आजीची सायकल सवारी ! या बहाद्दराने अस केला जुगाड व्हायरल Video पाहून तुम्हाला ही हसू आल्या शिवाय राहणार नाही

आजीला सायकलवरुन नेण्यासाठी बहाद्दराने केला अनोखा जुगाड,

हा व्हायरल व्हिडीओ पाहून तुम्हालादेखील हसू आवरण कठीण होणार आहे.

मात्र, काळाच्या ओघात खेड्यापाड्यातील सायकलींची संख्या कमी झाली आहे. तरीही सायकल वापरणारे अनेकजण आढळून येतात. गावातील लोक सायकलवरुन घरातील सामान किंवा जनावरांसाठी लागणारी वैरण आणतात. त्यामुळे गावातील लोकांसाठी सायकल हे आजही महत्त्वाचे साधन आहे. पण सध्या एका सायकलकस्वाराने सायकलवरुन आजी आणि खाट एकत्र घेऊन जाण्यासाठी असा जुगाड केला आहे. ते पाहून तुम्हाला देखील हसू आवरण कठीण होणार आहे. असं का म्हणतोय ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यानंतर समजणार आहे.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एका तरुणाने सायकलच्या कैरियरवर एक भली मोठी खाट बांधल्याचं दिसत आहे. मात्र, आश्चर्याची बाब म्हणजे त्याने या खाटवर एका वृद्ध महिलेला बसवल्याचं दिसत आहे. शिवाय ही वृद्ध महिला देखील बिनधास्तपणे बसल्याचं दिसत आहे.



तर दुसरीकडे सायकल चालवणारा व्यक्ती अगदी मजेत सायकल चालवताना दिसत आहे. याचवेळी तो मोठ्या अपघाताचा बळी होण्यापासून बचावतो.

कारण एक बाईक सायकल जात आहे त्याच रस्त्यावरून जात असते त्याचवेळी सायकलस्वाराचा सायकलवरील ताबा सुटतो ज्यामुळे तो थेट बाईकला जाऊन धडकतो. दोघांचाही वेग कमी असल्याने सुदैवाने ते मोठ्या दुर्घटनेपासून ते बचावतात.

या अपघातामध्ये आजीची किंवा सायकल चालवणाराची काही चूक नाही, व्हिडिओ बनवणाऱ्यामुळे हा अपघात झाल्याचं अनेकांनी म्हटलं आहे. तर आणखी एकाने सुदैवाने कोणतीही दुर्घटना झाली नसल्याचं म्हटलं आहे.

tc
x
en English hi हिन्दी mr मराठी