शेतकर्‍यांसाठी महत्त्वाचे कोरोना महामारीनंतर बांगलादेशचा गहू उद्ध्वस्त करणाऱ्या रोगाचा भारताला धोका ? साथीने जग चिंतेत

कोरोना महामारीनंतर, महामारी हा शब्द सर्वसामान्यांना परिचित झाला आहे. कोरोना महामारीनंतर पुढे काय होणार? जगभर हाहाकार माजला.

पुन्हा एकदा भयानक महामारी जगाच्या दारात आली आहे. मात्र या साथीचा परिणाम मानवावर नसून पिकांवर होत आहे. याला ‘प्लांट पॅन्डेमिक’ म्हणजेच पिकांवरील महामारी म्हणतात.

या साथीमुळे पिकांचे नुकसान होत असले तरी सर्वात जास्त नुकसान मानवाचे होणार आहे. त्यामुळे आता या महामारीकडे गांभीर्याने पाहिले जात आहे.पीएलओएस या संकेतस्थळावर वनस्पतींच्या साथीचा एक संशोधन अहवाल (११ एप्रिल) प्रसिद्ध करण्यात आला आहे.

Plos ही एक संस्था आहे जी जगभरातील वैद्यकीय आणि वैज्ञानिक संशोधकांना त्यांचे संशोधन अहवाल प्रकाशित करण्यास मदत करते. प्लॉसची सुरुवात 2000 मध्ये हॅरोल्ड वर्मस, पॅट्रिक ब्राउन, मायकेल आयसेन यांनी केली होती.

प्लॉस यांनी जगभरातील शास्त्रज्ञांना एक खुले पत्र लिहिले, ज्यावर 180 देशांतील 34,000 शास्त्रज्ञांनी त्यांच्या मोहिमेला पाठिंबा दर्शविला होता.

प्लँट पॅण्डेमिक (Plant Pandemic) म्हणजे काय?

नावावरूनच आपल्याला पिकांशी संबंधित महामारी असल्याचे समजते. या महामारीमुळे पिकांचा नाश होतोय. कृषी क्षेत्रात विविध बुरशीजन्य आजारांना पिकांचे सर्वात मोठे शत्रू मानले जाते. करोना विषाणूप्रमाणेच पिकांवरील रोगाचे विषाणू जलद गतीने उत्परिवर्तन (Mutation) करीत आहेत. अतिसूक्ष्म असलेले हे विषाणू वारा, पाऊस आणि मातीच्या माध्यमातून वेगाने पसरत आहेत

tc
x