मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष

मराठी भाषा गौरव दिनानिमित्त विशेष

विषय: “माझी माय मराठी”

माझी ही माय मराठी
मज प्राणाहूनी प्रिय
लिहिताना छान वाटे
ऐकताना. श्रवणीय

मिळो ज्ञान मराठीत
समजते साधी सोपी
विषयांचे आकलन होई
नाही कोणी जाई झोपी

असे मराठी साहित्य
बहुरंगी नटलेले
जगात वाचक असती
बहुश्रुत असलेले

नाते असते मातेचे
प्रेम असे अतोनात
मराठीत बोलताना
घरी वाटे अंगणात

किती वाचू असे होई
नसे तोटा साहित्याला
कथा लेख कादंबरी
नसे सीमा वाचनाला

अमृताचे पैजा जिंके
ज्ञानेश्वरी मराठीत
हरीनाम सप्ताहात
लोक येती अगणित

देश विदेशात भाषा
मराठीचा बोलबाला
असे ही मायबोली
नसे अंत आनंदाला

विजयकुमार गोखले
कर्जत जिल्हा रायगड

tc
x