तुम्ही WhatsApp Group Admin आहात ?तर आत्ताच जाणून घ्या तुमची “पॉवर”!!

तुमची ‘पॉवर’ होणार दुप्पट सविस्तर जाणून घ्या

WhatsApp आपल्या यूजर्ससाठी नेहमीच नवीन नवीन फीचर्स आणत असते.

आता कंपनी आणखी काही नवीन फीचर्स घेवून येत आहे. हे फीचर आल्यानंतर Group Admin चे ‘पॉवर’ वाढणार आहेत. पाहा काय काय नवीन बदल झाले आहेत

इंस्टेंट मेसेजिंग ॲप WhatsApp आपल्या यूजर्सच्या सुविधेसाठी नवीन अपडेट आणि फीचर्स आणत असते. या यादीत आता WhatsApp एकाचवेळ दोन नवीन फीचर्स जारी करणार आहे.

या फीचर्सच्या मदतीने ग्रुप ॲडमिनची पॉवर वाढणार आहे. मेटाचे सीईओ मार्क झुकरबर्ग यांनी स्वतः ही घोषणा केली आहे. मार्क झुकरबर्ग यांनी ही घोषणा करताना WhatsApp ग्रुपसाठी दोन नवीन अपडेट जारी करीत असल्याची सांगितले आहे. नवीन अपडेट सोबत ग्रुप ॲडमिन आपल्या ग्रुप प्रायव्हसीवर जास्त कंट्रोल करू शकतील.

ॲडमिनला मिळेल जास्त कंट्रोल
मार्क झुकरबर्गने आपल्या घोषणेत म्हटले की, गेल्या काही महिन्यापासून काही नवीन अपडेट करण्यात येत आहे. ज्यातून आता ग्रुपला मोठे करणे आणि अॅडमिनला स्वतः ग्रुपला मॅनेज करण्यासाठी पाठवलेल्या मेसेजला हटवण्याची क्षमता दिली जाणार आहे.

मेटाने यासंबंधी बोलताना सांगितले की, ग्रुप अजूनही WhatsApp चे एक खास भाग आहे. ग्रुपमधून जास्तीत जास्त फायदा देण्यासाठी आणखी टूल देण्यासाठी आम्ही उत्सूक आहोत.

वीन अपडेट मध्ये मिळेल ही सुविधा
WhatsApp च्या नवीन फीचर मध्ये ॲडमिनला अधिकार मिळणार आहेत की,

ग्रुपमध्ये कोणाला घ्यायचे आहे. तसेच नवीन फीचर मुळे ग्रुप ॲमिनला ही सुद्धा मदत मिळेल की, कोणता व्यक्ती ग्रुपमध्ये सहभागी होवू शकतो की नाही. या टूलचा सर्वात जास्त फायदा त्या ग्रुपला मिळणार आहे. जे लोक आपल्या सर्वांशी काही गोष्टी खासगीत बोलतात. त्यामुळे हे महत्तपूर्ण आहे की, अॅडमिन सहज ठरवू शकतो की, कोणाला ग्रुपमध्ये घ्यायचे किंवा नाहीग्रुपला सहज पाहू शकतील

WhatsApp ग्रुप आणि कम्युनिटी पाहता WhatsApp याला सहज बनवत आहे.

सोबत कंपनी ग्रुप मध्ये सहभागी लोकांना शोधण्यासाठी नवीन पद्धतीवर काम करीत आहे. या फीचरच्या मदतीने यूजर्स ग्रुप आणि कम्यूनिटी मध्ये सहभागी अन्य यूजर्सला सर्च करू शकतील. म्हणजेच तुमचा मित्र किंवा नातेवाईक तुमच्यासोबत अन्य कोणत्या ग्रुपमध्ये ॲड आहे. तसेच तुम्ही ग्रुपमध्ये थेट कॉन्टॅक्टला सुद्धा सर्च करू शकता.

tc
x