Mahashivaratri 2023: यंदाच्या महाशिवरात्रीला ‘या’ राशींना होणार अचानक धनलाभ? भगवान शंकराची असेल विशेष कृपा
Mahashivaratri 2023: यंदाची महाशिवरात्री काही राशीसाठी खास ठरणार आहे. जाणून घेऊया कोणत्या आहेत या राशी
Mahashivratri 2023: हिंदू धर्मात महाशिवरात्रीला विशेष असं महत्त्व आहे. या दिवशी भगवान शंकराची आराधना आणि व्रत केल्यास सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. हा सण भगवान शिव आणि माता पार्वतीला समर्पित केला आहे. दरवर्षी फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षातील चतुर्दशी तिथीला महाशिवरात्रीचा उत्सव सर्वत्र साजरा केला जातो. अशी मान्यता आहे की या शुभ दिवशी भगवान शिव आणि माता पार्वतीचा विवाह झाला होता. यंदा महाशिवरात्री १८ फेब्रुवारी २०२३ रोजी साजरी होणार आहे. तब्बल ३० वर्षांनी महाशिवरात्रीला दुर्मिळ योग
वैदिक ज्योतिषाच्या माहितीनुसार, ३० वर्षानंतर शनिदेव कुंभ राशीत भ्रमण करत आहे. तर १३ फेब्रुवारीला सूर्य सुद्धा शनीच्या कुंभ राशीत प्रवेश करणार आहे. शनी सूर्याच्या युतीने महाशिवरात्रीला अत्यंत दुर्मिळ असा शुभ संयोग तयार होत आहे. दुसरीकडे याच दिवशी भगवान शंकराच्या आराधनेचे प्रदोष व्रत सुद्धा आहे.
शनी व सूर्याची युती ही कुंभ राशीत होत असल्याने याचा सर्वाधिक लाभ हा शनीच्या स्वामित्वाच्या राशींना होऊ शकतो. कुंभ राशीला येत्या काळात गुंतवणूक व नवीन कल्पनांच्या माध्यमातून प्रगती व धनलाभाचे योग आहेत. तसेच सूर्याच्या स्वामित्वाच्या सिंह व कन्या या राशींना सुद्धा प्रचंड श्रीमंतीचे योग आहेत.
तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी..
मेष राशी
मेष राशीसाठी यंदाची महाशिवरात्र फायदेशीर ठरू शकते. तब्बल तीस वर्षांनी महाशिवरात्री दिवशी विशेष योगायोग घडत आहेत त्यामुळे याचा फायदा तुम्हाला होऊ शकतो. या दिवशी तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची देखील शक्यता आहे. महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराची उपासना करणं तुम्हाला फायद्याचं ठरू शकतं.
वृषभ राशी
महाशिवरात्रीचा दिवस तुमच्यासाठी चांगला सिद्ध होऊ शकतो. या दिवशी तुमची सर्व कामे पूर्ण होऊ शकतात. तसंच या दिवशी भगवान शंकराची तुमच्यावर विशेष कृपा राहील. तुमचा अचानक धनलाभ होऊ शकतो ज्यामुळे तुमची आर्थिक स्थिती देखील सुधारेल. तसंच महाशिवरात्री दिवशी भगवान शंकराची मनोभावे केलेली सेवा तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते
येथे पहा :- मिथुन राशी , कुंभ राशी