● अवकाळीचा मुक्काम वाढला : मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांत अवकाळी पाऊस बरसण्याचा हवामान खात्याचा अंदाज, विदर्भ आणि मराठवाड्यात ऑरेंज अलर्ट.
● भारत-चीन आणि भारत-पाकिस्तान सीमेवर लष्कराच्या तोफखाना युनिटमध्ये प्रथमच महिला लष्करी अधिकारी तैनात.
● कोणतेही सरकार जनतेचे नुकसान व्हावे असे कामं करत नाही – बारसूमधल्या रिफायनरी प्रकल्पाबद्दल राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते अजित पवार यांनी मत व्यक्त केले
■ सुदानमध्ये संघर्षामुळे चारशेहून अधिक लोकांचा मृत्यू; गोळीबार सुरुच
■ बॅडमिंटन एशिया चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या सात्विक-चिराग जोडीला सुवर्ण पदक
■ 8 हजार169 पदे भरणार:MPSC च्या इतिहासातील सर्वात मोठी भरती; पूर्व परीक्षा सुरळीत, 80 टक्के विद्यार्थी उपस्थित
■ महाराष्ट्राने पुनश्च दाखवले की, इथे गद्दारीला स्थान नाही, हेच येत्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीवेळी दाखवायचे- आदित्य ठाकरे
■ देशात कोरोना रुग्णसंख्या घटली, पण मृत्युदर कमी होईना; केरळमध्ये सर्वाधिक मृत्यू
■ मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर 5 महिन्यांत 40,000 हून अधिक वाहतूक नियमांचे उल्लंघन; सीटबेल्ट न लावता वाहन चालवण्याच्या 6,000 हून अधिक घटना
● जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या कुस्तीपटूंनी पंतप्रधानांना ‘…आमची पण मन की बात ऐका’ अशी आर्जवी विनंती केली.
● पुण्यामध्ये होणाऱ्या संगीतकार AR रेहमान म्युझिकल नाईटच्या आधी पोलिसांनी केली ड्रग्ज डिलरवर कारवाई. सव्वा दोन कोटींचे अमली पदार्थ जप्त.
● भिवंडी इमारत दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढला; आतापर्यंत 8 जणांचा मृत्यू, तर 10 जणांना जिवंत बाहेर काढण्यात यश.
● महाराष्ट्र दिनी पोलिसांची मोठी कारवाई : गडचिरोलीत पोलीस आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत 3 नक्षलवादी ठार.
● IPL 2023 MI vs RR : यशस्वी जयस्वालची शतकी खेळी व्यर्थ; मुंबईचा राजस्थानवर 6 गडी राखून शानदार विजय.
This post was last modified on %s = human-readable time difference 4:03 am