सकाळच्या टॉप सुपरफास्ट न्यूज अपडेट : 17 मार्च 2023

नुकसान झालेला एकही शेतकरी सुटणार नाही, 31 मे पर्यंत मदत देणार, सर्व जिल्हाधिका-यांना आदेश, कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

अमृता फडणवीसांना 1 कोटींच्या लाचेची ऑफर: महिला डिझायनरसह तिच्या वडिलांविरोधात तक्रार; धमकी व कट रचल्याचा आरोप

‘लाल वादळ’ घोंगावतच राहणार!: मागण्यांबाबत सरकारचे आदेश येईपर्यंत विसावा, अमलबजावणी न झाल्यास मुंबईत धडकणार- जे. पी. गावित

ठाण्यात करोनामुळे एकाचा मृत्यू
ठाणे जिल्ह्यात गेल्या काही महिन्यांपासून कमी झालेला करोनाचा संसर्ग पुन्हा वाढू लागला असून गुरुवारी ठाणे शहरात करोनामुळे ८२ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाल्याची बाब समोर आली आहे.

कोल्हापुरातील महालक्ष्मी मंदिरात कॅमेरा बंदी लागू
करवीर निवासिनी श्री महालक्ष्मी मंदिरात रोज नवा वाद निर्माण होत बाहे. आता वार्तांकनासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना कॅमेरा बंदी लागू करण्यात आली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरात मेघगर्जनेसह अवकाळी पावसाची हजेरी
पावसामुळे मावळ भागातील रब्बी पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता

छत्रपती संभाजीनगरमध्ये नामांतरावरून राजकीय लाभाची गणिते
छत्रपती संभाजीनगर असे शहराचे नामांतर करण्याची केंद्र सरकारच्या वतीने करण्यात आलेली कृती देशभर बहुसंख्याकांचे वर्चस्व असेल हा संदेश असल्याचे अल्पसंख्याक समाजात मानले जाते.

मला माफ करा योगीजी”, एन्काऊंटरच्या भीतीने बाइकचोर हातात पोस्टर घेऊन थेट पोलीस ठाण्यात दाखल
उत्तर प्रदेशमधल्या गुन्हेगारांमध्ये एन्काऊंटरची भिती पाहायला मिळत आहे. एन्काऊंटरच्या भितीने आतापर्यंत अनेक गुन्हेगारांनी पोलिसांसमोर आत्मसमर्पण केलं आहे.

कपिल सिब्बल यांचे एकनाथ शिंदेंवर आरोप: मुख्यमंत्री बनण्यासाठीच सरकार पाडले, आसाममध्ये भाजपच्या कुशीत जाऊन बसले

लोकसभेसाठी ‘मविआ’चे जागावाटप ठरले: ठाकरे गट 21 जागा लढवणार; राष्ट्रवादी 19 तर काँग्रेस 8 जागांवर उतरणार मैदानात

मनीष सिसोदिया यांच्यावर CBIची नवी केस: दिल्ली सरकारच्या फीडबॅक युनिटमध्ये भ्रष्टाचार आणि विरोधी नेत्यांच्या हेरगिरीचे आरोप

राहुल गांधी म्हणाले– अदानींच्या मुद्द्यावर PM घाबरले: ते मला संसदेत बोलू देणार नाहीत, पंतप्रधानांनी सांगावे अदानींशी त्यांचे नाते काय?

बालविवाहावरील कारवाई सांप्रदायिक नाही: आसामचे मुख्यमंत्री म्हणाले – लोकांना गुन्हेगारांप्रती संवेदना पण गर्भवती होणाऱ्या मुलीप्रती नाही

विराट कोहलीने RCB च्या महिला संघाची घेतली भेट, सांगितला स्वत:चा संघर्ष: म्हणाला-IPL अद्याप जिंकलेलो नाही, परंतु दरवर्षी तेवढाच उत्साही

दिल्ली कॅपिटल्स IPL 2023: डेव्हिड वॉर्नर झाला दिल्ली कॅपिटल्सचा नवा कर्णधार, तर अक्षर पटेलला मिळाले उपकर्णधारपद

बॅक टू बॅक फ्लॉप चित्रपटांनंतर अक्षय कुमारचा मोठा निर्णय: ‘ओह माय गॉड 2’ मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार नाही

🙏 ही माहिती जास्तीत-जास्त शेअर करा..!

tc
x