विषय : – माझी मायमराठी
काव्य प्रकार – नवाक्षरी
शिर्षक : – महाराष्ट्राची शान
माय मराठी आहे माझी ,
लिला असे गं तिची न्यारी |
हीच आहे भाषा साजरी ,
आहे जगात गोड खरी — !! १ !!
संत याचे महत्व सांगी ,
अमृततुल्य ज्यांची वाणी |
त्यांनी सजविली मराठी ,
असे जिथे ज्ञानाच्या खाणी — !! २ !!
तुका अभंग नि भारूड ,
गाऊनी कविता, पोवाडे |
फुलविली त्यांनी मराठी ,
साहित्य हे मनाने घडे — !! ३ !!
नाना भाषा जरी सिखुया ,
मराठी ही न विसरूया |
मराठी ही आमची आहे ,
साऱ्या जगाला दाखवूया — !! ४ !!
माय मराठी माझा मान ,
हिच महाराष्ट्राची शान |
आहे आमुचा अभिमान ,
देशात हे सर्वांत छान — !! ५ !!
ही विसरणे शक्य नाही ,
गोडवा सर्वां घेता येई |
विदेशी शिकण्या हौस ही ,
मराठी आम्हा गर्व होई — !! ६ !!
सौ . शुभांगी कपिल डांगरे
नागपूर
This post was last modified on %s = human-readable time difference 12:17 pm