सकाळच्या महत्त्वाच्या सुपरफास्ट न्यूज अपडेट: 08-04-2023

ऐन उन्हाळ्यात पावसाची हजेरी, पुढील ४८ तास धोक्याचे
राज्यात ऐन उन्हाळ्यात सर्वत्र अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. यातच पुन्हा आता हवामानखात्याकडून राज्याला अति मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.

लोकशाही नव्हे, घराणेशाही धोक्यात! अमित शहा यांची काँग्रेसवर टीका
काहीच दिवसांपूर्वी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केंब्रिज विद्यापीठामध्ये बोलताना भारतातील लोकशाही धोक्यात असल्याचे वक्तव्य केले होते.

राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कारखान्यांनाही मदत? विरोधकांना खूश करण्याची सत्ताधाऱ्यांची खेळी
पाच सहकारी साखर कारखान्यांना ८२५ कोटी रुपयांच्या कर्जाची खिरापत वा़टण्यात येणार

राज्य सरकारचा मोठा निर्णय – आता ‘वर्षा’ आणि ‘सागर’ बंगल्यावरील खर्चावर ५ कोटींची मर्यादा असणार.

मोठी बातमी ! राज्यातील 800 शाळा बोगस असल्याचे शिक्षण विभागाच्या पडताळणीत समोर आले.

प्रख्यात सिने पत्रकार व समीक्षक नरेंद्र बंडबे यामराठी माणसाची आंतरराष्ट्रीय गोल्डन ग्लोब पुरस्काराचे मतदार म्हणून निवड झाली आहे.

औरंगाबाद शहराचे नाव बदलून छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धच्या याचिकेवर सुनावणी घेण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे.

कोणत्याही शहर, रस्त्यांची नावे बदलण्याचा अधिकार हा संपूर्णपणे लोकनियुक्त सरकारचा आहे. असे सर्वोच्च न्यायालयाने यावेळी स्पष्ट करत छत्रपती संभाजीनगर करण्याच्या निर्णयाविरुद्धची याचिका फेटाळून लावली.

केंद्र सरकारचा मन कि बात कार्यक्रम आता ‘ॲमेझॉन म्युझिक’ आणि ‘ॲमेझॉन अलेक्सावर’ प्रसारित केला जाईल – अशी माहिती केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांनी दिली.

पर्यावरण मंजुऱ्यांच्या वेगात २१ पटीने वाढ; प्रकल्पांमुळे होणाऱ्या विनाशाबद्दल तज्ज्ञांना चिंता

पुणे : रिझर्व्ह बँकेचा बँकांसह वित्तीय कंपन्यांना दणका
या वित्तीय संस्थेच्या वित्तीय स्थितीची तपासणी रिझर्व्ह बँकेने केली होती. या संस्थेने कर्जदारांना कर्ज देताना व्याजाची व्यवस्थित माहिती दिली नव्हती.

कर्नाटकात काँग्रेसला उमेदवार मिळेनात -बोम्मई
काँग्रेसकडे स्वत:चे उमेदवार नसल्यामुळे ते इतर पक्षांमधून उमेदवार आयात करत आहेत असे बोम्मई म्हणाले

राज्यांना करोना सज्जतेच्या सूचना; आरोग्यमंत्र्यांकडून आढावा; रुग्णसंख्या वाढीमुळे चिंता
राज्यात गुरुवारी करोनाचे ८०३ रुग्ण आढळले होते. शुक्रवारी त्यात आणखी वाढ नोंदविण्यात आल्याने आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

व्हॉट्सअ‍ॅप मेसेजद्वारे वर्क फ्रॉम होमचं अमिष, भामट्यांनी महिलेला घातला लाखोंचा ‘ऑनलाईन’ गंडा!
वर्क फ्रॉम होमच्या नावाखाली एका महिलेला सायबर ठगांनी ८.२ लाखांचा गंडा घातला आहे.

IPL 2023 LSG vs SRH: पांड्या चमकला! निकोलसने षटकार ठोकून सामना खिशात घातला; लखनऊचा हैद्राबादवर दणदणीत विजय

tc
x