💰 आपण GST देतो/घेतो पण GST ची संपूर्ण माहिती आहे का. तर आताच खालील लिंक वर जाणून घ्या संपूर्ण माहिती
जीएसटी म्हणजे काय आहे? | What is GST in Marathi
आजच्या या पोस्टमध्ये आपण GST विषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. जीएसटी काय आहे, जीएसटी चा मराठी अर्थ, आपल्या भारत देशात जीएसटी कधी लागू झाला, जीएसटी चे प्रकार, GST चे फायदे आणि जीएसटी ची कार्यपद्धती या विषयी संपूर्ण माहिती या लेखाच्या माध्यमातून समजून घेत आहोत. आपल्या भारत देशात पूर्वी अस्तित्वात असलेली कर प्रणाली बदलवून नवीन कर प्रणाली “एक देश एक कर” म्हणजेच GST लागू करण्यात आला आहे. What is gst in marathi, GST माहिती मराठी
GST म्हणजे काय आहे? (What is GST in Marathi) :-
GST म्हणजे Goods and service tax होय. जीएसटी हा ग्राहकांवर वस्तू किंवा सेवांच्या खरेदी च्या बदल्यात कर म्हणून लावण्यात येत असतो. आपल्या देशातील पूर्वीची कर प्रणाली बदलून नवीन कर प्रणाली (GST) आपल्या देशातील केंद्र सरकारच्या वतीने 1 जुलै 2017 रोजी लागू केला आहे. GST च्या माध्यमातून संपूर्ण देशभरात आता प्रत्येक वस्तूवर एकच कर लागणार आहेत. यापूर्वीचे 32 कर आता नसून एकाच कर हा GST राहणार आहेत.
आपल्या भारत देशात GST लागू होण्यापूर्वी ग्राहकांना प्रत्यक्ष कर तसेच अप्रत्यक्ष कर हा द्यावा लागत होता.
डायरेक्ट म्हणजेच प्रत्यक्ष कर मध्ये खालील कराचा समावेश होता:-
आयकर, मालमत्ता कर, महानगरपालिका कर, संपत्ती वरील कर यांचा सहभाग होता.
Indirect (अप्रत्यक्ष करात) :- उत्पादन शुल्क, कस्टम शुल्क, व्हॅट इत्यादी, विक्री कर अश्या प्रकारचे एकूण 17 कर हे पूर्वीच्या कर प्रणाली मध्ये अप्रत्यक्ष कर प्रणाली मध्ये आकारण्यात येत होते. Gst information in Marathi
Information of GST in marathi परंतु आता ही पूर्वीची प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर प्रणाली बदलून एकाच प्रकारचा कर आपल्या भारत देशात GST लागू झाला आहे. हा वस्तू व सेवांवरील कर आहे.
जीएसटी चे प्रकार किती आहेत ? Types Of GST in Marathi :-
GST(Goods and Service Tax) वस्तू व सेवा कर चे चार प्रकार पडतात. ते खाली दिलेले आहेत.
१) CGST सीजीएसटी– Central Government GST :-
CGST म्हणजे Central Goods and Services tax होय. या प्रकारात केंद्र सरकारकडून कर गोळा केला जातो. CGST हा 9% आकारला जातो.
2) SGST(एसजीएसटी) – State Government GST :-
SGST हा आपल्या भारत देशातील कोणत्याही राज्यात राज्य सरकारच्या करांतर्गत लावला जातो. राज्य तर्फे वस्तू तसेच सेवांच्या खरेदी विक्री वर SGST लावला जातो. हा कर हा 9% इतका आहे. CGST+ SGST असे मिळून १८% कर लावला जातो.
3) UTGST यूटीजीएसटी – Union Territory GST :-
UTGST हा केंद्रशासित प्रदेशांत आकारला जातो. केंद्र शासित प्रदेशात वस्तू व सेवा वर हा यूटीजीएसटी लावण्यात येतो. हा UTGST दिल्ली, अंडमान आणि निकोबार बेट, चंदीगड, दादरा नगर हवेली आणि दमन दिव, लक्षद्वीप, पुडुचेरी, जम्मू आणि काश्मीर, लद्दाख ह्या केंद्र शासित प्रदेशात लावला जातो. केंद्र शासित प्रदेशात cgst आणि utgst आकारला जातो.
४) IGST आयजीएसटी Integrated GST :-
IGST हा एका राज्यातून दुसऱ्या राज्यात लावण्यात येत असतो. समजा; तुम्ही वस्तू ही महाराष्ट्रात उत्पादित केल्यास आणि ती वस्तू तुम्हाला उत्तरप्रदेश मध्ये विकायची आहे अशा वेळेस IGST लावण्यात येते.
समाकलित जीएसटी (आयजीएसटी) या प्रकारचे जीएसटी एका राज्यातुन दुसऱ्या राज्यात केल्या जाणाऱ्या व्यापार संबधित निगडित आहे.
GST पद्धत आणण्याची गरज का पडली? :-
भारतात अस्तित्वात असलेल्या जुन्या कर प्रणाली मध्ये अनेक प्रकारच्या टॅक्स आकारले जायचे.त्यामुळे ही कर प्रणाली किचकट असायची जर तुम्हाला जुनी कर प्रणाली कशी होती हे समजून घ्यायचे असल्यास खालील उदाहरणावरून स्पष्ट होईल. GST Mahiti Marathi
जर तुम्ही कारखान्यात एक वस्तू बनविली आणि आता ती वस्तू तुम्हाला ग्राहकांपर्यंत पोहचवून विकायची आहे अशा वेळेस तुमची वास्तु तुमच्या कारखाना च्या बाहेर पडल्यास लगेच त्या वस्तूवर Excise Duty उत्पादन शुल्क आकारण्यात येत होते. कधी कधी अतिरिक्त excise duty लावण्यात येत होती. जर तुम्हाला तुमची वस्तू जर दुसऱ्या कोणत्याही राज्यात विकायची असेल तर त्या वस्तूवर एन्ट्री कर लावला जात होता. आणि जेव्हा तुमची वस्तू ग्राहकांपर्यंत पोहचेल तेव्हा त्यावर व्हॅट कर आकारला जात होता.
जर तुम्ही उत्पादित केलेली वस्तू चैनीची असेल तर त्यावर Luxury Tax लावला जात होता. त्यामुळे बऱ्याच टप्यांमधून तुमची वस्तु ग्राहकांपर्यंत पोहचे पर्यंत कर लावला जात होता. या कारणामुळे तुम्हाला एकाच वस्तूची वेगवेगळी किंमत देखील पाहायला मिळाली असेल. परंतु या सर्व उणीवा दूर करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने नवीन कर प्रणाली GST लागू केला आहे. GST Information in Marathi
GST चे दर किती आहेत? (Rates of GST ):-
GST अंतर्गत खालील प्रमाणे वस्तू व सेवा वर कर आकारण्यात येतो. GST rate information in Marathi
GST अंतर्गत आकारण्यात येणाऱ्या कराचा विचार केल्यास यामध्ये 5 प्रकारचे टॅक्स स्लॅब आहेत पहिला स्लॅब म्हणजे करमुक्त, दुसरा म्हणजे 5% कर, तिसरा म्हणजे 12% कर, चौथा म्हणजे 18% कर आणि पाचवा स्लॅब म्हणजे 28 % कर असे स्लॅब पाडले आहेत. कर पद्धतीचा विचार केल्यास जीवनावश्यक असलेल्या वस्तूंना कमी टॅक्स आणि चैनीच्या वस्तू वर अतिरिक्त tax आकारला जातो. यामध्ये शिक्षण तसेच आरोग्य सुविधा या करमुक्त आहेत. यावर कोणताही कर नाही.
GST अंतर्गत करमुक्त वस्तू किंवा सेवा:-
GST अंतर्गत काही वस्तू आणि सेवा यांना करमुक्त ठेवले आहे. त्यामध्ये जीवनावश्यक असलेल्या वस्तूंचा समावेश आहे. उदा; मीठ, ताज्या भाज्या, अन्नधान्य,वर्तमानपत्रं, सॅनिटरी नॅपकिन्स या वस्तू GST अंतर्गत करमुक्त आहेत.
GST 5% दर असणाऱ्या वस्तू आणि सेवा:-
GST अंतर्गत 5% कर असणाऱ्या स्लॅब मध्ये दैनंदिन जीवनात आपण वापरत असणाऱ्या आवश्यक वस्तू आहेत. जसे की, चहा, कॉफी, दूध पावडर, तेल, मसाले, आयुर्वेदिक औषधे, साखर,अगरबत्ती, पिझ्झा ब्रेड, खते या आवश्यक वस्तूंवर 5% इतका GST आकारला जातो.
GST 12% दर असणाऱ्या वस्तू आणि सेवा:-
GST अंतर्गत 12% दर स्लॅब मध्ये
छत्री, तूप, लोणी, चीज,स्नॅक्स, टूथपेस्ट, लोणचे, भ्रमनध्वनी, औषधे या आपण रोज वापरात असलेल्या वस्तूंवर GST हा 12% आकारला जातो.
GST 18% दर असणाऱ्या वस्तू आणि सेवा:-
Gst अंतर्गत 18% कराचा दर असलेल्या स्लॅब मध्ये खालील वस्तूचा समावेश होतो. या 18% gst दर असणाऱ्या वस्तू ह्या पेस्ट्री आणि केक्स, आइस्क्रीम, शॅम्पू, रेफ्रिजरेटर,चॉकलेट, मिनरल वॉटर, परफ्यूम, दूरदर्शन. वॉशिंग मशीन,डिटर्जंट यांचा समावेश होतो. या वस्तू सहसा मध्यम उत्पन्न गटातील लोकांकडून वापरल्या जातात.
Gst अंतर्गत 28% कराचा दर असलेल्या स्लॅब मध्ये चैनीच्या तसेच आरोग्यास अपायकारक वस्तू यांचा समावेश होतो. जसे की सिगारेट, पान मसाला, ऑटोमोबाईल्स, पंचतारांकित हॉटेल्समधील निवास वेंडिंग मशीन, डिशवॉशर, सिमेंट या वस्तूंवर Gst हा 28% आकारला जातो. Gst mahiti marathi
GST चे फायदे (Benefits of GST) :-
जीएसटी चे फायदे खालील प्रमाणे आहेत.
1)GST मुळे सर्वांना एकसमान कर द्यावा लागेल. व एकच प्रकारचा कर वस्तू व सेवा कर द्यावा लागेल.
- एकादी वस्तू घ्यायची असल्यास त्या वस्तूवर कोणत्याही राज्यात GST नुसार एकसमान कर द्यावा लागेल.
- पूर्वीच्या कर प्रणाली प्रमाणे एक वस्तूवर अनेक कर लादण्यात येणार नाही, फक्त एकच कर आता अस्तित्वात आहे.
- एक देश एक कर प्रणाली असल्यामुळे परदेशी कंपन्यांना आपल्या देशात व्यवसाय करणे सोप्पे जाईल. त्यामुळे GST चा फायदा फॉरेन investment वर पडेल.
- GST ही एक कर आकारणीची सुलभ प्रक्रिया आहे.
GST नोंदणी करण्याची पद्धत ( GST Registration Process information in Marathi):-
जर तुमच्या व्यवसायाचा टर्न ओव्हर हा 10 लाख काही राज्य करिता किंवा 20 लाख असल्यास किंवा तुम्ही इतर राज्यात तुमच्या वस्तू विकत असाल तर तुम्हाला GST registration करणे आवश्यक असते. आणि gst नंबर घ्यावा लागतो.
Gst नोंदणी करण्याची प्रक्रिया:- gst registration process
- GST registration करण्यासाठी सर्वप्रथम ऑनलाईन अर्ज करण्यासाठी www.gst.gov.in या GST portel च्या अधिकृत संकेतस्थळ ला भेट द्या.
2.. आता नवीन dashbord ओपन झाला आहे येथे मेनू वर क्लिक करून Service वर क्लिक करा.
- आता नवीन GST नोंदणी करण्यासाठी भाग A या पर्यायात तुमचा ईमेल, मोबाईल नंबर, PAN CARD ही माहिती भरा आणि otp टाकून माहिती सेव्ह करा.
- आता तुम्हाला एक TRN प्राप्त झाला असेल. TRN नंबर हा registration चा भाग दुसरा भरण्यासाठी लागेल.
- आता registration भाग b मध्ये तुमच्या व्यवसायाचे आवश्यक असलेले सर्व कागदपत्रे अपलोड करा.
Gst registration करण्यासाठीची वरील सर्व प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर तुमच्या दस्त ऐवज ची पडताळणी केली जाईल. अर्ज व्यवस्थित असल्यास अर्ज मंजूर झाल्या नंतर तुम्हाला तुमचा GST number दिला जातो. आणि तो gst number तुम्हाला तुमच्या रजिस्टर ईमेल आयडी वर सेंड केला जातो.
अश्या प्रकारे आजच्या या पोस्ट मध्ये आपण GST विषयी संपूर्ण माहिती जाणून घेतली आहे. ही माहिती आवडल्यास नक्की शेअर करा.