प्रचंड धनलाभासह व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता
Gajkesari Rajyog : होळीनंतर गजकेसरी राजयोग तयार होणार असल्याने, ‘या’ राशींचे चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे.
वैदिक ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांचे गोचर अनेक शुभ आणि अशुभ योग निर्माण करतात. ज्याचा परिणाम मानवी जीवनावर आणि पृथ्वीवर दिसून येतो. अशातच आता गुरू आणि चंद्र यांच्या संयोगाने ‘गजकेसरी योग’ तयार होणार आहे. 6 मार्चला होळी असून त्यानंतर २२ एप्रिलला देवगुरू बृहस्पति मीन राशीतून बाहेर पडून मेष राशीत प्रवेश करणार आहेत.
अशा स्थितीत गुरू आणि चंद्र एकत्र आल्याने गजकेसरी राजयोग तयार होणार असून ज्याचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर दिसून येणार आहे. पण यापैकी ३ राशी अशा आहेत, ज्यांच्यासाठी हा योग खूप फायदेशीर ठरु शकतो. या काळात या ३ राशीतील लोकांना आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. तर त्या ३ भाग्यशाली राशी कोणत्या आहेत ते जाणून घेऊया. त्या खालील प्रमाणे
धनु राशी –
गजकेसरी राजयोग तयार झाल्याने धनु राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होऊ शकतात. कारण हा योग तुमच्या राशीतून पाचव्या स्थानी तयार होणार आहे. जे अपत्य, प्रेम-विवाह आणि प्रगतीचे स्थान मानले जाते. व्यावसायिकांना या काळात यश मिळण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर प्रेमसंबंधांमध्येही गोडवा येऊ शकतो. तर ज्यांना अपत्य प्राप्तीची इच्छा आहे, त्यांना मूल होऊ शकते. तसेच, व्यावसायिक लोकांचे या काळात उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
हे ही वाचा : – या वर्षी ६ मार्चला फक्त २ तास होळी दहन! होळी दहनाचे शुभ मुहूर्त कोणते
मिथुन राशी –
गजकेसरी राजयोग मिथुन राशीच्या लोकांसाठी अनुकूल ठरू शकतो. कारण तुमच्या गोचर कुंडलीतील उत्पन्नाच्या घरात हा योग तयार होत आहे. म्हणूनच यावेळी तुमच्या उत्पन्नात चांगली वाढ होऊ शकते. त्याचबरोबर समाजात तुमचा मान-सन्मान वाढू शकतो. तसेच वैवाहिक जीवनात आनंद आणि जुन्या गुंतवणुकीतूनही फायदा होण्याची शक्यता आहे. शिवाय या काळात व्यवसायाशी संबंधित एखादा मोठा सौदा होऊ शकतो.
मेष राशी –
होळीनंतर मेष राशीच्या लोकांसाठी चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता आहे. कारण हा योग तुमच्या लग्न स्थानी तयार होणार आहे. त्यामुळे यावेळी तुमच्या आत्मविश्वासात वाढ होईल. तसेच, हा काळ प्रेम प्रकरणांसाठी खूप अनुकूल असणार आहे. दुसरीकडे, ज्यांचे लग्न झालं नाही, त्यांचे लग्न होण्याची दाट शक्यता आहे. तर विवाहित लोकांच्या आयुष्यातही आनंद दिसून येऊ शकतो. शिवाय काळात तुम्ही एखादे नवीन काम सुरु करु शकता.
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)
This post was last modified on %s = human-readable time difference 4:59 am