चँट जीपीटी हे ओपन ए आयने जारी केलेले एक कन्व्हरसेशनल कम्युनिकेशन डायलाँग माँडेल आहे.
सोप्या मराठी भाषेत सांगायचे म्हटले तर हे एक संवाद साधण्याचे संभाषणात्मक माँडेल आहे.हे माँडेल संभाषणात्मक पदधतीने संवाद साधण्याचे काम करते.ह्याला मानवी म्हणजे ह्युमन लँग्वेजला अणि नैसर्गिक भाषेला समजुन घेण्यासाठी त्यावर आपला योग्य तो प्रतिसाद म्हणजेच फिडबँक देण्यासाठी आर्टिफिशल इंटलिजन्स तसेच मशिन लर्निगदवारे विशेषकरून ट्रेन करण्यात आले आहे.
ChatGpt: इंटरनेटवर आणि तंत्रज्ञानाच्या जगात ‘चॅट जीपीटी’ची खूप वेगाने चर्चा होत आहे. याबद्दल बरेच काही जाणून घेण्याची लोकांना उत्सुकता आहे. हे गुगल सर्चलाही टक्कर देऊ शकते, असा अनेकांचा दावा आहे.
सध्याच्या काळात ChatGpt हे सध्या खूप चर्चेत असलेला विषय आहे.
- चॅट जीपीटीचे इंग्रजी भाषेतील पूर्ण रूप म्हणजे “चॅट जनरेटिव्ह प्रीट्रेंड ट्रान्सफॉर्मर” आहे. हे ओपन आर्टिफिशियल इंटेलिजन्स या कंपनीने हे तंत्रज्ञान विकसित केलं आहे. जे एक प्रकारचे चॅट बॉट आहे.
- उद्योगपती एलॉन मस्क हे या कंपनीचे सहसंस्थापक आहेत. मस्क आणि चॅटजीपीटीचे सध्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी सॅम अल्टमन यांनी या कंपनीची स्थापना केली.
- Chat GPT ला ३० नोव्हेंबर २०२२ रोजी लाँच करण्यात आले होते. याचे अधिकृत संकेतस्थळ chat.openai.com आहे.
- चॅट जीपीटी एक कृत्रिम बुद्धिमत्ता साधन असून काही लोक याला दुसरे Google देखील म्हणत आहेत.
- आपल्याला एखादी माहिती हवी असली की आपण जसं गुगलवर सर्च करतो तसंच तुम्ही या बॉटला प्रश्न विचारू शकता. तुमच्या प्रश्नाचं उत्तर तो लगेच एका सेकंदात देतो. चॅट जीपीटीचा आपण एक प्रकारे शोध इंजिनचा प्रकार म्हणून सुद्धा विचार केला तर त्यातही काही हरकत नसावी.
- चॅट जीपीटी सध्या केवळ इंग्रजी भाषेत वापरण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर उपलब्ध आहे. मात्र, पुढे जाऊन इतर भाषांनाही जोडण्याची तरतूद करण्यात आली आहे.
- चॅट जीपीटीचा सर्वात मोठा फायदा असा आहे की, जेव्हा वापरकर्ता चॅट जीपीटीच्या सर्च इंजिवर काहीही शोधतो तेव्हा त्याला त्याच्या प्रश्नाचे संपूर्ण डिटेल्स उत्तर मिळते. म्हणजेच त्याला त्याच्या प्रश्नाची संपूर्ण तपशीलवार माहिती मिळते.
- ओपन एआयने कुठलेही मुल्य न घेता चॅट जीपीटी फ्रीमध्ये आँनलाईन उपलब्ध करून दिले आहे. ‘चॅट जीपीटी’ने जानेवारीमध्ये १०० मिलियन युजर्सचा टप्पा गाठला आहे.
This post was last modified on %s = human-readable time difference 5:08 am