भारताबरोबरच अनेक देशात गांजाची विक्री तसेच नशा करण्यावर बंदी आहे. तर अनेक देशांमध्ये गांजाची विक्री करण्यासाठी आणि वापर करण्यासाठी कायदेशीर परवानगी देण्यात यावी अशी मागणीसुद्धा सातत्याने करण्यात येत आहे. यातच आता गांजा पिणाऱ्यांसाठी सुवर्णसंधी निर्माण झाल्याची बातमी समोर आली आहे. ही बातमी वाचून तुमचासुद्धा त्यावर विश्वास बसणार नाही पण हे अगदी खर आहे.
जर्मनीमध्ये औषधसाठी गांजाची विक्री करणाऱ्या एका कंपनीमध्ये गांजा पिणाऱ्या व्यक्तींसाठी नोकरभरती काढली आहे. त्या भरतीनुसार या कंपनीमध्ये नोकरी करणाऱ्या व्यक्तीला दररोज गांजा फुकायला लागणार आहे आणि त्यासाठी त्याला पैसेदेखील मिळणार आहेत. आश्चर्याची बाब अशी की या गांजा फुंकणाऱ्या व्यक्तिला कंपनी एक लाख दोन लाख नव्हे तर महिन्याला तब्बल ७ लाखांपेक्षा जास्तीचा पगार देणार आहे. त्याप्रमाणे या व्यक्तीला वार्षिक जवळ जवळ ८८ लाख रुपयांचे पॅकेज मिळणार आहे.
या औषध कंपनीने या पदाला ‘वीड एक्स्पर्ट’ असे नाव दिले आहे. तसेच या पदावर काम करणाऱ्यांना गांजाची गुणवत्ता तपासण्याच काम करायला लागणार आहे.ही नियुक्ती करणार्या जर्मन कंपनीचे नाव Cannamedical आहे व ती ‘कॅनॅबिस सोमेलियर’ म्हणजेच गांजा तज्ञांची नियुक्ती करण्यासाठी कंपनीने एक पोस्ट जारी केली आहे. औषध म्हणून गांजाची विक्री करणारी ही कंपनी गांजाचा वास घेऊन तो चांगल्या प्रतीचा आहे की नाही ? हे तपासण्यासाठी ते कामगार शोधत आहेत. यासाठी कंपनी वार्षिक ८८ लाख रुपयांचे पॅकेजही देण्यास तयार आहे.
नेमकं काम काय करावं लागणार?
कंपनीच्या सीईओनी सांगितलं की, ऑस्ट्रेलिया, कॅनडा, पोर्तुगाल आणि डेन्मार्क सारख्या देशात गांजाची गुणवत्ता योग्यरीत्या तपासू शकेल अशा व्यक्तीच्या आम्ही शोधात आहोत. या देशांमधून जर्मनीमध्ये गांजा येतो. म्हणून या पदावर रुजू होणाऱ्या गांजा तज्ज्ञांना जर्मनीमध्ये येणाऱ्या गांजाची गुणवत्ता अचूक तपासावी लागणार आहे.
कंपनीचने सांगितलं आहे की, या पदावर काम करणारी व्यक्ती गांजा एक्सपर्ट असणे आवश्यक आहे. शिवाय संबंधित व्यक्तीकडे गांजा ओढण्याचा परवानादेखील असणे आवश्यक आहे. जर्मनीमध्ये मागील वर्षीच गांजा पिण्यासाठी कायदेशीर मान्यता देण्यात आली आहे व तो केवळ उपचारासाठीच वापरण्यात यावा, अशी अटदेखील घालण्यात आली आहे.