पुण्यात काम करण्याची इच्छा असणाऱ्यांसाठी नोकरीची एक सुवर्णसंधी ; महापालिका अंतर्गत विविध शिक्षक पदांची भरती सुरु…

पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी!
महापालिका अंतर्गत विविध शिक्षक पदांची भरती सुरु, जाणून घ्या कधी आणि कसा करायचा अर्ज

भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२३ ही आहे

पुणे महानगरपालिकेने काही जागांसाठी भरती जाहीर केली आहे.

या भरती अंतर्गत पुणे महानगरपालिका संचलित उर्दू माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यमाच्या प्राथमिक शिक्षक व विशेष मुलांच्या शाळांसाठी काही पदांच्या १५३ रिक्त जागा भरण्यात येणार आहेत.

उमेदवारांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २ ऑगस्ट २०२३ ही आहे.

पदाचे नाव – उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, विशेष शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक.

एकूण पद संख्या – १५३

नोकरी ठिकाण – पुणे

अर्ज पद्धत्त – ऑफलाईन.

अर्ज पाठविण्याचा पत्ता –
उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक, इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक – शिक्षण विभाग प्राथमिक, पुणे महानगरपालिका कार्यालय कै. भाऊसाहेब शिरोळे भवन, जुना तोफखाना, शिवाजीनगर, पुणे ०५
विशेष शिक्षक – विशेष मुलांची शाळा, मनपा शाळा क्र १४ मुलांची, काँग्रेस भवनमार्ग, शिवाजीनगर, पुणे ५

WhatsApp Image 2023 07 30 at 6.36.22 AM

अर्ज करण्याची शेवटची तारीख – २ ऑगस्ट २०२३

अधिकृत वेबसाईट – http://www.pmc.gov.in

शैक्षणिक पात्रता –

उर्दू माध्यम प्राथमिक शिक्षक –
माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्रधारक व शिक्षणशास्त्र पदविका (डी. एड/बी. एड) उर्दू माध्यम, शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पास.

अ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पास उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

हे ही वाचा : रेशन कार्ड मध्ये नवीन नावे ॲड करायचे 

ब) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) पास उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

विशेष शिक्षक
माध्यमिक अथवा उच्च माध्यमिक शालांत परीक्षा प्रमाणपत्र धारक व बौद्धिक अक्षम प्रवर्गातील प्रशिक्षित पदविका, डी.एस.ई. (आय डी) व ICI नोंदणी प्रमाणपत्र धारक.

इंग्रजी माध्यम प्राथमिक शिक्षक –


इयत्ता १ ली ते १२ वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./बी.एड. इंग्रजी माध्यमातून पास.
इयत्ता १ली ते १० वी पर्यंत इंग्रजी, १२वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. बी.एड. इंग्रजी माध्यमातून पास.
इयत्ता १ली ते १० वी मराठी अथवा इतर माध्यमातून व १२वी इंग्रजी माध्यमातून शिक्षण व डी.एड./ बी.एड. इंग्रजी माध्यमातून पास.
इयत्ता १ली ते १२ वी मराठी अथवा इतर माध्यमातून शिक्षण व डी.एड. /बी.एड. इंग्रजी माध्यमातून पास.
अ) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण उमेदवार यांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल. च) शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण उमेदवार उपलब्ध न झाल्यास गुणानुक्रमे अन्य उमेदवारांना संधी देण्यात येईल.

पगार –

भरती अंतर्गत निवडलेल्या उमेदवारांना महिना २० हजार पगार दिला जाणार आहे.

भरती संदर्भातील अधिकच्या आणि सविस्तर माहितीसाठी (https://drive.google.com/file/d/1eVXKBIg8Bu6BOuUYUZyBvmzyKGMCIaKH/view)
(https://drive.google.com/file/d/1vtoHM3qGRoif38o9enu3q_7DP1xLAHUL/view)
(https://drive.google.com/file/d/1YrUjqU_57JOWFwfAgej_Kwu671qwBAwU/vie) या लिंकवरील जाहिरात अवश्य पाहा.

tc
x