दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 4/1/2023.

🔰 राज्यावरील ऊर्जा संकट टळले, MSEB कर्मचारी – सरकारची बैठक यशस्वी; फडणवीस म्हणाले, “खासगीकरण नाहीच”
महावितरणच्या ३२ कर्मचारी संघटनांनी तीन दिवसीय संपाची हाक दिली होती, मात्र सरकारबरोबर झालेल्या बैठकीनंतर संप मागे घेण्यात आला आहे.

🔰 Maharashtra Breaking News Live : अखेर वीज कर्मचाऱ्यांचा तीन दिवसीय संप मागे

🔰 मोठी बातमी: उद्धव ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांची संपत्ती ईडीकडून जप्त
अनिल परब यांना ईडीचा धक्का

🔰 “छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक म्हणावं हीच माझी भूमिका पण धर्मवीर…” अजित पवार नेमकं काय म्हणाले?
छत्रपती संभाजी महाराज धर्मवीर नव्हते हीच माझी भूमिका आजही आहे.. कुणाला ती मान्य नसेल तर माझं काहीही म्हणणं नाही असंही अजित पवार यांनी म्हटलं आहे

🔰 “भाजपाने मला विरोधी पक्षनेते पद दिलं नाही, त्यामुळे…” राजीनाम्याच्या मागणीवर अजित पवार संतापले!
भाजपाच्या आंदोलनावर केली आहे टीका; मंत्री, आमदार, राज्यपालांनी महापुरुषांचा केलेल्या अपमानावर कधी बोलणार? असा प्रश्नही विचारला आहे.

🔰 संपाचा फटका, राज्यातील महानिर्मितीचे पाच वीज निर्मिती संच बंद !
वीज यंत्रणेच्या खासगीकरणाला विरोधासह इतर मागण्यांसाठी वीज कर्मचारी- अधिकाऱ्यांनी पुकारलेल्या राज्यव्यापी संपाचा फटका आता महानिर्मितीलाही बसू लागला आहे.

🔰 भाजप पाठोपाठ काँग्रेसचेही ‘मिशन बारामती’ ?
काँग्रेस प्रांताध्यक्ष नाना पटोले येत्या गुरुवारी बारामतीचा दौरा करणार आहेत. बारामतीत काँग्रेसच्या ओबीसी विभागाच्या वतीने कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.

🔰 चीनच्या एका निर्णयाने जगाला धडकी का भरली? चीनमधून ‘करोना बॉम्ब’ जगभरात पसरणार?
चीनच्या एका निर्णयाने जगाची झोप उडविली आहे

🔰 ठाणे : म्हसा यात्रेनिमित्त अवजड वाहनाच्या वाहतुकीत बदल; मुरबाड-कर्जत मार्गावर अवजड वाहनाच्या वाहतुकीत बदल
म्हसा यात्रेच्या निमिताने ५ ते १५ जानेवारी या दरम्यान मुरबाड येथील म्हसा नाक्यावरून म्हसा व कर्जतकडे जाणारी अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे.

🔰 कुलगुरू निवड प्रक्रिया पुन्हा लांबणीवर, निवडीसाठी नवीन समितीची नियुक्ती

🔰 विक्रोळीतील बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची लिफ्ट कोसळून एकाचा मृत्यू
विक्रोळी रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला असलेल्या श्री सिद्धिविनायक को-ऑपरेटिव्ह सोसायटीतील उद्वाहनाचे काम बुधवारी सुरू होते.

🔰 कात्रज भागातील गृहप्रकल्पातून बांधकाम साहित्य चोरणारे गजाआड
गृहप्रकल्पातील स्लॅबसाठी वापरण्यात येणाऱ्या लोखंडी प्लेट चोरणाऱ्यांना अटक करण्यात आली. चोरट्यांकडून एक लाख दहा हजार रुपयांच्या दिडशे प्लेट जप्त करण्यात आल्या आहेत.

🔰 ‘अदानी गो बॅक’च्या घोषणा अन् अनेक गावांची ‘बत्ती गुल’; वाशीम जिल्ह्यातील वीज कर्मचारी आक्रमक
जिल्ह्यातील ६५० कर्मचारी संपात सहभागी झाले असून १५ ते २० उपकेंद्रावर कर्मचारी हजर नसल्यामुळे संपूर्ण जिल्ह्यावर वीज संकट ओढवण्याची चिन्हे आहे.

🔰 कंझावाला प्रकरण: “अंजली गेली, आता…” आठवणी सांगताना आईच्या डोळ्यातून अश्रू थांबेनात
अंजलीच्या आठवणी सांगताना तिची आईची अवस्था सून्न झाली आहे.

🔰 “रस्ते, गटारांसारख्या ‘छोट्या गोष्टीं’ऐवजी ‘लव्ह जिहाद’ला महत्त्व द्या”; BJP नेत्याचा कार्यकर्त्यांना सल्ला
‘बूथ विजय अभियान’ कार्यक्रमात कार्यकर्त्यांना संबोधित करताना भाजपा नेत्यानं केलं विधान

🔰 मैत्री तोडली म्हणून २१ वर्षीय तरुणीला त्याने दिवसाढवळ्या भोसकलं; दिल्लीमधील धक्कादायक प्रकार कॅमेऱ्यात कैद
मागील अनेक वर्षांपासून हे दोघेही एकमेकांना ओळखत होते मात्र अचनाक त्यांच्यात मतभेद निर्माण झाले

🔰 IND vs SL 1st T20: सॅमसनच्या खराब कामगिरीवर संतापले सुनील गावसकर; म्हणाले, ‘तो चांगला खेळाडू आहे, पण..’
Sunil Gavaskar on Sanju Samson: माजी खेळाडू सुनील गावसकर यांनी संजू सॅमसन स्वस्तात बाद झाल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. सॅमसन अनेक महिन्यांनंतर टी-२० सामना खेळला.

🔰 IND vs SL: १५५ किमी प्रती वेगाने उमरानचा जाळ काढणारा चेंडू…अन् श्रीलंकेचा कर्णधार झाला क्लीनबोल्ड, ‘या’ दिग्गजाचा मोडला विक्रम
भारतीय क्रिकेट संघाचा युवा वेगवान गोलंदाज उमरान मलिकने मंगळवारी श्रीलंकेविरुद्ध सुपरफास्ट गोलंदाजी केली. त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एका भारतीयाने टाकलेल्या सर्वात वेगवान चेंडूचाविक्रम मोडला.

tc
x