अभीमान आहे मज मराठी असण्याचा…,
         असायलाच हवा…!!


विषय – ” माझी मायमराठी “
शीर्षक – ” मायमराठीची किर्ती “

मराठी असे आमची
आन- बाण – शान…,
मराठी असण्याचा
आम्हांस अभीमान..!!

मराठी भाषा आमचा
ज्वलंत स्वाभीमान…,
वेळप्रसंगी देऊ आम्ही
मराठी रक्षणासाठी प्राण..!!

मराठी भाषा आमची,
असे अमृताहून गोड…,
दुसऱ्या भाषांहून अधिक
वाटे मायमराठीची ओढ…!!

मराठीस लाभली आहे,
संत साहित्यिकांची संगत…,
मराठी भाषेमुळे येते ,
आमच्या जीवनास रंगत..!!

धन्य जाहलो घेऊनी,
जन्म पावन महाराष्ट्रात…,
मायमराठीची किर्ती
पसरली दूरच्या देशांत..!!

कपाळास लावीता टिळा,
आमच्या मराठी भाषेचा…,
अंगात भिनतोय जणू,
पराक्रम शिवरायांचा..!!

🚩🚩 हर हर महादेव 🚩🚩

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
माझ्या सर्व प्रीय वाचकांना व लेखक मित्रमंडळींना मराठी भाषा गौरव दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..💐💐

©️®️
✍️…🧚🏻‍♀️एंजल वैशू
( वैशाली पडवळ )
अहमदनगर

tc
x