पहिल्यांदा प्रियशी भेटली
मनात ती माझ्या बसली
भेटीची ओढ मज लागली
गालात गोड गोड हसली //१//
रात्रंदिन तिचा भास होतो
माझ्या मनावर तिने जादू केली
सुंदर चेहरा तिचा समोर दिसतो
भेटीची सिग्नल देऊन गेली //२//
उडत्या पाखरा कडे निरोप दिला
वारा ही मदतीला धावून आला
मधुमिलनाचा योग जुळला
नशीबाचा खेळ चमत्कार झाला //३//
प्रेमात दोघांचं मन भुललं
प्रीतीचं फुलपाखरू मनात भरलं
निसर्ग सानिध्यात तनमन खुललं
तहान भुकेचं भानच हरपलं //४//
मोद मनी बहु गातो गाणी
अप्सरेचं रूप मधूर तिची वाणी
प्रेम प्रीतीची बनली माझी राणी
क्षणभर ही दूर जाता नयनी भरते पाणी //५//
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹
✍️-मधु भोये
जि.पालघर