आधार कार्डवरील कोणती माहिती किती वेळेस अपडेट करू शकता?

आधार क्रमांक हा UIDAI द्वारे भारतातील रहिवाशांना दिलेला 12-अंकी ओळख क्रमांक आहे. एखाद्याच्या आधार कार्ड मधील माहिती अचूक असणे तसेच अद्ययावत असणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला काही कारणांमुळे तुमच्या आधार कार्डमध्ये बदल करावयाचा असेल तर हे बदल तुम्ही किती वेळा करू शकता यासाठी काही नियम आहेत ते पाहूया

आधार ऑनलाइन सेवांचा उपयोग करण्यासाठी नोंदणीकृत मोबाइल क्रमांक आवश्यक आहे. मोबाईल नंबर आपल्याला ऑनलाइन अपडेट करता येत नाही. तुमचा मोबाईल नंबर आधार ला अपडेट करण्यासाठी, तुम्हाला तुमच्या जवळच्या आधार सेवा केंद्राला किंवा आधार नोंदणी अपडेट केंद्राला भेट द्यावी लागेल.

आधार नोंदणी केंद्रात नोंदणी/सुधारणा/अपडेट फॉर्मसाठी कोणतेही अतिरिक्त शुल्क नाही. एकाच वेळी एकापेक्षा जास्त प्रकारचे अपडेट हे एक वैध अपडेट मानले जाते.

आधार कार्डमध्ये तुम्ही नाव, जन्मतारीख, लिंग किती वेळा बदलू शकता ते पाहूया

UIDAI कार्यालयाच्या आदेशानुसार , आधार कार्ड धारकांना आता त्यांच्या आधार कार्डवरील त्यांचे नाव फक्त दोनदा बदलू शकता.दोन पेक्षा जास्त वेळेस नाव बदलले जाऊ शकत नाही.

जन्मतारीख बदलणे किंवा अपडेट करणे.
आधार कार्ड मध्ये जन्मतारीख फक्त एकदाच अपडेट करू शकता. एका पेक्षा जास्त वेळा जन्मतारीख अपडेट करणे हे खूपच कमी आणि अपवादात्मक प्रकरणात करता येईल. तुमचे नाव असलेल्या वैध जन्मतारखेच्या पुराव्यासोबतच तुम्ही तुमच्या आधार कार्ड मध्ये जन्मतारीख अपडेट करू शकता.

आधार कार्डमध्ये लिंग अद्ययावत करणे
आधार मध्ये लिंग तपशील सुद्धा एकदाच अपडेट केले जाऊ शकतात. ते अपडेट करण्यासाठी तुम्ही आधार केंद्रावर जाऊन बदलू शकता आणि नंतर अपवादानुसार अपडेटच्या मंजुरीसाठी UIDAI च्या संबंधित प्रादेशिक कार्यालयाशी संपर्क साधून देखील बदलू शकता.

tc
x