सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट 19-04-23

विदर्भातील शाळा 30 जून, तर इतर जिल्ह्यातील शाळा 15 जून पासून सुरु- मंत्री दीपक केसरकरानी दिली माहिती

लोकसभा निवडणुकीत भाजपच्या जागा घटण्याची भीती; समितीचा अहवाल

अर्जुन तेंडुलकरला मिळाली पहिली विकेट, मुंबई इंडियन्सची विजयी हॅट्रिक

दिल्लीत कोरोना कहर; एकाच दिवशी 1500 पेक्षाही जास्त रुग्ण; 5 जणांचा मृत्यू

समृद्धी महामार्गावर अपघात: नागपूरचे माजी रणजीपटू प्रवीण हिंगणीकर जखमी, पत्नी जागीच ठार

■बर्फात अडकलेल्या 2 जवानांना वाचवताना वीरमरण:भारत – चीन सीमेवर देशेसवा करताना वाशिम जिल्ह्याचा सुपुत्र शहीद

▪️‘महाराष्ट्र भूषण’ सोहळय़ातील दुर्घटनेची चौकशी करा, अजित पवार यांची मागणी
खारघर येथे ‘महाराष्ट्र भूषण’ पुरस्कार वितरण कार्यक्रमावेळी उपस्थित असलेल्या श्री सदस्यांना उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे १३ जणांचा बळी गेला.

▪️ सुदानमध्ये अमेरिकेच्या दबावाने २४ तासांची शस्त्रसंधी, संघर्षांत आतापर्यंत १८५ ठार, किमान १८०० जखमी
सुदानमध्ये सैन्य आणि निमलष्करी दलादरम्यान (आरएसएफ) सुरू असलेल्या संघर्षांमुळे देशभरात किमान १८५ जणांचा मृत्यू झाला आहे आणि १,८०० पेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत.

▪️अतिक हत्येप्रकरणी स्वतंत्र चौकशीसाठी याचिका, सर्वोच्च न्यायालयात २४ एप्रिल रोजी सुनावणी
कुख्यात गुंड व अतिक अहमद आणि त्याचा भाऊ अशरफ यांच्या हत्येप्रकरणी सर्वोच्च
न्यायालयाने स्वतंत्र तज्ज्ञ समितीमार्फत चौकशी करावी, अशी मागणी करणाऱ्या याचिकेवर २४ एप्रिल रोजी सुनावणी घेण्याचे मंगळवारी मान्य केले.

▪️ नेपाळमध्ये दोन बेपत्ता भारतीय गिर्यारोहकांची सुटका
सुदैवाने एका दिवसानंतर, ही २७ वर्षीय गिर्यारोहक जिवंत सापडल्याचे या मोहिमेच्या आयोजक अधिकाऱ्याने सांगितले.

▪️ बहुतांश ठिकाणी पारा चाळिशीपार; अंगाची काहिली, घामाच्या धारा
गेल्या काही दिवसांपासून वाढत असलेल्या तापमानाने मंगळवारी ठाणे जिल्ह्यात नवा उच्चांक नोंदवला.
हे ही वाचा : उष्माघात ठरू शकतो जीवघेणा बचावासाठी करा हे उपाय

▪️ भाजपला एकहाती सत्ता शक्य नाही, शिंदे गटाचे भाकीत
महाराष्ट्र राज्यातील सत्तेची सूत्रे कधीही भाजपला मिळालेली नाहीत आणि यापुढेही तशी मिळण्याची शक्यता नाही, असे निरीक्षण शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार गजानन कीर्तिकर यांनी नोंदविले आहे.

▪️दाभोलकर हत्या प्रकरण : तपासावरील न्यायालयीन देखरेख कायम ठेवण्यास उच्च न्यायालयाचा नकार
अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येशी संबंधित खटल्यात आरोपपत्र दाखल झाले असून खटलाही निकालाच्या दिशेने पुढे सरकत आहे.

▪️ जिवात जीव असेपर्यंत राष्ट्रवादीत!, अजित पवारांकडून चर्चांना पूर्णविराम
अजित पवार हे सहकारी आमदारांसह राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा गेले आठवडाभर राजकीय वर्तुळात सुरू होती.

हे ही वाचा : शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे‼️ कोरोना महामारीनंतर बांगलादेशचा गहू उद्ध्वस्त करणाऱ्या रोगाचा भारताला धोका ? साथीने जग चिंतेत!!

tc
x