X

मोफत राशन देत नाही? मग ‘या’ नंबरवर करा कॉल

देशात गोरगरिबांसाठी, दुर्बल घटकांसाठी केंद्र सरकार मोफत धान्य वाटप योजना राबवत आहे. यामुळे कोट्यवधी गरीब कुटुंबांना स्वस्त दरात राशन मिळत आहे.

जर तुम्हाला स्वस्त धान्य दुकानदार त्रास देत असेल तर आता त्याकडे दुर्लक्ष करु नका, त्याची थेट तक्रार करा. यासाठी केंद्र सरकारने टोल फ्री क्रमांक उपलब्ध केले आहेत.

केंद्र सरकारने प्रत्येक राज्यासाठी टोल फ्री क्रमांक, हेल्पलाईन क्रमांक जाहीर केला आहे. महाराष्ट्रातील जनतेला 1800 22 4950 या क्रमांकावर संपर्क साधून तक्रार करता येईल.

लाभार्थ्यांना स्वस्त धान्य दुकानदाराची तक्रार करण्यासाठी केंद्र सरकारने संकेतस्थळही उपलब्ध करुन दिले आहे.

https://nfsa.gov.in/portal/State_UT_Toll_Free_AA या पोर्टलवरही करात येईल. तसेच या संकेतस्थळावर प्रत्येक राज्यासाठी दिलेल्या हेल्पलाईन क्रमांकावर तक्रार नोंदविता येईल.

अनेकदा रेशन कार्डसाठी अर्ज करुनही लाभार्थ्यांना लवकर रेशन कार्ड मिळत नाही. त्यांना अनेक महिने वाट पहावी लागते. याप्रकाराविरोधातही तक्रार करण्यात येणार आहे.

This post was last modified on %s = human-readable time difference 11:09 am

Davandi: