राज्यातील अनेक भागामध्ये गारपीठ झाली आहे. तर हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.
या अवकाळी पावसामुळे शेतकरी अडचणीत आले आहेत. कारण अनेक ठिकाणी शेती पिकांचं नुकसान झालं आहे. तर राज्यात आजही वर्तवलेल्या पावसामुळे काही ठिकाणी पिकांचं नुकसान होण्याची दाट शक्यता आहे.
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या हाता-तोंडाला आलेला घास हिरावला आहे. गारपिटीने झालेल्या नुकसानीमुळे बळीराजाचे मोठे नुकसान झाले आहे.
दरम्यान, राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारने शेतकऱ्यांसाठी मोठं पाऊल उचललं आहे. नुकसानीची माहिती मोबाईलवरुन पाठवा असं आवाहन कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी शेतकऱ्यांना केलं आहे.
आता नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार सरसावले आहे.
नुकसानग्रस्त शेतकरी आपल्या नुकसानीची माहिती आता थेट कृषिमंत्र्यांना पाठवू तसेच सांगू शकणार आहे.
यासाठी कृषिमंत्र्यांनी काही संपर्क क्रमांक जाहीर केले आहे.
यामुळे आता बळीराजा हा थेट कृषिमंत्र्यांच्या संपर्कात असणार आहे. संपर्क क्रमांक: 9422204367 | 022-22876342 | 022-22875930 | 022-22020433