वाशिम : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) कार्यान्वित करण्यात आली. यासाठी शासनाकडून ५० टक्के अनुदान देय आहे; तर उर्वरित रक्कम लाभार्थीस स्वतः गुंतवावी लागणार आहे. अर्ज प्रक्रियेला १० ऑगस्टपासून सुरुवात होणार असून ३१ ऑगस्टपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण होणार आहे.
मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण
योजनेसाठी पात्र ठरलेली संस्था, व्यक्तीला मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. यासह साहित्य स्वरुपात ५० टक्के अनुदान व ५० टक्के स्वगुतंवणुक, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी केली जाईल.
हे ही वाचा :- Ration Card : भाऊ, आता हेलपाटे मारू नका; घ्या ऑनलाइन ई-शिधापत्रिका !!
कोण घेऊ शकतो लाभ?
इयत्ता १० वी उत्तीर्ण, वय वर्षे २१ पेक्षा अधिक असलेल्या व्यक्तीच्या कटुंबातील कोणत्याही व्यक्तीच्या नावे किमान १ एकर शेत जमीन किवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन असायला हवी. अशा व्यक्ती योजनेसाठी पात्र आहेत.