महाराष्ट्र विधिमंडळ अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. राज्यपाल रमेश बैस यांच्या अभिभाषणाने या अधिवेशनाला सुरुवात झाली. यावेळी सरकारने आत्तापर्यंत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयावर भाष्य केलं आहे. तर या अर्थसंकल्पातील काही ठळक मुद्दे पाहुयात
पहा कसे आहेत ठळक मुद्दे
▪️ मिलिंद नार्वेकर आमदार नसतानाही सभागृहात येऊन बसले, आदित्य ठाकरेंनी चूक लक्षात आणून दिली.
▪️ मराठी भाषेच वय अडीच हजार वर्ष असल्याने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्या, छगन भुजबळांनी केली मागणी.
▪️ एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून शिवसेनेच्या सर्व आमदारांना व्हिप जारी करण्यात आला.
▪️ सीमाभागातील लोकांसाठी सरकार कल्याणकारी योजना राबवणार तसेच पेन्शन योजनेतही सरकारने सुधारणा केली.
▪️ आर्थिक सल्लागार समितीची स्थापना केली व शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना सुरू करण्यात आली.
▪️ कोरोना नंतर युवकांना रोजगार देणे हा सरकारचा हेतू आहे.
▪️ 75 हजार नोकर भरतीचा निर्णय घेतला आहे. अशी माहिती राज्यपाल रमेश बैस यांनी अभिभाषणात दिली.
तर विधानसभेचं कामकाज आज दिवसभरासाठी स्थगित, उद्या सकाळी 12 वाजल्यानंतर सभागृह सुरू होणार, असे राज्यपाल रमेश बैस यांनी सांगितले
अर्थसंकल्पीय अधिवेशनातील हे ठळक मुद्दे – आपण इतरांना देखील शेअर करा.