ब्रेकिंग ! – आता बंद पडलेल्या खात्यातून काढता येणार पैसे – RBI चे ‘उद्गम’ वेब पोर्टल लॉन्च

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘उद्गम’ नावाचे एक केंद्रीकृत वेब पोर्टल सुरू केले आहे, या वेबपोर्टलच्या माध्यमातून नागरिकांना स्वत:च्या किंवा त्यांच्या जवळच्या आणि नातेवाईकांच्या नावाने बँकांमध्ये असलेल्या, बेवारस किंवा हक्क नसलेल्या ठेवी शोधण्यास मदत होणार आहे.

तसेच यामुळे सक्रीय नसलेल्या खात्यातून पैसे काढता येऊ शकतात. ही रक्कम एकापेक्षा अधिक बँकांमध्ये ठेवली असली तरी देखील काढता येऊ शकते.

पहा काय सांगितले RBI ने

उद्गम वेब पोर्टल लाँच केल्याने नागरिकांना त्यांच्या दावा न केलेल्या खाती ओळखण्यात मदत होईल. त्यानंतर खातेदार एकतर ठेव रकमेवर दावा करू शकतील किंवा त्यांच्या संबंधित बँकांमध्ये त्यांची ठेव खाती पुन्हा सक्रिय करू शकतील.

आरबीआयच्या या पोर्टलवर नागरिक सध्या सात बँकांच्या संदर्भात त्यांच्या हक्क नसलेल्या ठेवींचा तपशील मिळवू शकतील. इतर बँकांची शोध सुविधा देखील १५ ऑक्टोबर २०१३ पर्यंत टप्प्याटप्प्याने उपलब्ध करून दिली जाईल, असेही RBI ने म्हटले आहे.

या बँकांमधील ठेवी पाहता येणार

१) स्टेट बँक ऑफ इंडिया

२) पंजाब नॅशनल बँक

३) सेंट्रल बँक ऑफ इंडिया

४) धनलक्ष्मी बँक लिमिटेड

५) साउथ इंडियन बँक लिमिटेड

६) डीबीएस बँक इंडिया लिमिटेड

७) सिटी बँक

आता बंद पडलेल्या खात्यातून पैसे काढता येणार – हि बातमी आपण इतरांना देखील शेअर करा.

tc
x