मारुतीची आरती

मारुतीची आरती

सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी | करि डळमळ भूमंडळ सिंधूजळ गगनी || कडाडिले ब्रम्हांड धाक त्रिभुवनी | सुरवर नर निशाचर त्यां झाल्या पळणी || १ || जय देव जय देव जय श्रीहनुमंता | तुमचेनी प्रसादे न भी कृतांता || धृ || दुमदुमले पाताळ उठिला प्रतिशब्द | थरथरला धरणीधर मानिला खेद | कडकडिले पर्वत उद्दगण उच्छेद | रामी रामदासा शक्तीचा शोध || जय || २ ||
……………………………………………

श्री कृष्णाची आरती

ओवाळू आरती मदनगोपाळा | श्यामसुंदर गळा वैजयंतीमाळा || धृ || चरणकमल ज्याचे अति सुकुमार | ध्वजवज्रांकृश ब्रीदाचे तोडर ओवाळू || १ || नाभिकमल ज्याचे ब्रम्हयाचे स्थान | हृदयी पदक शोभे श्रीवत्सलांछन | ओवाळू || २ || मुखकमल पाहतां सुखाचिया कोटी | वेधले मानस हारपली दृष्टी | ओवाळू || ३ || जडित मुगुट ज्याचा देदिप्यमान | तेणे तेजे कोंदले अवघे त्रिभुवन | ओवाळू || ३ || एका जनार्दनी देखियले रूप | रूप पाहतां जाहले अवघे तद्रूप | ओवाळू || ५ ||
……………………………………………

श्री ज्ञानदेवाची आरती

आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा | सेविती साधुसंत || मनु वेधला माझा || आरती || धृ || लोपलें ज्ञान जगी | हित नेणती कोणी | अवतार पांडुरंग | नाम ठेविले ज्ञानी || १ || कनकाचे ताट करी | उभ्या गोपिका नारी | नारद तुंबर हो || साम गायन
करी || २ || प्रकट गुह्य बोले | विश्र्व ब्रम्हाची केलें | रामजनार्दनी | पायी मस्तक ठेविले | आरती ज्ञानराजा | महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||
……………………………………………

श्री महालक्ष्मीची आरती


जय देवी जय देवी जय महालक्ष्मी
वससी व्यापकरूपे राहे निश्चलरूपे तू स्थूलसुक्ष्मी. जय.

करवीरपूर वासिनी सुरवर मुनिमाता
पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकांता
कमलाकारे जठरी जन्मविला धाता
सहस्त्र वदनी भूधर नपुरे गुणगाता. जय.

मातुल्लिंग गदा खेटक रविकिरणी
झळके हाटकवाटी पीयुष रसपाणि
माणिक रसना सुरंग वसना मृगनयनी
शशीकर वदना राजस मदनाची जननी. जय.

तारा शक्ती अगम्या शीवभजका गौरी
सांख्य म्हणती प्रकृती निर्गुण निर्धारी
गायत्री नीजबीजा निगमागमसारी
प्रगटे पद्मावती निजधर्माचारी. जय.

अमृत भरिते सरिते अघदुरिते वारी
मारी दुर्घट असुरा भवदुस्तर तारी
वारी माया पटल प्रणमत परिवारी
हे रूप चिद्रुप दावी निर्धारी. जय.

चतुराननाने कुश्चित कर्मांच्या ओळी
लिहिल्या असतिल माते माझे निजभाळी
पुसोनि चरणातळी पदसुमने क्षाळी
मुक्तेश्वर नागर क्षीरसागर बाळी. जय

दशावतारांची आरती
आरती सप्रेम जय जय विठ्ठल परब्रह्म ।
भक्त संकटिं नानास्वरूपीं स्थापिसि स्वधर्म ॥ ध्रु० ॥

अंबऋषीकारणें गर्भवास सोशीसी ।
वेद नेले चोरूनि ब्रह्मया आणुनियां देसी ॥
मत्स्यरूपी नारायण सप्तहि सागर धुंडीसी ।
हस्त लागतां शंखासुरा तुझा वर देसी ॥ आरती० ॥ १ ॥

रसातळासी जातां पृथ्वी पाठीवर घेसी ।
परोपकरासाठीं देवा कांसव झालासी ॥
दाढें धरुनी पृथ्वी नेतां वराहरूप होसी ।
प्रल्हादाकारणें स्तंभीं नरहरि गुरगुरसी ॥ आरती० ॥ २ ॥

पांचवे अवतारीं बळिच्या द्वाराला जासी ।
भिक्षे स्थळ मागुनीं बळीला पाताळा नेसी ॥
सर्व समर्पण केलं म्हणुनी प्रसन्न त्या होसी ।
वामनरूप धरुनी बळिच्या द्वारीं तिष्ठसी ॥ आरती० ॥ ३ ॥

सहस्त्रार्जुन मातला जमदग्नीचा वध केला ।
कष्टी ते रेणुका म्हणुनी सहस्त्रार्जुन वधिला ॥
निःक्षत्री पृथ्वी दान दिधली विप्राला ।
सहावा अवतार परशुराम प्रगटला ॥ आरती० ॥ ४ ॥

मातला रावण सर्वां उपद्रव केला ।
तेहतिस कोटी देव बंदी हरिलें सीतेला ॥
पितृवचनालागीं रामें वनवास केला ।
मिळोनि वानरसहित राजा राम प्रगटला ॥ आरती० ॥ ५ ॥
देवकीवसुदेवबंदीमोचन त्वां केलें ।
नंदाघरीं जाउनी निजसुख गोकुळा दिधलें ।
गोरसचोरी करितां नवलक्ष गोपाळ मिळविले ।
गोपिकांचें प्रेम देखुनि श्रीकृष्ण भुलले ॥ आरती० ॥ ६ ॥

बौद्ध कलंकी कलियुगीं झाला अधर्म हा अवघा ।
सोडुनी दिधला धर्म म्हणुनी न दिससी देवा ॥
म्लेंच्छमर्दन करिसी ह्मणोनि कलंकी केशवा ।
बहिरवि जान्हवी द्यावी निजसुखानंदाची सेवा ॥ आरती० ॥ ७ ॥

ज्ञानेश्वरांची आरती


आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा |
सेविती साधुसंत ||
मनु वेधला माझा || आरती || धृ ||
लोपलें ज्ञान जगी |
हित नेणती कोणी |
अवतार पांडुरंग |
नाम ठेविले ज्ञानी || १ || आरती || धृ ||
कनकाचे ताट करी |
उभ्या गोपिका नारी |
नारद तुंबर हो ||
साम गायन करी || २ || आरती || धृ ||
प्रकट गुह्य बोले |
विश्र्व ब्रम्हाची केलें |
रामजनार्दनी |
पायी मस्तक ठेविले |
आरती ज्ञानराजा |
महाकैवल्यतेजा || सेविती || ३ ||

आरती भुवनसुंदराची । इंदि…
आरती भुवनसुंदराची ।

इंदिरावरा मुकुंदाची ॥ धृ. ॥

पद्मसमपादयुग्मरंगा ।

ओंवाळणी होती भृंगा ।

नखमणि स्त्रवताहें गंगा जे कां त्रिविधतापभंगा ॥ चाल ॥

वर्तुळ गुल्फ भ्राजमानें ।

किंकिणीक्वणित नाद घणघणित, वांकिवर झुणित, नुपुरें झनन मंजिराची ॥

झनन ध्वनि मंजिराची ॥ आरती. ॥ १ ॥

पीतपट हाटकतप्त वर्णी ।

कांची नितंब सुस्थानी ॥

नाभिची अगाध हो करणी ।

विश्वजनकाची जे जननी ॥ चाल ॥

त्रिवली ललित उदरशोभा ।

कंबुगळां माळ, विलंबित झळाळ कौस्तुभ सरळ, बाहु श्रीवत्सतरळमणिमरळ कंकणाची ॥

प्रीति बहु जडित कंकणाची ॥ आरती ।। 2

इंदुसम आस्य कुंदरदना ।

अधरारुणार्क बिंबवदना ॥

पाहतां भ्रांति पडे मदना ।

सजल मेघाब्धि दैत्यदमना ॥ चाल ॥

झळकत मकरकुंडलाभा कुटिलकुंतली, मयूर पत्रावली वेष्टिले तिलक भाळी केशरी झळाळित कृष्णाकस्तुरींची ।

अक्षता काळि कस्तुरीची ॥ आरती. ॥ ३ ॥

कल्पद्रूमातळीं मूर्ती सौदामिनी कोटिदीप्ती ।

गोपीगोपवलय भवती ॥

त्रिविष्टप पुष्पवृष्टि करिती ॥ चाल ॥

मंजुळ मधुर मुरलीनादें ।

चकित गंधर्व चकित अप्सरा, सुरगिरिवरा, कर्पूराधर रतीनें प्रेमयुक्त साची ॥

आरती ओवाळित साची ॥ आरती. ॥ ४ ॥

वृंदावनीचिये हरणी ।

सखे गे कृष्ण माय बहिणी ॥

श्रमलों भवब्धिचें फिरणीं ।

आतां मज ठाव देई चरणीं ॥ चाल ॥

अहा हे पूर्ण पुण्यश्लोका ॥

नमितों चरण शरण, मी करुणा येऊं दे विषाणपाणी कृष्ण नेणतें, बाळ आपुलें राखि लाज याची ॥

दयानिधे राखि लाज याची ॥ आरती ॥ ५ ॥

श्री एकनाथाची आरती

आरती एकनाथा | महाराजा समर्था | त्रिभुवनी तूंचि थोर | जगदगुरू जगन्नाथा || धृ || एकनाथ नाम सार | वेदशास्त्रांचे गूज | संसारदु:ख नाम | महामंत्राचे बीज | आरती || १ || एकनाथ नाम घेतां | सुख वाटले चित्ता | अनंत गोपाळदासा | धणी न पुरे गातां | आरती एकनाथा | महाराजा समर्था || २ ||
……………………………………………
श्री तुकारामाची आरती

आरती तुकारामा | स्वामी सदगुरूधामा | सच्चिदानंदमूर्ती | पाय दाखवी आम्हा || आरती || धृ || राघवे सागरांत | पाषाण तारिले | तैसे हे तुकोबाचे | अभंग उदकी रक्षिले || आरती || १ || तुकिता तुलनेसी | ब्रम्ह तुकासि आलें | म्हणुनी रामेश्वरे | चरणी मस्तक ठेविले || आरती तुकारामा || २ ||
……………………………………………

श्री रामदासाची आरती

आरती रामदासा | भक्त विरक्त ईशा | उगवला ज्ञानसूर्य || उजळोनी प्रकाशा || धृ || साक्षात शंकराचा | अवतार मारुती | कलिमाजी तेचि झाली | रामदासाची मूर्ती || १ || वीसही दशकांचा | दासबोध ग्रंथ केला | जडजीवां उद्धरिले नृप शिवासी तारीले || २ || ब्रम्हचर्य व्रत ज्याचे | रामरूप सृष्टी पाहे | कल्याण तिही लोकी | समर्थ सद्गुरुपाय || ३ || आरती रामदासा ||
……………………………………………

घालीन लोटांगण वंदीन चरण

घालीन लोटांगण वंदीन चरण।। डोळ्यांनी पाहीन रूप तुझें।। प्रेमें आलिंगन आनंदे पूजिन।। भावें ओवाळीन म्हणे नामा।। त्वमेव माता च पिता त्वमेव।। त्वमेव बंधुश्‍च सखा त्वमेव।। त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव।। त्वमेव सर्वं मम देवदेव।। कायेन वाचा मनसेंद्रियैर्वा।। बुद्धात्मना व प्रकृतिस्वभावअत्‌।। करोमि यद्‌त्सकलं परस्मै।। नारायणायेति समर्पयामि। अच्युतं केशवं रामनारायणं।। कृष्णदामोदरं वासुदेवं हरिम्‌।। श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं।। जानकीनायकं रामचंद्रं भजे।। हरे राम हरे राम राम राम हरे हरे।। हरे कृष्ण हरे कृष्ण कृष्ण कृष्ण हरे हरे।

……………………………………………

मोरया मोरया अष्टविनायक मोरया
मोरया मोरया मयूरेश्वर मोरया
मोरया मोरया चिंतामणि मोरया
मोरया मोरया बल्लालेश्वर मोरया
मोरया मोरया वरदविनायक मोरया
मोरया मोरया गिरिजात्मजा मोरया
मोरया मोरया विग्नेश्वरा मोरया
मोरया मोरया महगणपती मोरया
मोरया मोरया सिद्धिविनायक मोरया
मोरया मोरया अष्टविनायक मोरया

सदा सर्वदा योग तूझा घडावा

तुझे कारणी देह माझा पडावा

उपेक्षू नको गूणवंता अनंता

रघूनायका मागणे हेचि आतां ।।१

कैलास राणा शिव चंद्रमौळी

फणींद्र माथा मुकुटी झळाळी

कारुण्य सिंधू भवदु:खहारी

तुजवीण शंभो मज कोण तारी ।।२।।

मोरया मोरया मी बाळ तान्हें

तुझीच सेवा करु काय जाणे

अन्याय माझे कोट्यानुकोटी

मोरेश्वरा ब तू घाल पोटी ।।३।।

ज्या ज्या ठीकांणी मन जाय माझे

त्या त्या ठीकांणी निजरुप तुझे

मी ठेवितो मस्तक ज्या ठीकांणी

तेथे तुझे सदगुरु पाय दोन्ही ।।४।।

अलंकापुरी पुण्य भूमी पवित्र

तिथे नांदतो ग्यानराजा सुपात्र

तया आठविता महापुण्यराशी

नमस्कार माझा सदगुरु ज्ञानेश्वराशी ।।५।।

……………………………………………
अष्टविनायक नमन

स्वस्ति श्री गणनायकं गजमुखम, मोरेश्वरम सिद्धीधम ।
बल्लाळो मुरुडम विनायकमहम चिन्तामणि स्थेवरम।
लेण्याद्री गिरीजात्मकम सुरवरदम विघ्नेश्वरम् ओझरम ।
ग्रामो रांजण संस्थीतम गणपति।
कुर्या सदा मंगलम शुभ मंगल सावधान।।

……………………………………………

मंत्रपुष्पांजली

ॐ यज्ञेन यज्ञमयजन्त देवास्तनि धर्माणि प्रथमान्यासन् ।
ते ह नाकं महिमान : सचंत यत्र पूर्वे साध्या : संति देवा : ।।
ॐ राजाधिराजाय प्रसह्य साहिने ।
नमो वयं वैश्रवणाय कुर्महे ।
स मस कामान् काम कामाय मह्यं।
कामेश्र्वरो वैश्रवणो ददातु कुबेराय वैश्रवणाय ।
महाराजाय नम: ।
ॐ स्वस्ति। साम्राज्यं भौज्यं स्वाराज्यं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
वैराज्यं पारमेष्ठ्यं राज्यं महाराज्यमाधिपत्यमयं
समंतपर्यायीस्यात् सार्वभैम: सार्वायुष आं
तादापरार्धात् पृथिव्यै समुद्रपर्यंताया एकेराळिति
तदप्येष: श्लोको भिगीतो मरूत: परिवेष्टारो मरूतस्यावसन् गृहे ।
आविक्षितस्य कामप्रेर्विश्र्वेदेवा: सभासद इति ।।
एकदंतायविघ्महे वक्रतुण्डाय धीमहि ।

तन्नोदंती प्रचोदयात् ।

मंत्रपुष्पांजली समर्पयामि ।।

ll गणपतिबाप्पा मोरया ll
ll मंगलमूर्ती मोरया ll

🚩सर्व गणेश भक्तानां गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा….🚩

tc
x