जगातील सर्वात लोकप्रिय मेसेजिंग ऍप्सपैकी एक असणार व्हॉट्सअॅप यावर अनेक जनांची वैयक्तिक माहिती उपलब्ध आहे. या माहितीमुळे जर कधी तुमचा स्मार्टफोन हॅक केला गेला तर ही माहिती गहाळ होण्याची भीती असते. यामुळे आज तुम्हाला व्हॉट्सअॅपवर कोणत्या गोष्टींची काळजी घेतली पाहिजे याबद्दलची माहिती देणार आहोत यामुळे कोणीही तुमची माहिती चोरू शकणार नाही आणि त्या माहितीचा गैरवापर करू शकणार नाही .
वैयक्तिक माहिती कशी सुरक्षित ठेवणार ?
पत्ता, मोबाईल नंबर, पासवर्ड, क्रेडिट/डेबिट कार्ड नंबर आणि बँकेचे तपशील यांसारखी वैयक्तिक माहिती व्हॉट्सअॅप च्या माध्यमातून शेअर करू नका. याशिवाय प्रोफाईल फोटो, लास्ट सीन, ऑनलाइन स्टेटस, अबाउट, स्टेटस, हू सी इट – एवरीवन, कॉन्टैक्ट्स ओन्ली , सिलेक्ट कॉन्टैक्ट्स पर्सनल कंट्रोलमध्ये घेतले जाऊ शकतात. वापरकर्त्यांनी नेहमी लक्षात ठेवावे की ते लास्ट सीन हाइड करू शकतात जेणे करून तुमची व्हॉट्सअॅप वापरल्याची शेवटची वेळ कोणाला दिसणार नाही.
सिक्युरिटी लेयर
व्हॉट्सअॅप वापरकर्ते त्यांच्या अकॉऊंटमध्ये सिक्युरिटी लेयर जोडू शकतात. यासाठी व्हॉट्सअॅप अकाउंट रीसेट किंवा पडताळणी (व्हेरिफाय) करण्यासाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशन फीचर ६ अंकी पिन टाकून सक्षम केले पाहिजे. सिमकार्ड चोरीला गेल्यानंतर हे फिचर उत्तम सिद्ध होऊ शकते.
फॉरवर्डेड मेसेज
फॉरवर्डेड मेसेजसाठी व्हॉट्सअॅपने एक लेबल तयार केले आहे. व्हॉट्सअॅपने मेसेज फॉरवर्ड करण्याची मर्यादा मर्यादित केली आहे, जेणेकरून वापरकर्ते मेसेज फॉरवर्ड करताना थोडा वेळ विचार करू शकतील आणि मगच मेसेज फॉरवर्ड करतील . व्हॉट्सअॅपने अलीकडेच एक नवीन ग्रुप फॉरवर्डिंग मर्यादा तयार केली आहे, ज्यामध्ये फॉरवर्डेड लेबल असलेले मेसेज जे पहिले अनेक ग्रुप्स वर शेअर केले जाऊ शकत होते ते एकावेळी ५ ऐवजी एकाच ग्रुपवर फॉरवर्ड केले जाऊ शकतात.
व्हॉट्सअॅप स्कॅम
व्हॉट्सअॅपवर नोकरीच्या ऑफर, रोख बक्षिसांची आमिष आणि प्रायोजित सहली जिंकण्याचे आमिष दिले जाते. या मेसेजमध्ये मालवेअर असलेल्या वेबसाइटच्या लिंक्सचा समावेश असतो . तुम्हाला असा कोणताही मेसेज मिळाल्यास, त्या मेसेजवर होल्ड करून हे खाते ‘ब्लॉक आणि रिपोर्ट’ केले जाऊ शकते ज्याने हे एक सेफ्टी पाऊल असते.
व्हॉट्सअॅप फॅक्ट चेक
व्हॉट्सअॅपवर १० फॅक्ट तपासणारे गट आहेत. जे वापरकर्त्यांची माहिती ओळखतात आणि त्याचे रिव्यू करतात. अशा प्रकारे फेक न्यूज पसरण्यापासून रोखता येईल. ही तथ्य तपासणी 11 भारतीय भाषांमध्ये उपलब्ध आहे.याचा वापर करून तुम्ही व्हॉट्सअॅप फॅक्ट जाणून घेऊ शकता.