शिवयोग – ९ मे रोजी पहाटे २.५२ ते १२.०९ पर्यंत
ज्येष्ठ नक्षत्र –८ मे रोजी सूर्योदयापासून रात्री ७.१९ पर्यंत
तुमच्या शहरातील चंद्रोदयाची वेळ:
- मुंबई, महाराष्ट्र: रात्री ०९.५६ वाजता
- पुणे, महाराष्ट्र: रात्री ०९.५१ वाजता
- नागपूर, महाराष्ट्र: रात्री ०९.३५ वाजता
- नवी दिल्ली : रात्री १०:०४ वाजता
- जयपूर, राजस्थान: रात्री १०:०५ वाजता
- अहमदाबाद, गुजरात: रात्री १०.०८ वाजता
- पाटणा, बिहार: रात्री ०९.२२ वाजता
- बंगळुरू, कर्नाटक: रात्री ०९.२२वाजता
- रायपूर, छत्तीसगड: रात्री ०९.२५वाजता
- हैदराबाद, तेलंगणा: रात्री ०९.२९वाजता
- चेन्नई, तामिळनाडू: रात्री ०९.११वाजता
- कोलकाता, पश्चिम बंगाल: रात्री ०९.०० वाजता
- लखनऊ, उत्तर प्रदेश: रात्री ०९.४३ वाजता
- चंदीगड: रात्री १०.१२ वाजता
- भुवनेश्वर, ओडिशा: रात्री ०९.०५ वाजता
- शिमला, हिमाचल प्रदेश: रात्री १०.११ वाजता
- डेहराडून, उत्तराखंड: रात्री १०:०५ वाजता
- रांची, झारखंड: रात्री ०९.१५ वाजता
ज्येष्ठ महिन्यातील संकष्टी चतुर्थी २०२३ पूजा विधी :
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर उठून स्नान इ. करून घ्या. यानंतर स्वच्छ वस्त्र परिधान करून श्रीगणेशाचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा. यानंतर गणेशाची पूजा करावी. सर्वप्रथम देवाला फुलांद्वारे जल अर्पण करावे.
यानंतर फुले, हार, दुर्वा, सिंदूर, अक्षता, नैवेद्य इ. अर्पण करावे. यानंतर तुमच्या आवडीनुसार मोदक, बुंदीच्या लाडूचा नैवेद्य दाखवावा. यानंतर पाणी अर्पण करावे. नंतर तुपाचा दिवा व उदबत्ती लावून कथेसह मंत्रोच्चार इ. करावे. शेवटी विधिवत आरती करावी. दिवसभर उपवास केल्यानंतर संध्याकाळी अर्घ्य देऊन चंद्राची पूजा करावी. यानंतर तुम्ही उपवास सोडू शकता.