दवंडी दिवसभरातील सुपरफास्ट घडामोडी 04/5/23

◼️महाविकास आघाडीला माझ्याकडून तडा जाणार नाही याची काळजी मी घेईन – उद्धव ठाकरे

◼️मुंबईः विशेष मोहिमेत अडीच कोटींचे अंमलीपदार्थ जप्त, २१ जणांना अटक
मुंबईत राबवलेल्या विशेष कारवाईत आतापर्यंत अडीच कोटी रुपयांचे अंमलीपदार्थ जप्त करण्यात आले असून याप्रकरणी १४ गुन्ह्यांमध्ये २१ जणांना अटक करण्यात आली आहे.

हे ही वाचा:- आता पासवर्ड लक्षात ठेवण्याचा त्रास नाही! गुगलने लाँच केले ‘हे’ तंत्रज्ञान, जाणून घ्या

◼️“दोन दिवसांनंतर तुम्हाला…”, राजीनामा मागे घेण्याच्या मागणीवर शरद पवारांचं सूचक विधान; कार्यकर्त्यांना केलं आश्वस्त!
राजीनामा मागे घेण्याच्या मागणीवर शरद पवारांचं सूचक विधान केलं आहे…

◼️“उद्धव ठाकरे दुतोंडी सापाची…”, बारसू दौऱ्यावरून रामदास कदमांची टीका
उद्धव ठाकरेंच्या बारसू दौऱ्यावरून शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी टीकास्र सोडलं आहे.

हे ही वाचा:- Whatsapp News : सावधान ! तुमचे Whatsapp खाते कदाचित बॅन केले जाऊ शकते.WhatsApp वर चुकूनही करू नका या 8 चुका,अन्यथा…

◼️महाराष्ट्रात राख, गुजरातमध्ये रांगोळी का? बारसूवरून उद्धव ठाकरेंचा भाजपाला सवाल
बारसू रिफायनरी प्रकल्पावरून उद्धव ठाकरे आक्रमक, शिंदे फडणवीस सरकारवर टीका

◼️ठाण्यातील सेवा रस्त्यांवर वाहनतळाची मोफत सुविधा, ठाणे महापालिकेची योजना
तीन हात नाका ते माजिवाडा जंक्शनपर्यंतचा सेवा रस्त्यांवर पार्किंग क्षेत्र निश्चित करून त्याठिकाणी मोफत वाहने उभी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय ठाणे महापालिका प्रशासनाने घेतला आहे.

हे ही वाचा:- ATM मधून पैसे काढण्यासाठी SBI चा नवीन नियम; अन्यथा…..

◼️“राष्ट्रवादीचा वजीर ४० आमदारांसह गायब होणार होता, पण…”, शिंदे गटातील आमदाराचं विधान
“देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांनी वज्र आणि मूठ दोन्ही गायब केलं आहे, फक्त…”

◼️वाघांच्या अधिवासाने समृद्ध ‘अंबाबरवा’ मध्ये आज प्राणिगणना, वन्य विभागाची जय्यत तयारी
यंदा निसर्ग अनुभव कार्यक्रमाला वन्यप्रेमींना प्रवेश नाकारण्यात आल्याने त्यांचा हिरमोड झाला आहे.

हे ही वाचा:- PMMVY : शासनाकडून या महिलांना मिळणार आर्थिक मदत सहा हजार रुपये

◼️कार्यकारिणी सदस्यपद देऊन यवतमाळची बोळवण; भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीत एकही पदाधिकारी नाही
भाजपाने बुधवारी जाहीर केलेल्या प्रदेश कार्यकारिणीत यवतमाळ जिल्ह्यातून एकही पदाधिकारी नियुक्त झाला नाही. कार्यकारिणीत जिल्ह्यातील केवळ दोघांची सदस्य म्हणून वर्णी लागली आहे.

◼️वज्रमूठ सभांचे फेरनियोजन; नाना पटोले म्हणाले, “मोदी सरकारकडून मुंबईचे महत्त्व कमी करण्याचा डाव”
राज्यात मागील काही दिवसांत वादळी वाऱ्यासह पाऊस पडत आहे. त्यामुळे सभांचे वेळापत्रक बदलण्याचा विचार झालेला आहे. वज्रमूठ सभा रद्द केलेल्या नाहीत, असे नाना पटोले म्हणाले.

◼️गोंदिया : भाजपा प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून केवळ एक माजी खासदार व एक माजी आमदाराचीच वर्णी
भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीवर जिल्ह्यातून फक्त माजी खासदार व माजी आमदार यांचीच वर्णी लागली आहे.

◼️“आमच्या कुस्तीपटूंना दुखावण्याची हिंमत करू नका…”, ममता बॅनर्जींचा इशारा; म्हणाल्या, “मुलींच्या इज्जतीला…”
महिला कुस्तीपटूंनी केलेल्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्याने साक्षी मलिक, विनेश फोगाट, बजरंग पुनिया या कुस्तीपटूंनी जंतर मंतरवर आंदोलन पुकारले आहे. या आंदोलनाला देशभरातून अनेक खेळाडूंनी पाठिंबा दर्शवला आहे.

◼️ गोंदिया : रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाचे : २० गाड्या रद्द, ट्रेनच्या विलंबाची समस्या डिसेंबरपर्यंत कायम राहणार

tc
x