सकाळ सुपरफास्ट दवंडी वृत्तसेवा:11-4-23

अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना १७७ कोटींची मदत जाहीर, राज्य सरकारचा निर्णय

भाजपा नेते विनोद तावडे यांच्या आईचं निधन, ८५ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास

एक चूक झाली आणि ‘गुगल पे’ने अनेक युजर्सच्या खात्यावर ८० हजार रुपये पाठवले, नेमकं काय घडलं? वाचा…
वापरकर्त्यांसाठी अचानक एक सुखद धक्का बसला. गुगल पेने अचानक आपल्या वापरकर्त्यांच्या खात्यावर कॅश बॅगच्या स्वरुपात जवळपास ८०,००० रुपये पाठवले. अशाप्रकारे पैसे आलेले पाहून अनेकांना आनंद झाला. मात्र, हा आनंद फार कमी काळ टिकला. गुगल पेच्या एका तांत्रिक चुकीमुळे हा सर्व प्रकार घडला.

शेतकऱ्यांसाठी चिंतादायक बातमी आहे ,यंदा देशभरात सरासरीच्या तुलनेत 94 टक्के पाऊस पडणार – तर महाराष्ट्रात जुलै आणि ऑगस्ट महिन्यात कमी पाऊस पडणार असा अंदाज स्कायमेटणे वर्तवला आहे.

केंद्र सरकारची अग्निपथ योजना कायम ठेवण्याच्या दिल्ली उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.

मुंबई महानगरपालिकेच्या सर्व रुग्णालयात तसेच सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे.

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय – पत्नी आई-वडिलांपासून वेगळं राहण्याचा हट्ट धरत असेल आणि दुसरीकडे घर घेण्याचा आग्रह धरत असेल तर पतीला घटस्फोट घेण्याचा पूर्ण अधिकार असणार, असा निर्णय उच्च न्यायालयाने दिला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा – नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे युद्धपातळीवर होणार.

GST संकलनात पुन्हा एकदा महाराष्ट्राने बाजी मारली असून मार्च महिन्यात सर्वाधिक म्हणजेच 22,695 कोटी संकलन एकट्या महाराष्ट्र राज्यात झाले आहे. तर कर्नाटक हे GST संकलन करणारे दुसरे सर्वात मोठे राज्य ठरले आहे.

भारताच्या गृहमंत्र्यांच्या अरुणाचल दौऱ्यावर चीनचा आक्षेप, अमित शाहांचं सडेतोड उत्तर;
भारताचे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशचा दौरा केल्यानंतर चीनने या भेटीवर आक्षेप घेतला. यानंतर अमित शाह यांनी अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेवरील गावात जाऊन चीनला प्रत्युत्तर दिलं.

मराठी भाषा विद्यापीठासाठी १५ दिवसांत समिती; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा; समितीत एका महानुभाव अभ्यासकाचा समावेश

पुणे : दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात ५० लाख सुवासिक फुलांची आरास
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्टतर्फे मंदिरात वासंतिक उटी आणि मोगरा महोत्सव आयोजित करण्यात आला होता

भाजपची उमेदवारी यादी पुन्हा लांबणीवर; सलग चार दिवस बैठकांचे सत्र
शहा अरुणाचल प्रदेशच्या दौऱ्यावर निघून गेल्यानंतर पक्षाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या निवासस्थानी चर्चेची दुसरी फेरी झाली.

भारतीय भूमीवर अतिक्रमण करण्याचा काळ सरला; गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन
ईशान्येकडे केलेल्या पायाभूत सुविधा आणि अन्य विकासकामांकडे लक्ष वेधत, सीमा भागाला मोदी सरकार सर्वोच्च प्राधान्य देत असल्याचा दावा शहा यांनी केला.

अदानी घोटाळय़ातील सत्य बाहेर येण्यासाठी ‘जेपीसी’ हेच प्रभावी अस्त्र; पृथ्वीराज चव्हाण यांचे शरद पवार यांना प्रत्युत्तर
हिंडनबर्गच्या अहवालाला अदानी उत्तर देऊ शकले नाहीत, त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई करु शकले नाही. राहुल गांधींनी मोदी-अदानींचे सत्य जगासमोर आणले.

देशात आणि राज्यात विरोधकांची एकजूट कायम राहील!; उद्धव ठाकरे यांना ठाम विश्वास, भाजपबरोबर जाण्याची शक्यता फेटाळली
२०२४ मध्येही मला मुख्यमंत्रीपदाची अपेक्षा नसून महाविकास आघाडीचे नेते योग्य वेळी उचित निर्णय घेतील, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.

IPL 2023 LSG vs RCB: लखनऊने बंगळुरुविरुद्ध १ विकेटने नोंदवला ऐतिहासिक विजय; पूरण-स्टोइनिसने पाडला धावांचा पाऊस

BREAKING: राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का; निवडणूक आयोगाकडून राष्ट्रवादीसह ‘कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया’ आणि ‘तृणमूल काँग्रेस’ या अन्य दोन पक्षांचाही राष्ट्रीय पक्षाचा दर्जा काढून घेतला आहे ‘या’ तीन पक्षांचा राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द
केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का दिला आहे.

IPL 2023: मुंबई इंडियन्स विजयाचे खाते उघडणार?; सलग तीन सामने गमावलेल्या दिल्ली कॅपिटल्सचे आज आव्हान
कार अपघातात जखमी झालेल्या ऋषभ पंतविना खेळणाऱ्या दिल्लीच्या संघाने सुरुवातीचे तीनही सामने गमावले आहेत.

tc
x