आजच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट 28/4/23

◼️इंस्टाग्रामवरची मैत्री भोवली! अल्पवयीन मुलीवर कल्याणमध्ये सामूहिक बलात्कार, चौघेजण ताब्यात
या प्रकरणात एक आरोपी हा अल्पवयीन आहे त्याची रवानगी बाल सुधारगृहात करण्यात आली आहे

◼️स्थानिकांना विश्वासात घेऊनच प्रकल्प; बारसूतील प्रस्तावित रिफायनरीबाबत मुख्यमंत्र्यांची भूमिका
बारसू येथील रिफायनरी प्रकल्पाबाबत स्थानिक भूमिपुत्रांशी चर्चा केली जाईल. त्यांना विश्वासात घेऊनच हा प्रकल्प मार्गी लावला जाईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी स्पष्ट केले.

◼️बारसूत पोलिसांचे अमानुष अत्याचार,खासदार विनायक राऊत यांचा आरोप; उद्धव ठाकरे बारसूला भेट देणार
बारसू परिसरात परप्रांतीयांनी जमिनी खरेदी केल्या असून प्रकल्प झाल्यास भूमिपुत्रांचा नव्हे, तर त्यांचा फायदा होणार असल्याचे राऊत यांनी नमूद केले.

◼️मुंबई :‘बेस्ट’मध्ये मोबाइलचा मोठा आवाज बंद !स्पीकरवर गप्पा, गाणी ऐकल्यास पोलिसांत तक्रार
बस किंवा रेल्वेमधून प्रवास करताना मोबाइलवर मोठय़ा आवाजात बोलणारे, गाणी ऐकणारे किंवा वेगवेगळे व्हिडिओ पाहणारे, यांचा अन्य प्रवाशांना नेहमीच जाच होतो.

◼️“पंतप्रधान नरेंद्र मोदी हे विषारी सापासारखे…” काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगेंचं वादग्रस्त वक्तव्य, भाजपाने फटकारलं
मल्लिकार्जुन खरगे यांचं हे वक्तव्य समोर आल्यानंतर भाजपाने त्यांना चांगलंच फटकारलं आहे

◼️कर्मचाऱ्यांच्या लाडांना कात्री, कंपन्यांची तगून राहण्यासाठी धडपड
मोफत जेवण, ऑफिसमध्येच – जिम, मसाज, लाँड्री, आठवड्या-पंधरवड्याला पार्टी… भरगच्च पगार देणाऱ्या मल्टिनॅशनल कंपन्या नोकरकपातीबरोबरच अता या सुविधांतही कपात करू लागल्या आहेत.

◼️सातारा:सगळ्याच गोष्टीत राजकारण आणले, तर आयुष्याची मजाच संपून जाईल; डॉ अमोल कोल्हे
राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज साताऱ्यात खासदार छत्रपती उदयनराजे भोसले यांची सदिच्छा भेट घेतली दोघांमध्ये काही वेळ चर्चाही झाली

◼️सातारा:अजित पवार भाजपमध्ये आले तरीही त्यांना मुख्यमंत्रिपदाची संधी नाही; रामदास आठवले
मुख्यमंत्री व्हावे, अशी अनेकांची इच्छा असते. अजित पवारांचीही आहे. मात्र, ती सगळ्यांचीच पूर्ण होत नाही.

◼️‘इन्कोव्हॅक’ लस आजपासून; मुंबई महापालिकेतर्फे २४ केंद्रांवर नाकाद्वारे लसीकरण
नाकाद्वारे देण्यात येणारी ‘इन्कोव्हॅक’ ही करोना लस आज, शुक्रवारपासून मुंबई महापालिकेतर्फे शहरातील २४ केंद्रांवर देण्यात येणार आहे.

◼️ऑस्ट्रेलियातील कोळसा खाणींशी संलग्न; तीन कंपन्यांवरून विनोद अदानी पायउतार
जानेवारीअखेरीस प्रसिद्ध झालेला हिंडेनबर्ग रिसर्चचा अहवाल आणि त्यातील आरोपांमुळे अदानी समूहातील कंपन्यांच्या समभागांत झालेल्या तीव्र पडझडीच्या पार्श्वभूमीवर, विनोद अदानी हे नाव आणि त्यांची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात आली आहे.

◼️चीनच्या घुसखोरीने कराराचा भंग; राजनाथ सिंह यांनी चिनी संरक्षणमंत्र्यांना खडसावले
चीनकडून सीमेवरील करारांचे सातत्याने होत असलेले उल्लंघन म्हणजे दोन देशांमधील संबंधांचा पाया खिळखिळा करणे आहे, अशा शब्दांत संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीनचे संरक्षणमंत्री लि शांगफू यांना खडसावले.

◼️सोन्याच्या तस्करीप्रकरणी ९ परदेशी महिलांना अटक; सीमा शुल्क विभागाची कारवाई
सुमारे १० कोटी रुपयांच्या सोन्याच्या तस्करीप्रकरणी सीमा शुल्क विभागाने नऊ परदेशी महिलांना छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून अटक केली.

◼️रेल्वे गाड्यांमध्ये दर दोन दिवसांनी होतेय एक प्रसूती
मागील आर्थिक वर्ष २०२२-२३ मध्ये रेल्वे गाड्यांमध्ये १५८ प्रसूती झाल्या असून, यासाठी रेल्वे सुरक्षा दलाच्या महिला कर्मचाऱ्यांनी मदत केली आहे.

◼️आरोग्य विभागाची २३३ प्राथमिक आरोग्य केंद्रे मोडकळीस व धोकादायक!
राज्याच्या आरोग्य विभागाची अवस्था दिवसेंदिवस दयनीय होत चालली आहे. निधी अभावी आरोग्य विभाग हतबल…

tc
x