Maharashtra Politics Live Updates:- महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना आणि भाजपच्या युतीत राष्ट्रवादी काँग्रेस सामील झाली आहे. शिंदे सरकारमध्ये अजित पवार उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊ शकतात.
याशिवाय भाजप आणि राष्ट्रवादीचे काही नेते राजभवनात दाखल झाले आहेत. आज अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाची आणि राष्ट्रवादीच्या काही नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतल्याची चर्चा आहे.महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे.
महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्षनेतेपदाचा राजीनामा देण्याच्या तयारीत असलेले अजित पवार यांनी आज (रविवार) त्यांच्या निवासस्थानी समर्थक आमदारांची बैठक घेतली, त्यानंतर ते 18 आमदारांसह राजभवनाकडे रवाना झाले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी काम करण्याची संधी न मिळाल्याने अजित नाराज असल्याचे बोलले जात आहे.
हे नेते आहेत- दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, छगन भुजबळ, किरण लह्मतेनिलेश लंके, धनंजय मुंडे, रामराजे निंबाळकर, दौलत दरोडा, मकरंद पाटील, अनुल बेनके, सुनील टिंगरे, अमोल. मिटकरी, आदिती तटकरे, शेखर निकम, निलय नाईक, अशोक पवार, अनिल पाटील
यांच्यासह राष्ट्रवादीचे 54 पैकी 30 आमदार अजित पवारांच्या बाजूने आले आहेत. राजभवनात होणाऱ्या शपथविधी सोहळ्याची तयारी सुरू झाली आहे. शिंदे सरकारमधील मंत्र्यांनी यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.