WhatsApp Scam : जर तुम्हाला देखील सतत काही ठराविक आंतरराष्ट्रीय नंबर्सवरुन WhatsApp वर कॉल किंवा मेसेज येत असेल तर तुम्हाला सावध होण्याची गरज आहे. कारण हा तुमच्यासोबत स्कॅम असू शकतो.
व्हॉट्सॲपचा वापर आपण सर्वच जण मोठ्याप्रमाणाच करत असतो. एक इन्स्टंट मेसेजिंग ॲप म्हणून व्हॉट्सॲप बेस्ट आहे. आपल्या नॉर्मल गप्पा-टप्पांपासून ते ऑफिसची महत्त्वाची कांमही आपण या व्हॉट्सॲपवर करत असतो.
पण हे ॲप जेवढं उपयुक्त आहे तेवढच धोकादायक आहे. आजकाल व्हॉट्सॲपद्वारे कितीतरी स्कॅम होत असून अनेकजण यात फसले जात आहेत. आता आणखी एक नवीन प्रकरण समोर आले आहे. अनेकांना आंतरराष्ट्रीय नंबरवरून अचानक कॉल येत आहेत.
हे कॉल्स इथिओपिया (+251), मलेशिया (+60), इंडोनेशिया (+62), केनिया (+254), व्हिएतनाम (+84) आणि इतर यांसारख्या वेगवेगळ्या देशांचे आहेत. तर व्हॉट्सॲप कॉल हे इंटरनेटद्वारे केले जातात. काही मीडिया रिपोर्ट्सनुसार, काही स्कॅम एजन्सी कार्यरत आहेत ज्या व्हॉट्सॲप कॉलसाठी आंतरराष्ट्रीय नंबर विकत आहेत.
कोणत्याही आंतरराष्ट्रीय कॉल शुल्काची चिंता न करता या क्रमांकांवरून कॉल करू शकतात. अशाप्रकारच्या कॉल्समुळे तुमचा फोन हॅक होऊ शकतो, तुमचे बँकिंग डिटेल्सही समोरच्यांकडे जाऊ शकतात आणि तुमचं बँक खातं मोकळं होऊ शकतो.
ट्विटरवरील अनेक वापरकर्त्यांनी आंतरराष्ट्रीय नंबरवर एकापेक्षा जास्त वेळा कॉल येत असल्याचं सांगितलं आहे. जर तुमच्याबाबतीतही असेच होत असेल आणि तुम्हाला या समस्येपासून मुक्ती मिळवायची असेल, तर तुम्हाला या नंबरवरून येणाऱ्या कॉल्सकडे दुर्लक्ष करावे लागेल.
जर तुम्हाला अचानक एखाद्या आंतरराष्ट्रीय नंबरवरून कॉल दिसला तर तो ताबडतोब डिस्कनेक्ट करा. हा नंबर देखील ब्लॉक करा. ते तुमची वैयक्तिक माहिती चोरू शकतात आणि तुम्ही तुमचे बँक खाते साफ करू शकतात.
हा WhatsApp स्कॅमही चर्चेत
लोकांना व्हॉट्सॲप मेसेजद्वारे नोकऱ्या दिल्या जात असल्याचे मेसेज येत आहेत. हे लोक कोणत्या ना कोणत्या कंपनीचे असल्याचा दावा करतात आणि दररोज पैसे पुरवण्याची चर्चा करतात. घरबसल्या आरामात काम करता येतं असं म्हणतात.
( Work from home) एकदा वापरकर्त्यांना त्यांचे पैसे मिळाले की ते स्कॅमरवर विश्वास ठेवू लागतात आणि मोठ्या घोटाळ्यात अडकतात. अशा घटना यापूर्वीही समोर आल्या आहेत. अशा प्रकरणांपासून दूर राहण्याचीही गरज आहे. सावधान रहा सतर्क रहा